Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Children’s Day 2025 Wishes: ‘बालपण देगा देवा’… देशभरात उत्साहात साजरा होणार निरागसतेचा सण; गोड आणि हटके शुभेच्छांचा वर्षाव

by
November 14, 2025
in लाईफस्टाईल
A A
Children’s Day 2025 Wishes: ‘बालपण देगा देवा’… देशभरात उत्साहात साजरा होणार निरागसतेचा सण; गोड आणि हटके शुभेच्छांचा वर्षाव
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Children’s Day 2025 Wishes: १४ नोव्हेंबर देशभरात आजचा दिवस निरागसतेचा, आनंदाचा आणि हास्यानं उजळलेल्या बालपणाचा सण म्हणून साजरा केला जातो. बालदिन हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो. नेहरूजींना मुलांबद्दल अपार प्रेम असल्याने त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या या प्रेमभावनेतून जन्माला आलेला हा सण आजही मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणि मोठ्यांच्या मनात आठवणींचा पाऊस पाडतो.

शाळांपासून घराघरांत उत्साह

बालदिनानिमित्त आज देशभरातील शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धां, विशेष गिफ्ट्स, डान्स, स्किट्स आणि फॅन्सी ड्रेस शो अशा विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. शिक्षक आणि पालक मुलांसाठी दिवस खास बनवण्यासाठी उत्साहात सहभागी होतात. लहानग्यांच्या चेहऱ्यावर खुललेलं कोवळं हसूच या सणाची खरी शोभा ठरते.

बालदिनाचा संदेश: छोट्या स्वप्नांना मोठं करुया

आजच्या दिवशी मुलांना निरागसतेचा, स्वातंत्र्याचा, निर्मळ स्वप्नांचा तसेच सुरक्षित भविष्याचे स्मरण करून देत समाजातही बालसुरक्षेची आणि शिक्षणाची जाणीव निर्माण केली जाते. “आजची मुलं म्हणजे उद्याचं भारताचं भविष्य” या नेहरूजींच्या विचारातून आजचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरतो.

सोशल मीडियावर आज दिवसभर सुंदर संदेश, कोट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतो. काही लोकप्रिय शुभेच्छा अशा,

“आकाशाला स्पर्श करणारी स्वप्नं आणि पावसात भिजण्याची मजा बालपण म्हणजे आनंदाचा खजिना. बालदिनाच्या शुभेच्छा!”
“चॉकलेटसारखं गोड हसू, फुलांसारखं कोवळं मन… या निरागसतेला सलाम. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“लहान मनातली मोठी स्वप्नं… त्या निर्मळतेला आज नमन. Happy Children’s Day!”

असं गोडगोड, हटके आणि प्रेमाने भरलेलं शुभेच्छांचं वातावरण आज प्रत्येक घरात आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतं.

बालपण पुन्हा आठवण्याचा दिवस

जगाच्या धावपळीत मोठ्यांच्या मनात दडलेल्या त्या छोट्या मुलाला बाहेर आणण्याचीही हीच वेळ कधी पावसात भिजण्याची, पतंग उडवण्याची, खेळताना निखळ हसण्याची. आजचा दिवस आठवण करून देतो की, प्रत्येक मूल सुरक्षित, आनंदी आणि शिक्षित असणं हेच खरं समाजाचं भविष्य आहे.

आपणही आपल्या प्रियजनांना गोड शुभेच्छा पाठवा आणि बालपणाचा आनंद पुन्हा एकदा जगा…
बालदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Join our WhatsApp Channel

The post Children’s Day 2025 Wishes: ‘बालपण देगा देवा’… देशभरात उत्साहात साजरा होणार निरागसतेचा सण; गोड आणि हटके शुभेच्छांचा वर्षाव appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar