वर्ष 1983 मध्ये डॉ.ल्यूक मॉण्टिग्रेअर (फ्रेंच) व
डॉ.रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी एड्स या रोगाचा शोध लावला. वर्ष 1986 मध्ये पहिल्यांदाच या विषाणूला एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्यूनो डेफिसियन्सी व्हायरस असे नाव देण्यात आले.
ऑगस्ट 1987 मध्ये जेम्स डब्लू बॅन आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथील जागतिक कार्यक्रमात एड्स या रोगाची संकल्पना मांडली. डॉ. जॉनथन मान यांच्या सहमतीनंतर 1 डिसेंबर 1988 पासून जागतिक एड्स दिवस म्हणून जगभर
पाळला जातो.– डॉ. चैतन्य जोशी
मानवी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे निर्माण होणा-या रोगलक्षणांचा समूह म्हणजे एड्स होय. एड्स म्हणजे ऍक्वायर्ड- संपादित केलेला, इम्यूनो- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, डेफिशियन्सी कमतरता, सिंड्रोम लक्षण समूह होय. एच. आय. व्ही. विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर हा टप्पा लगेचच सुरू होतो व काही आठवडे राहतो. एच.आय.व्ही संक्रमित व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसते. हा कालावधी तीन महिने ते 2 वर्षे असू शकतो. तो व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर अवलंबून असतो.
एड्स झाल्याचे कोणत्या अवस्थेत समजते?
एच.आय.व्ही.चा विषाणू शरीरात रोगप्रतिकारक संस्थेच्या पेशीवर हल्ला करून त्या नष्ट करतो. नष्ट झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी वेगाने निर्माण होत नाही. या पेशींच्या कमतरतेमुळे बाधित व्यक्ती क्षयरोग, कॅंडिडियासीस, नागीण इत्यादी विविध संक्रमणांमुळे आजारी होते.
एच.आय.व्ही. संक्रमणाची अंतिम टप्प्याची म्हणजेच एड्सची सुरुवात येथून होते. तोपर्यंत बाधित व्यक्ती तिसऱ्या अवस्थेत असते.
लक्षणे
बाधित व्यक्तीचे वजन शेकडा दहा टक्क्यांनी कमी होते. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ सतत जुलाब होतात. एक महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला येतो. अंगावरील त्वचेवर वारंवार खाज येते. बाधित व्यक्तीच्या तोंडात व घशात फोड येतात. लसिका ग्रंथींची सूज जास्त काळ राहते ही प्रमुख लक्षणे ज्या व्यक्तीत दिसतात ती एड्सग्रस्त व्यक्ती समजावी.
एड्स कसा पसरतो?
एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास एड्स पसरतो. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीची इंजेक्शन व सुई अबाधित व्यक्तीसाठी वापरल्यास एड्स पसरतो. तसंच एच.आय.व्ही. बाधित रक्त दिल्यासही एड्स पसरतो. एच.आय.व्ही. बाधित पालकांकडून त्यांच्या नवजात अर्भकासही होऊ शकतो.
एड्स कसा टाळता येतो?
- एड्स सहज टाळता येऊ शकतो. यासाठी खालील बाबींची काळजी घेतल्यास एड्स
- टाळणे प्रत्येकाला शक्य आहे.
रक्त घेण्याची वेळ आली तर एच.आय.व्ही. मुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा. - इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरींज आणि सुईचा वापर करावा.
- गुप्तरोग झाला असल्यास त्यावर डॉक्टरकडे जाऊन त्वरित उपचार करावा.
पालकांकडून बाळाकडे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व प्रकारची उपाययोजना करावी. दाढी- कटिंग करताना न्हाव्यालासुद्धा नवीन ब्लेड वापरण्याचा हट्ट धरणे. एड्सग्रस्ताचे नेलकटर व ब्लेड वापरू नये, कारण यामुळे एड्स होण्याची शक्यता असते.
एड्स झाल्यास लपवून ठेवू नये
बरेच रुग्ण एड्स झाल्याचे निदान होताच तो लपवून ठेवतात हे योग्य नाही. त्याने घरातील सदस्यांना याबाबत माहिती द्यावी व उपाययोजना व उपचार करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. एड्स लपवणे म्हणजे या आजाराची दुसऱ्याला बाधा करणे होय.
याशिवाय सरकारी दवाखाने, उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी एड्सबाबत समुपदेशन केंद्रे आहेत. तिथे जाऊन ही माहिती घ्यावी. एड्सची माहिती जाणा आणि एड्स टाळा. कारण एड्सची माहितीच एड्सपासून बचाव करू शकते कारण यावर औषध नाही. औषध म्हणजे एड्सची पूर्ण माहिती जाणून घेणे.
ए.आर.टी. उपचार केंद्रात रुग्णांनी जाऊन जीवनमान सुधारावे. एच.आय.व्ही. एड्ससंबंधी गैरसमजुती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी लोकांना अचूक व संपूर्ण माहिती व प्रबोधनावर अधिक भर द्यावा. यामुळे लोकांना या रोगाचे गांभीर्य कळेल व ते गैरमार्ग टाळतील.
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर, स्वैच्छिक रक्तदान दिन आणि कुटुंब कल्याण जागृती पंधरवडा इत्यादी कार्यक्रमांतून लोकांमध्ये जनजागृती मोहीम पुढे नेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत. कारण एड्सबाबत खडान् खडा माहिती समाजातील स्त्री- पुरुषांनी जाणून घेण्याची नितांत गरज आहे. एड्सबाबत माहिती संकलित करा. तिचे वाचन करा व इतरांनाही याची माहिती द्या. दुष्परिणामांबाबत जागृती करा तरच एड्सला आळा बसेल.
रोगप्रतिकारक शक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोग लक्षणांचा समूह म्हणजेच एड्स होय. एड्स हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. जगामध्ये 1981 साली एड्स या आजाराची ओळख निर्माण झाली. एचआयव्ही विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि तेथूनच सगळ्या जगात पसरले असे मानले जाते.
यात माणसाची रोगप्रतिकार निकामी बनते. एड्स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगाची सहज लागण होऊ शकते. एचआयव्ही रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी खोकल्यासारखे साधे तसेच क्षयरोगासारखे संधिसाधू आजार होणे शक्य असते.
त्यावर इलाज करणेही अवघड होते. एचआयव्ही संसर्गापासून एड्स होईपर्यंत 8 ते 10 वर्षापेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एचआयव्हीने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकतात. या आजाराने असंख्य लोक जगात व देशात बळी पडले आहेत.
भारतात 1986 साली चेन्नई (मद्रास) येथे एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीचे निदान झाले. पाठोपाठ अनेक मोठ्या शहरातून जिथे तिथे एड्सच्या चाचणी सुविधा होती अशा ठिकाणी रुग्ण सापडू लागले आणि एड्स नावाचा भस्मासूर देशात उत्पन्न झाल्याची बातमी सर्वदूर पसरली.
हा रोग नेमका कशामुळे होतो, कसा पसरतो या विषयीच्या अज्ञानामुळे समाजाच्या सर्व थरांत प्रचंड भीती निर्माण झाली. एकीकडे असुरक्षित लैगिंक संबंध, दूषित रक्त संक्रमण, मातेकडून गर्भाला किंवा स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमण शिरेतून नशा आणणाऱ्या औषधांचा वापर या सर्व गोष्टीतून एचआयव्ही विषाणूंचा प्रसार व एड्सची झालेली लागण यामुळे एड्स रुग्णांच्या संख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक होता.
पण शासनस्तरावर केलेली जनजागृती, विविध स्तरावर केलेल्या उपाययोजना यामुळे एचआयव्ही एड्सचे प्रमाण आता कमी झाले आहे. भारतामध्ये 1986 साली मुंबईत एड्सचा पहिला रुग्ण आढळला.
रोगप्रसाराची कारणे :
- एचआयव्ही बाधीत व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध (94%)
- एचआयव्ही व्यक्तीचे रक्त किंवा रक्त घटक निरोगी व्यक्तीस दिल्यास (संक्रमण) (0.1%)
- एचआयव्ही बाधित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला (नाळेमार्फत) (3%)
- दूषित सुया व सिरींजेस (0.9%)
- इतर कारणाने (1%)
- समलैंगिक संबंधाद्वारे (1.0 %)
एड्स झाल्याचे कधी समजते :
एचआयव्हीचा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक संस्थेच्या पेशीवर हल्ला करून त्या नष्ट करतो. नष्ट झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी वेगाने निर्माण होत नाहीत. या पेशींच्या कमतरतेमुळे बाधित व्यक्ती क्षयरोग, कॅंडिडियासीस, नागीण इ. विविध संक्रमणामुळे आजारी होतो. एचआयव्ही संक्रमणाची अंतिम टप्प्याची म्हणजे एड्सची सुरुवात होते. तोपर्यंत बाधित व्यक्ती तिसऱ्या अवस्थेत असते.
एचआयव्ही एड्स चाचणीविषयी :
- एचआयव्ही इलाइसा चाचणी (मार्च 1985) एचआयव्ही संवर्गाचे निदान होते.
- वेस्टर्नब्लॉट 100 टक्के खात्रीशीर चाचणी.
- पी.सी.आर. जगात सर्वात सुधारित/प्रगत चाचणी. डीएनएची तपासणी करतात. लागण झाल्यास तिसऱ्या दिवशी निदान होऊ शकते.
- एचआयव्ही एड्सवरील औषध झिडो ड्युडीन नेव्हरॅपिन ही सर्व औषधे विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णांचे आयुष्य वाढते.
- एचआयव्ही बाधित गर्भवती महिलेकडून होणाऱ्या बाळाला एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी नेव्हरॅपिन सिरप व मातेला नेव्हरॅपिन गोळ्या प्रसुतीवेळी रुग्णालयात मोफत देण्यात येतात.
- एड्स प्रतिबंधक लस अद्याप उपलब्ध नाही. यासाठी प्रतिबंध हाच खरा उपचार ठरतो.
ऍन्टी रिटेव्हायरल थेरपी (एआरटी) –
सी.डी.-4 : शरीरात रक्तात पांढऱ्या व लाल पेशी असतात. पांढऱ्या पेशीत लिंफोसाईड नावाची पेशी असते. लिंफोसाईडचे टी सेल व बी सेल असे प्रकार आहेत. त्यापैकी एक सीडी-4 वर हल्ला करतो आणि त्या पेशीमध्ये जाऊन उत्पादन होते. म्हणजे विषाणूंची संख्या प्रचंड गतीने वाढते.
मात्र, विषाणूंचे उत्पादन होण्यासाठी एन्झाईमची निर्मिती होऊ देत नाही. त्यामुळे एचआयव्ही विषाणूचे उत्पादन थांबते. याप्रमाणे एचआयव्ही बाधीत रुग्णांची सीडी-4 पेशींची संख्या कमी होत नाही व विषाणू आटोक्यात येतो. यामुळे रुग्ण सुदृढ राहतो. संधिसाधू आजार होत नाही. त्याचे सर्व आयुष्य सामान्यांसारखे असते. अशाप्रकारे ऍन्टीरिटे वायरल एआरटी औषधांचा उपयोग होतो. सामान्य व्यक्तींमध्ये 500 ते 1500 सी.डी.-4 ची संख्या असते.
विंडो पिरियड म्हणजे काय :
शरीरात एचआयव्हीची बाधा झाल्यानंतर लगेचच एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह (सकारात्मक) येत नाही. कारण शरीरात ऍन्टीबॉडीज तयार होण्यासाठी 4 ते 6 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. ऍन्टीबॉडीज तयार झाल्यानंतर एचआयव्हीची चाचणी सकारात्मक येते.
एचआयव्ही तपासणी फायदे व महत्त्व :
केंद्रशासन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा कार्यक्रम देशात सर्वच स्तरावर राबवला जातो. महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व एड्स नियंत्रण संस्था यांच्यटटा अधिपत्याखाली रुग्णालये, आयोजित शिबिर, फिरते मोबाइल शिबिरात एचआयव्हीची चाचणी मोफत केली जाते. रिपोर्टबद्दल गुप्तता पाळली जाते.
यासाठी एचआयव्ही एड्ससारखा आजार कोणालाही होऊ नये म्हणून प्रत्येकाने रुग्णालयात, आयोजित शिबिरात, जाऊन स्वत:हून एचआयव्ही चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून भारत एड्समुक्त होईल. पुढील आरोग्य सुखी समाधानाने जगू शकाल. मानवी जीवन सुखी-समृद्ध होईल.
या कारणांमुळे एड्सचा प्रसार होत नाही:
- एचआयव्हीबाधीत व्यक्तीला स्पर्श केल्याने.
- त्या व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने.
- गळाभेट घेतल्याने किंवा एड्स बाधित व्यक्तीला चावलेला डास अबाधित व्यक्तीला चावला तरी एड्स होत नाही.
- एचआयव्ही बाधित व्यक्तीसोबत जेवण केल्यास किंवा त्या व्यक्तीची भांडी
- वापरल्याने तसेच कपडे वापरल्याने किंवा एकाच स्नानगृहात किंवा शौचालयाचा वापर केल्यानेही एड्स होत नाही.
- बाधित व्यक्तीची सेवा शुश्रुषा केल्यानेही एड्स होत नाही.
- निरोधचा वापर.
एड्स हेल्पलाईन क्रमांक 1097 :
एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एचआयव्हीविषयी माहितीसाठी तसेच अतिजोखीमग्रस्त घटक असलेला ट्रकडायव्हर व अन्य व्यक्तीस एड्सविषयी माहिती पाहिजे असल्यास हेल्पलाईन नं. 1097 असून एचआयव्ही एड्सबाबत माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
एचआयव्हीचे परिणाम:
एचआयव्ही बहुतेक वेळा एचआयव्ही बाधित व्यक्तीसोबत असुरक्षित संयोग केल्यामुळे होत असतो, तो न होण्यासाठी घ्यावयाची जी काळजी असते तीच वेळेवर घेतली जात नाही. आपण ज्या व्यक्तीबरोबर संयोग करत आहोत ती जर एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्या व्यक्तीलाही त्याची लागण होऊ शकते.
आपण आपला जीव धोक्यात घालत आहोत, हे त्यावेळी लक्षात येत नसते; परंतु जेव्हा निदान होते तेव्हा मात्र आपल्या हातात काहीच उरलेले नसते आणि याच बहुतांशी परिणाम आपल्या मनावरही होत असतो, जो शारीरिक आणि सामाजिक परिणामापेक्षाही खूप भयंकर असतो.
एचआयव्ही जसजसा वाढत जातो तसतसे बदल शरीरातही होत जातात, बऱ्याचदा हे बदल औषधोपचार सुरू असतानाही होतात. या बदलांना लायफोडिस्टोफी असंही म्हणतात.