चक्कीचलासन हे एक सोपे आणि लाभदायी योगासन आहे. पूर्वीच्या काळी चक्की (पिठाची गिरण) हा प्रकारच नव्हता. तेव्हा घरोघरी जाती असायची आणि स्त्रियांना घरी जात्यावर पीठ दळावे लागत असे, ते ही बहुदा पहाटे वा सकाळी लवकर उठून. ( chakki chalanasana benefits )
जात्यावर पीठ दळणे हा एक उत्तम व्यायाम होता. नियमित होणाऱ्या या व्यायामामुळे पूर्वी स्त्रियांची तब्येत चांगली राहत असे. आता जागोजागी चक्क्या झाल्याने जात्यावर दळण दळणे हा प्रकार बंदच झाला आहे. आणि स्त्रियांच्या शरीराला होणारा तो व्यायामही बंद झाला आहे. या आसनामध्ये जात्यावर पीठ चक्कीचलासनात भारतीय ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या हाताने जात्यावर दळण दळण्याच्या हालचालींची नक्कल केली जाते. हा एक खूपच प्रभावी व आनंददायी व्यायाम आहे.
चक्कीचलनासन करण्याची कृती ( chakki chalanasana benefits )
– पाय समोर पूर्णपणे फैलावून बसा. दोन्ही हातांची बोटे एकत्र गुंतवून समोर खांद्याच्या सरळ रेषेत आणा.
– एक लांब, दीर्घ श्वास घेत आपल्या शरीराचा वरचा भाग पुढे आणा व एक काल्पनिक वर्तुळ बनवीत उजवीकडून गोल फिरणे सुरू करा.
– श्वास सोडत समोर व उजवीकडे आणि श्वास घेत मागे व डावीकडे शरीराचा वरचा भाग फिरवा. शरीराच्या खालच्या भागात येणाऱ्या ताणावर लक्ष द्या आणि पाय स्थिर ठेवा. शरीर फिरत असल्यामुळे पायांची थोडी हालचाल होणे स्वाभाविक आहे.
– हात आणि पाठ एकत्र फिरत राहतील.
– हालचाल होत असताना लांब, दीर्घ श्वास घेत राहा. तुम्हाला दोन्ही हात, पोट, कंबरेचा भाग व पायात ताण जाणवेल.
– एक दिशेने 5-10 वेळा फिरवल्यावर तीच क्रिया विरुद्ध दिशेने करा. आता तुमचे पीठ दळण्याचे काम पूर्ण झाले आहे.
चक्कीचलनासनाचे लाभ ( chakki chalanasana benefits )
– पाठ, पोट व हातांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.
– छाती व कंबरेचा भाग विस्तृत होतो.
– स्त्रियांच्या गर्भाशयाच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.
– सातत्याने हे आसन केल्याने वेदनादायक मासिक पाळीपासून आराम मिळतो.
– पोटाची चरबी कमी होते.
– गर्भावस्थेनंतर जमा झालेला मेद कमी करण्यात हे आसन खूप उपयुक्त आहे. (परंतु आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने)
खालील परिस्थितीत चक्कीचलनासन करू नये. ( chakki chalanasana benefits )
– गरोदरपणा
– कमी रक्तदाब असल्यास
-पाठीच्या खालच्या भागात खूप वेदना असल्यास.(स्लीप डिस्क मुळे)
– डोकेदुखी, अर्धशिशी असल्यास
– शस्त्रक्रिया (उदा. हर्निया) झालेली असेल तर.