प्रत्येक ऋतुत त्या-त्या मोसमानुसार बाजारात फळे आणि भाज्या मिळत असतात. परंतु. प्रत्येक ऋतुत येणारी भाजी ही आपल्या शरीराला फायदेशीर ठरतेच असे नाही त्यामुळे कधीतरी आपल्याला विशेष ऋतूत विशेष भाजी खाल्ल्यानंतर विशेष सुचक त्रास जाणवतो, पण त्याची कारणे लक्षात येत नाही. आपल्याला असणारे आजार किंवा वातावरणानुसार आपल्या शरिरात होणारे बदल यांचादेखील आपल्या खाण्या-पिण्यावर परिणाम होत असतो. त्यामुळेच प्रत्येक ऋतुत खास भाज्यांची निवड करणे योग्य ठरते.
* भेंडी, ढोबळी मिरची, वांगी, टोमॅटो यांसारख्या फळभाज्या पावसाळ्यात खाणे योग्य ठरेल.
* या भाज्या कॅन्सरप्रतिरोधी अँटिऑक्सिडंट असल्याने फायदेशीर; परंतु ज्यांना किडनी विकार आहेत त्यांनी हे न खाणेच उत्तम.
* लाल, दुधीभोपळा, कारले, पडवळ, दोडका या वेलभाज्या उन्हाळा आणि पावसाळ्यात खाव्यात.
* स्थूल, बैठी जीवनपद्धती असलेल्या, स्तनदा महिलांना, धमनीविकार असलेल्यांना, वयस्कर लोकांना या भाज्या खाणे जास्त उपयुक्त ठरेल.
* हिवाळा आणि उन्हाळ्यात पालेभाज्या फायदेशीर
* मेथी, पालक, शेपू, राजगिरा, माठ या पालेभाज्या हिवाळा आणि उन्हाळ्यात खाणे फायदेशीर असते.
* मलविरोध, अँसिडिटी, स्थूल, गर्भवती व बैठी जीवनपद्धती असणार्यांनी पालेभाज्या आवर्जून खाव्यात. किडनी विकार असणाऱ्यांनी मात्र या भाज्या टाळाव्यात.
कांदा, लसूण, बटाटा, सुरण, रताळे,बीट यासारख्या कंद भाज्या खाणे उन्हाळ्यात हितकारक असते. परंतु, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी बीट, रताळे आणि बटाटा वज्य्र करावे. तर हिवाळ्यात शेवगा, मटार, घेवडा, गवार, वाल-पावटे अशा शेंगच्या भाज्या खाण्यास योग्य आहेत. गॅसेस, मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांनी या भाज्या अजिबात खाऊ नये. हायकोलेस्टेरॉल, उच्चरकतदाब, मधुमेहींनी या भाज्या खाणे फायदेशीर असते.