दाह कमी होण्यास धन्याचा उपयोग
धने रात्री पाण्यात भिजत घालावे. सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात 10 ग्रॅम खडीसाखर घालून ते पाणी प्यायल्याने पित्तज्वराने होत असलेला दाह दूर होतो. धने व खडीसाखर घेतल्याने पोटात होणारा दाह शांत होतो. ( coriander seed benefits in marathi )
मूत्रघाताचा विकार बरा करण्यास धन्याचा उपाय
धने अतिशय गुणकारी आहेत. धने आणि गोखरूचा काढा बनवावा. काढा बनवताना उकळून चांगला आटवावा त्यात थोडे तूप घालून मूत्रघाताच्या विकारावर प्यायला द्यावा.
अजीर्णावर धन्याचा उपाय
धने हे पाचक व कामोददीपक आहेत. सुगंधी आहेत, उत्तेजक आहेत. 10 ग्रॅम धन्याचीपूड अजीर्ण झाले असता थोडी थोडी नियमित घ्यावी म्हणजे पचनसंस्था सुधारेल.
पोटशुळावर धन्याचा उपाय
धन्यापासून काढलेले तेल हे वातहारक असल्याने अत्यंत गुणकारी आहे. आणि त्याचा पोटशुळावर फायदा होतो.
बिब्बा उतल्यास धन्याचा उपाय ( coriander seed benefits in marathi )
बिब्बा उतल्याने फोड येतात किंवा कधी कधी बिब्बाचा धूर लागून सूज येते. अशावेळी कोथिंबिरीचा रस उतलेल्या ठिकाणी लावावा. कोथिंबीर न मिळाल्यास धने घ्यावेत. ते पाण्यात बारीक वाटून गंधाइतपत मिश्रण तयार करावे. व बिब्बा उतलेल्या जागेवर लेप द्यावा.
रक्तपित्त बरे करण्यासाठी धन्याचा उपाय
धने, द्राक्ष आणि बेदाणे एकत्र करून पाण्यात उकळवावी. व त्याचा काढा करून तो रक्तपित्त झालेल्या रोग्याला द्यावा. म्हणजे रक्तपित्त बरे होते.
पोटदुखीवर धन्याचा उपाय
पोट दुखत असल्यास 10 ग्रॅम धने घ्यावेत. त्याची बारीक पूड करावी. आणि पोटात दुखत असलेल्या रोग्याने कोमट पाण्याबरोबर घ्यावी.
आमविकाराने आलेल्या तापात धन्याचा उपाय : काही वेळा आमविकाराने ताप येतो व तो हाटत नाही. अशावेळी 10 ग्रॅम धने आणि 10 ग्रॅम खडीसाखर 10 मि.ली ग्रॅम पाण्यात 1 तास भिजवून ठेवावी.नंतर ती पाण्यात चांगली कुस्करून एकजीव करावी. मग हे मिश्रण गाळावे. आणि चोथा वेगळा करून गाळलेले मिश्रण आमविकाराने त्रस्त रोग्याला द्यावे. म्हणजे दोन तासात रोग्याचा ताप बरा होईल. व त्याला घाम येईल.
धन्याचा जुलाबावर उपाय ( coriander seed benefits in marathi )
10 ग्रॅम धन्याची बारीक पूड खावी. आणि वरून कोमट पाणी प्यावे. जुलाब व्हायचे थांबतात.
अशक्तपणावर धन्याचा उपाय
धने हे तुरट, स्निग्ध, पाचक, उष्णवीर्य, अग्निप्रदिपक, उत्तेजक, उदरवातहर असल्यामुळे धन्याचा काढा रोज प्यावा. बलवृद्धी होते.
श्वसनाच्या विकारावर धन्याचा उपाय
धने हे श्वसनाच्या विकारावर अतिशय उपयुक्त आहे. धने अणि बेदाणे एकत्र करून त्याचा काढा नियमित घ्यावा. दम्यासारखे विकार बरे होतात.
संर्पदंशावर/विष उतरवण्यास धन्याचा उपाय
जर का धन्याचे चूर्ण व खडीसाखर दह्यामध्ये कालवून खाल्ली तर विषबाधा टळते.
मादक पदार्थांचा प्रभाव कमी करण्यासाठी धने
10 ग्रॅम धने बारीक पूड करून खावे. वरून कोमट पाणी प्यावे. दारू, अफू, गांजा, चरस यासारख्या मादक पदार्थांचा प्रभाव कमी होतो. इतक धने उपयुक्त आहेत.
दीर्घकाळची सूज उतरवण्यास धन्याचा उपाय: ( coriander seed benefits in marathi )
काही वेळा सूज बरेच दिवस राहते. अशावेळी धने आणि सातूचे पीठ समप्रमाणात एकत्र वाटून त्याचे पोटीस सूज झालेल्या भागावर बांधावे. पोटीस करताना पातळसर कापडात धने आणि सातुचे पीठ बांधावे. म्हणजे सूज उतरले.
कफप्रधान हत्तीरोगावर धन्याचा उपाय
हत्तीरोग म्हणजे सर्वांगांवर सूज आणि शरीरात कफ झाल्याने हत्ती रोग बरा होत नाही अशावेळी सुके धने वाटून अथवा कोथिंबीर वाटून तिचा लेप शरीरावर देतात. किंवा धन्याच्या सुगंधी तेजाने मॉलीश करतात. म्हणजे धने हे शितवीर्यही आहे.
लहान मुलांना ताप आल्यास धन्याचा उपचार( coriander seed benefits in marathi )
धने व बडीशेपेचा काढा दिल्याने शरीरातील घाम निघून जातो व ताप उतरतो. धने व बेदाणे यांचे पाणी पित्ताने चढलेल्या तापात उपयोगी पडते. 10 ग्रॅम धने, 10 ग्रॅम खडीसाखर, शंभर मिली पाण्यात भिजत घालून नंतर ते पाण्यात चांगले कुस्करावेत. नंतर ते पाणी गाळून रोग्यास प्यायला दिल्यास घाम येऊन ताप कमी होतो.
डोळ्यात फूल पडले असता धन्याचा उपाय
जर का डोळ्यात फूल पडले असेल तर कोथिंबीर वाटून तिचा रस पातळसर स्वच्छ फडक्यात गाळावा किंवा धन्याचा रस धने वाटून काढावा आणि तो कोमट पाण्यात कुस्करून तो गाळून घ्यावा. त्याचे दोन दोन थेंब दोन्ही डोळ्यांत सकाळ-संध्याकाळ टाकावे.
जास्त उन्हात फिरल्यास धन्याचा उपाय
उन्हातून आल्यावर गार पाण्यात धने कुस्करावे आणि थोडी खडीसाखर घालावी. आणि हे सरबत प्यावे. लगेचच हुशारी वाटेल.
डोकेदुखीवर धन्याचा उपाय ( coriander seed benefits in marathi )
काही वेळा अतिशय डोकेदुखीने माणूस अस्वस्थ होतो. अशावेळी धने हे डोकेदुखी दूर करण्यास अतिशय उपयुक्त आहे. धन्या-जिऱ्याची पूड समप्रमाणात घ्यावी. पाणी उकळून त्यात गवतीचहा टाकावा आणि त्यात ही धन्या-जिऱ्याची पुडही घालावी. चवीला थोडी साखरही टाकावी. असा चहा जर दिवसातून तीन-चार वेळा घेतला तर डोकेदुखी थांबते.
अतिरिक्त उष्णतेवर धन्याचा उपाय
धने तुरट, स्निग्ध, वीर्यासाठी अहितकारक, मूत्रवर्धक, हलके, कडवट, तिखट, उष्णवीर्य, अग्निप्रदीपक, पाचक, ज्वरनाशक, रूचीवर्धक, तसेच, जुलाबात गुणकारी, पाकात मधुर, त्रिदोष दूर करणारे आहेत. तृषा, दाह, उलटी, श्वास, खोकला, अशक्तपणा, पोटातील कृमी हे विकार नष्ट करण्याचे गुण धन्यामध्ये आहेत. म्हणूनच रोज पाच ग्रॅम धने, उकळून त्यात दूध व साखर घालून नेहमीसारखा चहा करावा व प्यावा. त्यामुळे पित्ताचे विकार व शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होते.