Christmas Day 2023 : दरवर्षी ख्रिसमस हा सण ख्रिश्चन समुदायातील लोक अत्यंत आवडीने साजरा करतात. या दिवसानिमित्त आपल्या प्रिय व्यक्तींना गिफ्ट्स दिले जातात, सांता क्लॉज बनवला जातो आणि ख्रिसमस ट्री सजवलं जातं. ख्रिसमसच्या दिवशी लोक आपल्या घरात अत्यंत आकर्षक सजावट करतात. ख्रिश्चन समुदायातील लोक या दिवशी आवर्जून चर्चमध्ये जातात आणि आपल्या प्रियजनांसह वेळ घालवतात. मात्र ख्रिसमसनिमित्त लोक ख्रिसमस ट्रीला अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवतात. मात्र या दिवशी ख्रिसमस महत्त्व का दिले जाते? त्यामागचा इतिहास काय हे जाणून घेऊ.
ख्रिसमस ट्रीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ते जीवनाच्या सातत्याचे प्रतीक मानले जाते. ख्रिश्चन लोकांसाठी आशीर्वाद म्हणून ख्रिश्चन वृक्षाची निवड प्रभुने केली आहे. लोकांचा असा विश्वास आहे की ख्रिसमस ट्री सजवल्याने व्यक्तीचे आयुष्य वाढते. म्हणूनच ख्रिसमस ट्री आकर्षकरित्या सजवली जाते.
ख्रिसमस ट्रीचा इतिहास काय आहे?
ख्रिसमस ट्रीबद्दल लोकप्रिय समजुती आहेत. एका मान्यतेनुसार, ख्रिसमस ट्रीची सुरुवात १६व्या शतकातील ख्रिश्चन सुधारक मार्टिन ल्यूथर यांनी केली होती. 24 डिसेंबर रोजी, मार्टिन ल्यूथर संध्याकाळी एका बर्फाळ जंगलातून चालत असताना त्यांना एक सदाहरित झाड दिसले आणि या झाडाच्या फांद्या चंद्रप्रकाशाने चमकत होत्या. यानंतर मार्टिन ल्यूथरने हे झाड आपल्या घरात लावले आणि येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसानिमित्त मेणबत्त्या आणि रोषणाईने हे झाड सजवले जाऊ लागले.
ख्रिसमसला एक झाड सजवले जाते ज्याला ख्रिसमस ट्री म्हणतात. जगातील ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सर्वप्रथम जर्मनीमध्ये सुरू झाली. ते सजवण्याचे आणि लोकप्रिय करण्याचे श्रेय धार्मिक उपदेशक बोनिफल युटो यांना दिले जाते.
त्यानंतर ख्रिसमसच्या झाडाची विक्री प्रथम अमेरिकेत 1800मध्ये झाली. अमेरिकेतील एका व्यापाऱ्याने सन 1851मध्ये ख्रिसमसच्या झाडाची विक्री सुरू केली. एका अहवालानुसार अमेरिकेत दरवर्षी 20 ते 30 दशलक्ष ख्रिसमस ट्री विकले जातात. येथील बहुतेक शेतात अनेक ख्रिसमस ट्री तयार केले जातात.
The post Christmas Day 2023: ‘ख्रिसमस ट्री’ का सजवली जाते? जाणून घ्या रंजक इतिहास appeared first on Dainik Prabhat.