Clove Tea Benefits : चहा आरोग्यासाठी हानिकारक आहे की त्याचे सेवन योग्य आहे? हा चर्चेचा विषय आहे. अभ्यासातही संमिश्र परिणाम आहेत. काही संशोधने असे सुचवतात की चहाचे जास्त सेवन केल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या वाढू शकतात, तर काहींचा असा विश्वास आहे की त्याचे मध्यम सेवन आरोग्यासाठी चांगले आहे.
चहा त्याच्या सुगंध आणि ताज्यातवान्या अनुभूतीसाठी जगभरात प्रिय आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. दरम्यान, तुम्ही जर हिवाळ्यात चहा मध्ये ‘लवंग’ टाकून पिल्यास तुम्हाला त्याचा आणखी फायदा होऊ शकतो.
यात फॉस्फोरस, पोटॅशिअम, प्रोटीन, आयर्न, सोडियम, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम आणि हायड्रोक्लोरिक एसिड भरपूर प्रमाणात असतात. आणि याच्या आपल्या आरोग्याला भरपूर प्रमाणात फायदा होतो. आणि यावर आज आपण एक नजर टाकणार आहोत…
– पचनक्रियेसंबंधी समस्या…
लवंगाचा चहा पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. लवंगीचा चहा पचनक्रिया चांगली करतो आणि एसिडिटी कमी करतो. जेवण करण्याआधी लवंगाचा चहा सेवन केल्यास लाळ अधिक प्रमाणात तयार होते आणि याने अन्न पचन होण्यास मदत होते.
– दातांचं दुखण…
ज्या लोकांना दातांमध्ये वेदना होण्याची समस्या असते, त्यांना हा चहा आवर्जून घ्यावा. यात एन्टी-बॅक्टेरिअल गुण असतात. लवंगाचं तेल दातांच्या वेदना दूर करण्यासाठी फार फायदेशीर आहे. लवंगाचा तेल लावल्याने वेदना लगेच दूर होतात.
– अर्थरायटिस…
जर तुम्ही अर्थरायटिसच्या वेदनांनी हैराण झाले अशाल तर लवंगाचा चहा तुम्हाला आराम देऊ शकतो. यात असलेल्या एनाल्जेरसिक तत्वांमुळे सांधेदुखी, मांसपेशीमध्ये वेदना आणि सूज कमी केली जाते. तसेच लवंगाच्या चहाने प्रभावित जागेवर शेकल्यासही फायदा होतो.
– डोकेदुखी…
डोकेदुखी होत असेल तर लवंग बारीक करुन लगेच कपाळावर लावल्यास फायदा होतो. लवंगाचं तेलही डोकेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. खोबऱ्याच्या तेलात लवंगाच्या तेलाचे काही थेंब मिश्रित केल्यास लगेच आराम मिळेल.
– तोंडाची दुर्गंधी…
लवंगाची चहा प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. यात आढळणारे पोषक तत्व तोंडाच्या दुर्गंधीशिवाय हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर करण्यास मदत करते.
– कसा कराल चहा…
लवंगाचा चहा तयार करण्यासाठी चार ते पाच लवंग उकडून घ्या. यात मध मिश्रित करुन दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा. याने अस्थामाच्या रुग्णांना फायदा होतो.
The post Clove Tea Benefits : लवंग एक फायदे अनेक ! थंडीच्या दिवसात ‘लवंग चहा’ पिण्याचे फायदे एकदा पाहाच; वाचून व्हाल अवाक्…. appeared first on Dainik Prabhat.
