Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Corona Update: ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू, मुंबईत रुग्णसंख्येत वाढ

by
May 24, 2025
in आरोग्य वार्ता
A A
Corona Update: ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू, मुंबईत रुग्णसंख्येत वाढ
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Corona Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 21 वर्षीय तरुणाचा आज पहाटे 6 वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी असून, ठाणे जिल्ह्यातील यंदाचा कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाला 22 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली, जी 23 मे रोजी पॉझिटिव्ह आली. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने आज पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत कोरोनाचा उद्रेक –
मुंबईतही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 23 मे रोजी राज्यात 45 नव्या रुग्णांची नोंद झाली, यापैकी 35 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. सध्या मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 185 वर पोहोचली आहे. मे महिन्यापासून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासनाचे आवाहन –
राज्यात आणि देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी योग्य खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, लक्षणे दिसल्यास तात्काळ चाचणी करून उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
या घटनेमुळे ठाणे आणि मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

Join our WhatsApp Channel

The post Corona Update: ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू, मुंबईत रुग्णसंख्येत वाढ appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar