आपल्याला एकदा मधुमेहाचे निदान झाले की रोग्याला जणू जन्मठेपेची शिक्षा दिल्यासारखे वाटते; परंतु प्रत्यक्षात हे खोटे आहे. टाईप 2 मधुमेहावर आपण मात करू शकतो आणि हे सिद्ध करणेसुद्धा खूप सोप्पे आहे. 50% पेक्षा अधिक भारतीयांसाठी ज्यांना प्री-डायबिटीज किंवा मधुमेहाचं निदान झालं आहे, त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. आपण हे सत्य स्वीकारताच आपण ह्या आजारावर 50% विजय मिळवल्यासारखे आहे. बहुतेक डॉक्टर, आहारतज्ज्ञ आणि मधुमेह विशेषज्ज्ञांनी दावा केला आहे की टाईप 2 मधुमेह हा एक तीव्र आणि प्रगतीशील रोग आहे. अमेरिकन डायबिटीज असोसिएशन यांनी जवळजवळ अभिमानाने त्यांच्या वेबसाइटवर हे घोषितसुद्धा केले आहे.
टाईप टाईप समजा आपल्या मित्राला मधुमेहाचे निदान झाले असेल आणि तो वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करत असेल, तो स्वतःची सर्व औषधे बंद करतो आणि त्याची रक्त शर्करा आता सामान्य आहे, तर आपण त्याला काय सांगू? कदाचित ग्रेट जॉब आपण खरोखर आपली काळजी घेत आहात. असेच चालू द्या! त्याला आपण असे तर म्हणू शकत नाही की; तुम्ही इतके घाणेरडे आणि मोठे खोटारडे आहात. माझे डॉक्टर म्हणतात की हा एक क्रॉनिक आणि प्रगतिशील रोग आहे जेणेकरून आपण माझ्याशी खोटे बोलत आहात हे अगदी स्पष्ट दिसत आहे. तुमच्या मित्राने मधुमेहावर वजन कमी करून मात मिळवली आहे आणि आम्हाला सुद्धा तुम्हाला हेच पटवून द्यायचे आहे की, ह्या आजारावर आपण मात करू शकतो.
टाईप 2 मधुमेहावर मात कशी करावी?
जर आपल्या शरीरात जास्त प्रमाणात साखर असेल तर ती लवकरात लवकर नियंत्रणात आणा. ते दिसत नाही म्हणून लपवू नका.
शरीरातील जास्त प्रमाणात असलेल्या साखरेपासून मुक्त होण्याचे खरोखरच दोन मार्ग आहेत.
साखरेचा वापर टाळा.
पहिली पायरी म्हणजे आपल्या आहारातील सर्व साखर आणि परिष्कृत स्टार्च काढून टाकणे. साखरेला पौष्टिक मूल्य नाही आणि म्हणूनच तो आपल्या दैनंदिन आहारातून काढून टाकला जाऊ शकतो. स्टार्च हा केवळ साखरेचा विस्तारित अंग आहे. अत्यंत परिष्कृत स्टार्च जसे की पीठ किंवा पांढरा भात पचनक्रियाद्वारे ग्लुकोजमध्ये त्वरित विघटित होतो. हे त्वरित रक्तामध्ये शोषले जाते आणि रक्तातील साखरेचा अंश वाढवते. उदाहरणार्थ, पांढरे ब्रेड खाण्याने रक्त शर्करा लवकर वाढते. यावरून असे दिसून येत नाही का, की रक्त शर्करा वाढविणारे अन्न आपण टाळले पाहिजे. कारण शेवटी ते शरीरात शोषले जातात. अपेक्षित भोजनक्रम म्हणजे कमीत कमी किंवा शुद्ध कार्बोहायड्रेट्सचे सेवन करणे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण, नैसर्गिक, अनप्रचारित खाद्यपदार्थांचे सेवन करणे.
मधुमेहाची कारणे नष्ट करून टाका.
आपल्या शरीराला ऊर्जेसाठी साखर बर्न करून ताकद देण्याची सोपी आणि जलद पद्धत म्हणजे उपवास पाळणे. रक्तातील ग्लुकोज हे शरीरासाठी ऊर्जेचा सर्वात सुलभ स्रोत आहे. उपवास म्हणजे केवळ खाण्याचा विरोध पक्ष आहे – जर आपण काही खात नाही, म्हणजेच आपण उपवास करीत आहोत. आपण जेवतो तेव्हा आपले शरीर जेवणातील ऊर्जा साठवते. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपले शरीर अन्न, ऊर्जा जाळते. आपण आपल्या उपवासाचा कालावधी वाढवल्यास आपण संग्रहित साखर जाळू शकतो.
टाईप 2 मधुमेहामुळे शरीरात जास्त साठलेले ग्लुकोज जाळून टाकणे हेच या आजारावर नियंत्रण आहे. जरी उपवास हे तीव्र स्वरूपाचे वाटले तरीही हे किमान 2000 वर्षांपासून आपल्या दैनंदिन जीवनाशी जुळलेले आहे. ही सर्वात जुनी आहाराची थेरेपी आहे. संपूर्ण मानवी इतिहासात कोट्यवधी लोक अडचणीशिवाय उपवास करतात. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असाल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ह्या सर्वांचे समीकरण असे करता येईल. जर तुम्ही खाल्ले नाही, तर तुमची रक्त शर्करा कमी होईल का? हो नक्कीच.
जर तुम्ही खाल्ले नाही, तर तुमचे वजन कमी होईल का? हो, नक्कीच तर, समस्या काय आहे? माझ्या मते काहीच नाही. आम्ही टाईप 2 मधुमेह आणि प्री-डायबिटीज यावर आज, आता, लगेचच उपाय करू शकतो. तेसुद्धा विनामूल्य, विनाऔषध आणि कुठलीही शस्त्रक्रिया न करता. सर्वच नैसर्गिक आणि वेळोवेळी चाचणी केलेल्या उपचार पद्धतीसह, आपल्याला केवळ आपले शरीर उपचार पथावर न्यायचे आहे आणि धैर्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे.
कृपया आपल्या डॉक्टरांशी याबद्दल चर्चा करा आणि त्यानुसार आपली औषधे समायोजित करण्यास सांगा.
मधुमेह नसलेल्या लोकांपेक्षा तो असलेल्या लोकांना झोपेचा त्रास अधिक असतो. मधुमेही लोकांना झोप लवकर लागत नाही. रात्री उशिरापर्यंत ते जागत बसतात. त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही आणि मग त्यांची प्रचंड चीडचीड होते. या सगळ्याची परिणती रक्तदाब आणि लठ्ठपणा वाढण्यात होते. रात्री उशिरा झोपण्याची सवयही टाईप 2 मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते.
आतापर्यंत मधुमेह होण्यास फक्त लठ्ठपणा कारणीभूत आहे असं मानलं जायचं, पण मधुमेह होण्यापाठी कितीतरी कारणं असतात हे लक्षात घ्या. ज्या व्यक्ती पुरेशी झोप घेत नाहीत त्यांच्या रक्तातील शर्करेची पातळी कमी-जास्त होत राहते. तुम्ही जितके कमी तास झोपाल, खाण्याची इच्छा तितकीच जास्त होईल. तुम्ही थकलेले असता तेव्हा तुमचे शरीर भुकेची भावना करून देणारे हार्मोन स्रवते, त्यामुळे अधिक खावंसं वाटतं.
परिणामी लवकर ऊर्जा मिळवण्याकरिता अनेक कॅलरी आणि कब्रोदकांचं सेवन केलं जातं. दररोज पाच तास किंवा त्याहून कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना दररोज 7 ते 8 तास झोप घेणाऱ्या व्यक्तींपेक्षा मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. ज्या लोकांमध्ये ग्लुकोजचं प्रमाण सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी-जास्त होत राहते, त्यांनाही मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.
मधुमेही लोकांना झोपेचा त्रास असतो. मधुमेही लोकांपैकी किमान अर्ध्याहून अधिक लोकांना रात्री झोप येत नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने ग्लुकोजचे प्रमाण पुरेसे राखले जात नाही, तात्पर्याने इन्शुलीन पुरेशा प्रमाणात स्रवत नाही. त्यामुळे तुम्हाला टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता वाढते. झोपेच्या अभावामुळे इन्शुलीनची निर्मिती करणाऱ्या पेशींच्या कामात अडथळे निर्माण होतात, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि तात्पर्याने मधुमेह होण्याची शक्यताही वाढते.
पुरेशी झोप न मिळण्याने ज्या लोकांना आधीपासूनच मधुमेह आहे त्यांना हा धोका आणखीनच वाढतो. सलग काही रात्री झोप मिळाली नाही तर या व्यक्तींच्या जीवावरही बेतू शकतं. मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत मधुमेही लोकांना झोपेचा त्रास अधिक असतो असे पुराव्याने सिद्ध झालेले आहे. एक-दोन दिवस पुरेशी झोप झाली नाही, तर ती झोप नंतर भरून काढता येते; पण झोप न लागण्याचा त्रास कायम राहिला तर मात्र त्यातून सावरणे अवघड होऊन बसते. जितके जास्त दिवस तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही, झोप भरून काढणं तितकंच अशक्य होत जाईल. असं झाल्यास तुमचं शरीर पुरेशी झोप न मिळण्यालाच सरावून जाईल आणि त्याची परिणती तुमचा मधुमेह वाढण्यात होईल.
बहुतेक लोकांना रात्री सात ते नऊ तासांच्या झोपेची गरज असते, तरीही भारतीय लोक सहा तासांहून कमी झोप घेतात असे अभ्यासातून दिसून आले आहे. या समस्येवर मात करायची असेल तर झोपेचे वेळापत्रक ठरवून घ्या. ठरावीक वेळी झोपा आणि सकाळी ठरावीक वेळेचा अलार्म लावा. त्यामुळे तुमचे शरीरही या वेळापत्रकाला सरावेल आणि तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळेल. रात्री उशिरापर्यंत जागू नका, पुरेशी झोप घ्या, आरोग्यदायी आहार घ्या आणि व्यायाम करणे सोडू नका!
पुरेशा झोपेसाठी
ज्याप्रमाणे आपल्या शरीराला हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते त्याप्रमाणे सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोपही गरजेची असते. वैज्ञानिकांच्या मतानुसार झोपेमध्ये शारीरिक आणि मानसिक परिवर्तन होतात. त्यामुळे केवळ शरीरालाच नाही तर मेंदूलाही आराम मिळतो. पुरेशी झोप मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. म्हणूनच पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. खरं म्हणजे झोप वयानुसार कमी-जास्त होत असते. चांगली आणि पुरेशी झोप हवी असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.
सर्वसाधारणपणे सुदृढ व्यक्तीला सहा ते आठ तास झोप आवश्यक असते.
झोपण्याची आणि उठण्याची एक योग्य वेळ निश्चित करावी.
झोपण्याचं ठिकाण शांत असावं. तसंच काही जणांना खोलीत लाईट लावायची आवड असते त्या दिव्याचा प्रकाश हलका असावा.
डोक्याखाली घेतली जाणारी उशी व्यवस्थित असावी. त्याचा जोर आपल्या डोक्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
रात्रीच्या जेवणात चांगला सकस आहार घेतलात तर झोप चांगली येईल. त्यात तांदूळ, बटाटा आणि मुळं असलेल्या भाज्यांचा समावेश करावा.
झोपण्यापूर्वी अतिरिक्त म्हणजे पोट भरेपर्यंत जेवण करू नये.
दिवसा नियमित व्यायाम करावा, म्हणजे रात्री चांगली झोप येईल.
झोपण्यापूर्वी मनातील चिंता, काळजी दूर करा.
मधुमेह आणि दंत आरोग्य
रक्तशर्करेच्या पातळ्यांचे नियंत्रण नीट न केल्यास तुम्हाला हिरड्यांचे आजार होण्याची खूप शक्यता असते. दातांची झीज, तोंड कोरडे होणे, तोंडात बुरशीजन्य पदार्थ जमा होणे यासारखे विकार होण्याची शक्यता असते. 14 नोव्हेंबर या जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने मधुमेहाचा आणि मुखाच्या आरोग्याचा संबंध जाणून घेऊ या.
मधुमेह हा एका विषासारखा आजार असून तो विविध अवयवांवर परिणाम करतो आणि आरोग्याचे इतर प्रश्नही त्यामुळे भेडसावतात. नंतरच्या टप्प्यांमध्ये हे आजार डोळे, मज्जाव्यवस्था, मूत्रपिंड आणि हृदय इत्यादींवर परिणाम करतात.
मधुमेह संसर्गाप्रती आपली प्रतिकारशक्ती कमी करतो आणि बरं होण्याच्या प्रक्रियेचा वेगही कमी करतो. तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्हाला हिरड्यांचा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपल्याला रक्तशर्करेचं व्यवस्थापन करताना दात आणि हिरड्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
रक्तशर्करेच्या पातळ्यांचे नियंत्रण नीट न केले गेल्यास तुम्हाला हिरड्यांचे आजार होण्याची खूप शक्यता असते आणि मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत आपण जास्त दात गमावू शकता. मधुमेहाशी संबंधित सर्वाधिक सर्वसामान्य मुख आरोग्य त्रास खालीलप्रमाणे आहेत
दातांची झीज
आहारातील आणि शीतपेयांमधील स्टार्च व साखर या जीवाणूंच्या संपर्कात येतात, तेव्हा प्लाक नावाचा चिकट पडदा तुमच्या दातांवर तयार होतो. प्लाकमधील आम्लं तुमच्या दाताच्या पृष्ठभागावर हल्ला करतात (इनॅमल आणि डेंटिन). यामुळे कीड लागण्याची शक्यता असते.
कोरडे तोंड
कोरडे तोंड हे तुमच्या तोंडातील ग्रंथींमधून (लाळग्रंथी) निर्माण होणाऱ्या लाळेच्या प्रमाणातील घट झाल्यामुळे होते आणि तो सामान्यत: औषधांचा साईड इफेक्ट असतो.
बुरशीजन्य संसर्ग :
तोंडाची जळजळ मधुमेह असलेल्या लोकांना संसर्गाचा सामना करण्यासाठी सतत अँटिबायोटिक्स घ्याव्या लागतात. त्यामुळे त्यांना तोंडात आणि जिभेवर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. ही बुरशी अनियंत्रित मधुमेह असलेल्या लोकांच्या लाळेतील साखरेच्या उच्च प्रमाणावर जगतात. त्यामुळे तुमचे तोंड आणि जीभ जळजळू शकते. तुम्हाला दंतक्षयामुळे कीड निर्माण होते. ती दाताच्या बाहेरील आवरण (इनॅमल) आणि अंतर्गत आवरण (डेंटिन) त्यावरही परिणाम करू शकते.
हिरड्यांची सूज
ही जीभ, हिरड्या, ओठ किंवा गालांच्या आत होते. ते अल्सर्स म्हणून किंवा तोंडात लाल-पांढरे चट्टे म्हणून दिसू शकतात.
अल्सर्स
या सामान्यत: लहान, वेदनादायी फोडी असतात, ज्या तुमच्या तोंडात किंवा तुमच्या हिरड्यांच्या तळाशी होऊ शकतात. त्यामुळे खाणे, पिणे आणि बोलणे वेदनादायी होऊ शकते.
चवीतील अडथळे
हा सर्वात मोठा चवीतील अडथळा आहे, जो टिकून राहतो. सामान्यत: तुमच्या तोंडात काहीही नसले तरीही नकोसे वाटते.
तुम्ही हे त्रास दूर करण्यासाठी बरंच काही करू शकता. त्यासाठी आपल्याला तोंड, दात आणि हिरड्यांची नीट काळजी घेण्यापासून सुरुवात केली पाहिजे. त्याच्या काही टिप्स खालीलप्रमाणे आहेत
तुमचे तोंड कोरडे असल्यास ते अल्कोहोलमुक्त माऊथवॉशने खळखळून धुवा.
तुमच्या आहारात दूध, चीझ, चिकन इत्यादींचा समावेश करा. या आहारामुळे दाताच्या इनॅमलला कॅल्शियमचा पुरवठा करून त्याचे संरक्षण होते.
प्रत्येक आहारानंतर तुमचे दात स्वच्छ घासा. खाण्यानंतर ब्रशपूर्वी किमान अर्धा तास थांबून इनॅमलचे संरक्षण करा.
मऊ ब्रिसल्सचे टूथब्रश वापरा.
दिवसातून एकदा तरी फ्लॉस करा.
डेंचर्सचा वापर करत असल्यास ते रोज स्वच्छ करा. डेंचर्स लावून झोपू नका.
धूम्रपानाच्या सवयीवर नियंत्रण ठेवा.
दर सहा महिन्यांनी नियमित तपासणीसाठी दंतवैद्यकाला भेट द्या.
शक्य तितक्या नॉर्मल प्रमाणात रक्तशर्करेचे प्रमाण ठेवा.