Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Cooking Oil: स्वयंपाकात वापरले जाणारे तेल ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या कोणती तेलं टाळावीत

by
December 25, 2025
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Cooking Oil: स्वादिष्ट जेवण प्रत्येकालाच हवं असतं. नवनवीन रेसिपी करून पाहण्याचा उत्साह विशेषतः गृहिणींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मात्र चव जपताना कुटुंबाच्या आरोग्याशी तडजोड नको, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. बाजारात उपलब्ध असलेली अनेक कुकिंग ऑइल्स ‘आरोग्यदायी’ असल्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात काही तेलांचा अतिवापर शरीरासाठी गंभीर ठरू शकतो. लठ्ठपणा, हृदयरोग, सांधेदुखी, सूज, जळजळ यांसारख्या समस्या वाढण्यामागे स्वयंपाकात वापरले जाणारे तेलही कारणीभूत ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात कोणते तेल वापरतो आणि त्याचे प्रमाण किती आहे, याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅट किंवा ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचा अतिरेक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

पाम तेलामध्ये सुमारे ५० टक्के सॅच्युरेटेड फॅट असते. हे फॅट शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढवते. एलडीएल कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक साचतो आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे पाम तेलाचा नियमित किंवा जास्त प्रमाणात वापर टाळणे गरजेचे आहे.
सोयाबीन तेलात ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. या तेलाचे अति सेवन केल्यास शरीरात सूज वाढू शकते आणि सांधेदुखीचा त्रास बळावू शकतो. आधीच सांधेदुखी किंवा दाहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी या तेलाचा वापर मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, मात्र त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे तितकेच महत्त्वाचे आहे. हे तेल सलाड ड्रेसिंग, चटण्या, डिप्स किंवा कच्च्या स्वरूपात वापरण्यास योग्य असते. मात्र जास्त आचेवर स्वयंपाक करताना ऑलिव्ह ऑईल वापरल्यास पचनाच्या समस्या, अतिसार तसेच त्वचेवर मुरुम आणि लाल पुरळ येण्याची शक्यता वाढू शकते.

व्हेजिटेबल ऑइलच्या नावाखाली बाजारात मिळणाऱ्या मका, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या मिश्रणातही ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. या तेलांचा अतिरेक केल्यास शरीरात जळजळ, सूज वाढू शकते. तसेच दीर्घकाळ जास्त सेवन केल्यास हृदयात ब्लॉकेज होण्याचाही धोका संभवतो.

कॉटन सीड ऑइलमध्येही ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते. या तेलाचे जास्त सेवन केल्यास एलर्जी, त्वचेवर पुरळ, खाज, डोळ्यांची जळजळ किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिडचे अति सेवन उच्च रक्तदाबाचा धोका वाढवू शकते.
आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, एकाच प्रकारचे तेल दीर्घकाळ वापरण्याऐवजी मर्यादित प्रमाणात आणि योग्य पर्यायांचा विचार करून तेलाची निवड करणे फायद्याचे ठरते. स्वयंपाकात तेलाचे प्रमाण कमी ठेवणे, योग्य तापमानावर तेल वापरणे आणि आहारात संतुलन राखणे यामुळे चव आणि आरोग्य दोन्ही जपता येऊ शकते.

Join our WhatsApp Channel

The post Cooking Oil: स्वयंपाकात वापरले जाणारे तेल ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या कोणती तेलं टाळावीत appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar