Corona virus : पुन्हा एकदा कोरोनाच्या JN.1 या नवीन प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ख्रिसमस आणि नवनर्षाच्या स्वागतावर कोरोनाच्या नवीन प्रकाराचे सावट असल्याचे दिसून येत आहे. अनेक लोक याला कोरोनाच्या नव्या लाटेची सुरुवात मानत असताना आरोग्य तज्ज्ञांनी याविषयी महत्वाचे विधान केले आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने याला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असे म्हटले आहे.
कोरोना व्हायरसचे पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे. आता नवीन शहरांमध्येही रुग्ण आढळून आल्याची प्रकरणे समोर येत आहेत. गाझियाबाद, एनसीआरमध्ये पुन्हा एक नवीन रुग्ण आढळला आहे. नोएडामध्येही एक रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. बिहारमधील पाटणा येथे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांचा प्रवास इतिहास आहे. सरकारपासून प्रशासनापर्यंत सर्वत्र सतर्कता असून लोकांना मास्क घालून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
याआधी केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गोव्यात नवीन सब-व्हेरियंट कोविडची प्रकरणे समोर आली आहेत. गोव्यातील कोरोना नमुन्यांमध्ये उप-प्रकार JN.1 आढळला आहे. परंतु ही जुनी प्रकरणे आहेत आणि आता सक्रिय नाहीत. केरळमध्ये 8 डिसेंबर रोजी असे पहिले प्रकरण आढळले होते, त्यानंतर केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत पाळत ठेवण्याचा सल्ला दिला होता. बेंगळुरूमध्ये सहा दिवसांपूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.
The post Corona virus : कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटमुळे देशात नव्या लाटेची सुरुवात ? ;अनेक नवीन शहरांमध्ये कोरोनाची एन्ट्री appeared first on Dainik Prabhat.