Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Cororna Update: भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण का वाढताहेत? मोठं कारण समोर

by
May 31, 2025
in आरोग्य वार्ता
A A
Cororna Update: भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण का वाढताहेत? मोठं कारण समोर
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोविड-१९ चा नवा प्रकार JN.1 मुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या १,०१० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे.

केरळ, महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक रुग्ण:
देशातील सक्रिय रुग्णसंख्या १,००० च्या पुढे गेली आहे. यात केरळमध्ये सर्वाधिक ४३०, महाराष्ट्रात २०९ आणि दिल्लीत १०४ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, गुजरातमध्ये ८३, कर्नाटकात ८० आणि राजस्थानात ७६ सक्रिय रुग्ण आहेत. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, नव्या प्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत आहे, पण सध्या गंभीर धोका नाही.

JN.1 प्रकाराचे दोन धोके:
हा नवा प्रकार मानवी रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करू शकतो आणि दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता तुलनेने जास्त आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे (ICMR) महानिदेशक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, सध्या संसर्गाची तीव्रता कमी असून, बहुतांश प्रकरणे सौम्य आहेत. प्रथम दक्षिण भारतात, नंतर पश्चिम आणि आता उत्तर भारतात रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे.

रुग्णवाढीमागील कारण काय?:
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, विषाणू स्वतःला टिकवण्यासाठी सतत स्वरूप बदलत असतो. यामुळे मानवी शरीराला हा बदल समजण्यास वेळ लागतो. शिवाय, बहुतांश लोकांना लस घेऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, ज्यामुळे काहींची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाली आहे. यामुळे विषाणू काही लोकांवर हावी होऊन वेगाने पसरत आहे.

सावधगिरीचा इशारा:
आरोग्य तज्ज्ञांनी मास्क वापरणे, गर्दी टाळणे आणि लसीकरण अद्ययावत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Join our WhatsApp Channel

The post Cororna Update: भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण का वाढताहेत? मोठं कारण समोर appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar