आपला स्वयंपाक बिघडू नये, असे सर्वांनाच वाटते. यासाठी स्वयंपाकाच्या छोट्या टिप्स उपयोगी पडतात. यामुळे केवळ दररोजचे जेवण तयार करणे सोपे होत नाही, तर उलट ते कमी वेळात तयार होतात. काहीवेळा अन्न घाईत गडबडीत तयार केले जाते की त्याला चव येत नाही. पण जर तुम्ही या स्वयंपाकाच्या टिप्स फॉलो केलात तर त्यामुळे पटकन तयार होणारे अन्नही अतिशय चविष्ट होण्यास तयार होईल.
चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या किचन टिप्स आहेत ज्यामुळे स्वयंपाक करणे सोपे होईल.
डाळ अशाप्रकारे करा
रोजची तूर डाळ घरातील सदस्यांना फिकी वाटत असल्यास त्याची टेस्ट वाढवण्यासाठी प्रथम डाळ शिजवून घ्या. नंतर कढईत जिरे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडा गरम मसाला टाकून मिसळून घ्या. नंतर यात शिजलेली फिकी डाळ घाला. यामुळे डाळीची चव दुप्पट वाढेल आणि सर्वांनाच आवडेल.
मीठ असे टाका
जर तुमच्या जेवणात मीठ जास्त नको असेल तर लक्षात ठेवा मीठ शेवटचे घालायचे आहे. भाजी शिजल्यावर किंवा डाळ शिजल्यावर शेवटी मीठ टाकल्यास जास्त मीठ लागत नाही आणि चवही वाढेल.
खीर अशी बनवा हेल्दी
खीर शिजल्यावर त्यात साखर टाकली जाते. पण जर तुम्हाला हेल्दी खीर बनवायची असेल तर गोडपणासाठी गूळाचे तुकडे टाका. यामुळे खीरची चवही वाढेल आणि ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. त्यामुळे जर तुम्हाला गोड खायला आवडत असेल तर गुळाची खीर बनवा आणि आरामात सर्व्ह करा. हे चविष्टही बनेल आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
Kitchen Hacks : ‘या’ सोप्या युक्तीने स्वच्छ करा प्रेशर कुकरची काळी पडलेली शिट्टी !
बेसन संपले तर असे बनवा भजी
घरात बेसन संपले आणि भजी पकोडे बनवायचे असतील तर बाजारात धावण्याची गरज नाही. घरी ठेवलेल्या हरभऱ्याची डाळ ग्राइंडरमध्ये बारीक करून बेसन झटपट तयार करता येते. आणि वेळ असेल तर हरभरा डाळ अर्धा तास भिजत घालावी. नंतर ते बारीक करून भजी बनवा. खूप चवदार तयार होईल.
The post Cooking Tips : ‘या’ टिप्समुळे स्वयंपाक कधीही बिघडणार नाही ! appeared first on Dainik Prabhat.