सध्या देशभरात कडाक्याची थंडी पडत आहे. आपल्या पुण्यातील पाराही चांगलाच घसरल्यामुळे हुडहुडी भरू लागली आहे. हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवला तर येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत थंडीपासून दिलासा मिळावा म्हणून लोक रूम हिटरची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत.
विशेष म्हणजे थंडीचा हंगाम लक्षात घेता बाजारात रूम हिटरची अत्यंत महागड्या दराने विक्री होत आहे. याशिवाय त्यांचा वापर केल्यावर दरमहा खूप जास्त वीज बिल येते. त्याचा विपरीत परिणाम आपल्या खिशावर होतो. जर तुम्हाला बाजारात विकले जाणारे महागडे रूम हीटर्स परवडत नसतील, तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही हिवाळ्याच्या काळात तुमची खोली उबदार ठेवू शकता. खोलीतून थंडी पळवण्यासाठी हे रामबाण उपाय आहेत.
चला, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया –
* जर तुमची खोली खूप थंड असेल तर ती उबदार ठेवण्यासाठी आपण खिडक्या आणि दारांवर जड आणि गडद रंगाचे पडदे लावावे. असे केल्याने बाहेरून येणारी थंड हवा घरात प्रवेश करू शकणार नाही. हे खोली उबदार ठेवेल.
* हिवाळ्यात नेहमी दार बंद ठेवावे. त्यामुळे बाहेरून थंड हवा आत येऊ शकणार नाही. तसेच, तुम्ही तुमच्या खोलीचा दरवाजा गरजेच्या वेळीच उघडावा.
* दुसरीकडे, जर तुमच्या खोलीच्या दाराखाली फट असेल, जिथून बाहेरून थंड हवा आतमध्ये प्रवेश करत असेल तर ती फट जुन्या कापडाने किंवा इतर वस्तूने झाकून ठेवावी.
IRCTC : चार्ट तयार करण्यापूर्वी ट्रेनची तिकिटे रद्द केल्यावर किती शुल्क कापले जाते? जाणून घ्या …
* हिवाळ्यात फरशा खूप थंड पडतात. या प्रकरणात, निश्चितपणे जमिनीवर कार्पेट किंवा सतरंजी पसरवून ठेवा. याशिवाय, तुमची खोली उबदार ठेवण्यासाठी तुम्ही सुगंधी मेणबत्ती देखील लावू शकता.
The post Cold Wave : कडाक्याच्या थंडीत ‘या’ सोप्या युक्तींनी हिटरशिवायही ठेवा आपले घर उबदार ! appeared first on Dainik Prabhat.