Saturday, November 8, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अस्थमा आजाराचं बदललेलं स्वरूप

by प्रभात वृत्तसेवा
April 15, 2021
in आरोग्यपर्व
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

दमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फुसाला होणा-या ऑक्सिजनच्या पुरवठय़ाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागल्यास दमा आहे, असं समजावं. दमा हा आजार अनुवांशिकतेने अथवा वाढत्या प्रदूषणामुळे तेथे राहणा-या नागरिकांमध्ये दम्याच्या आजाराची लक्षणे असल्याचे दिसून येऊ शकते.

दमा आजार कसा ओळखावा
1. वातावरणात जरा बदल झाल्यास
2. शिंका व खोकला येणे
3. दम लागणे
4. छाती भरल्यासारखे वाटणे.
5. घरघर करणे
6. दमट हवामान, ढगाळ वातावरण यामुळे दमा असलेल्या रुग्णांना त्वरित त्रास होऊ शकतो

विशेष काळजी घेण्याची आवश्यकता
आनुवंशिकता – ज्या कुटुंबात आई अथवा वडिलांना दमा आहे अशा पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेऊन पूर्वकाळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या मुलांना दम्याचा त्रास उद्भवण्याची दाट शक्यता आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांना दम्याचा धोका अधिक असल्याचे विविध सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. वाढते शहरीकरण, गाडय़ांची रहदारी तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

बदललेली आहारपद्धती हे ही दमा होण्यास प्रमुख कारण मानलं जात आहे. पाश्चमात्य आहारपद्धतीचं आपल्यावर झालेलं अतिक्रमण त्यामुळे पिज्झा, बर्गर, फास्ट फुड, चिप्स, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तसेच वेगवेगळ्या पद्धतीची शीतपेय आदीचे अधिक सेवनही दमा होण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. फळांचे कमी सेवन हे सुद्धा दमा होण्याचे एक कारण मानले जात आहे.

सिझेरीयन पद्धतीद्वारे ज्या बाळांचा जन्म झाला आहे अशा बालकांमध्ये दमा होण्याची शक्यता अधिक असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रमुख रस्त्यांच्या आजूबाजूला असणा-या रहिवाशांनी वर्षातून आपली तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

दमा नियंत्रणात येऊ शकतो किंबहुना पूर्णत: बराही होऊ शकतो.
तुम्हाला जर दमा असल्याचं निष्पन्न झालं तर घाबरून जाऊ नका. दमा म्हणजे आयुष्यभराचा सोबती अशीच काहीशी समज सर्व स्थरावर आहे. योग्य पथ्य व काळजी घेतल्यास दमा पूर्णत: नियंत्रणात आणता येऊ शकतो. इन्हेलर पंप थेरपीद्वारे दम्यावर उपचार करता येतात. विशेष बाब म्हणजे आता काही प्रकारच्या बिकट दम्यावर ब्रोन्कीयल थर्मोप्लास्टी या अत्याधुनिक उपचारपद्धतीद्वारे इलाज होऊ शकतो. पूर्वी ही उपचारपद्धती फक्त परदेशातच उपलब्ध होती. आता मात्र आपल्याकडेही ही नवीन उपचारपद्धती काही ठिकाणी कार्यरत झाली असल्याने अशा प्रकारच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

अस्थमा असलेल्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक
1. घरातील हवा खेळती रहावी. हवा स्वच्छ ठेवणारे प्युरीफायर अथवा एसी वापरावा. तसेच, ओलसर भिंतीमुळेही दमा वाढवू शकतात.
2. कुठेही बाहेर प्रवास करत असाल किंवा प्रदुषणसदृश विभागात गेल्यास नाकाला मास्क लावणे आवश्यक
3. घरातील पडदे नेहमीच झटकून ठेवा. बेडशीट्स, रोजच्या वापराचे कपडे दिवसाआड गरम पाण्याने धुवा. एकंदर, तुमचे राहते घर नेहमी स्वच्छ व प्रसन्न असले पाहिजे.
4. गडद सुंगंध असलेले परफ्युम वापरू नका. काही पदार्थ खाल्याने अ‍ॅलर्जी होऊ शकते अशा पदार्थाची यादी बनवून असे पदार्थ शक्यतो टाळा.
5. काही पदार्थ खाल्याने अ‍ॅलर्जी होऊ शकते. उदा. चायनीज फुड ज्यामध्ये अजिनोमोटो व विनेगरचा वापर होतो, मशरूम, कोळंबी.
6. घरातील पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे दमा वाढण्याची शक्यता असते. नियमित व्यायाम व योग्य आहार घ्या.

Tags: arogya jagarasthamabreatha analysercloudy climatehealthmedicines new
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar