Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Chai-Chapati : सकाळीच नाश्त्याला ‘चहा-चपाती’ खाताय? जाणून घ्या आरोग्याला चांगले की वाईट, होईल गंभीर आजार….

by
July 20, 2025
in आहार
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

Chai-Chapati । morning breakfast – तुमच्या जीवनशैलीचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, म्हणूनच प्रत्येकाला निरोगी दिनचर्या पाळण्याचा सल्ला दिला जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जाणून-बुजून अशा अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्यापैकी बहुतेकजण अशा अनेक चुका करतात, विशेषत: सकाळच्या वेळी, आपल्या दिवसातील सर्वात महत्वाचे जेवण हे सकाळी असते.

परंतु काही वेळा वेळेच्या कमतरतेमुळे लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हेल्दी ब्रेकफास्ट करणे खूप गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नाश्त्यात काय खाता. कारण हेल्दी ब्रेकफास्ट तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकतो.

आपल्याकडे नाश्त्याला पोहे – उपमा नसेल तर, बहुतांश लोक चहा चपाती खाण्यास पसंती देतात. कारण ‘चहा-चपाती’ हा भारतीयांचा आवडीचा नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का? चहासोबत चपाती खाणं कितपत योग्य आहे आणि यामुळे आरोग्याचे बरेच नुकसानही होते.

चहामध्ये साखर आणि कॅफिन असते. जे जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा, पोषक तत्वांची कमतरता, यासह झोपेवरही परिणाम होऊ शकतो. जर आपण नियमित चहासोबत चपाती खात असाल तर, पचनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतो. संशोधनानुसार चहामध्ये असलेले फिनोलिक केमिकल्स पोटात आयर्न-कॉम्प्लेक्स तयार करण्यास उत्तेजन देतात, ज्यामुळे शरीरात लोहाचे शोषण होण्यास अडथळा येतो.

त्यामुळे चहासोबत चपाती खाणं टाळावे. चहासोबत चपाती खाल्ल्याने सकरात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम घडतात. चहा घ्यावा की नाही हे सर्वस्व आपल्या हेल्थवर अवलंबून आहे. चपाती खाण्याचेही अनेक फायदे आहेत. आपण शक्यतो चपाती भाजी खातो. पण चहा-चपातीचे सेवन कमी प्रमाणात करावे. असं देखील अनेक आरोग्यतज्ञ सांगतात.

चहा चपाती खाण्याचे सकारात्मक परिणाम…

पोषक तत्वांनी समृद्ध :
चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि काही जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे पोषक घटक शरीराला दिवसभर उत्साही ठेवतात. शिवाय पचनाच्या समस्याही दूर करतात.

हायड्रेशन :
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि लिक्विड पदार्थ खाणं गरजेचं आहे. चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. मात्र, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही.

चहासोबत चपाती खाण्याचे नकारात्मक परिणाम…

कॅलरीजचे प्रमाण जास्त :
चहातील साखर आणि चपातीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. खरंतर काही लोकांना खूप गोड चहा पिण्याची सवय असते. त्यात कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे चहा- चपाती एकत्र खाऊ नये. यामुळे वजन वाढू शकते.

पोषक तत्वांची कमतरता :
चहासोबत चपाती खाल्ल्याने शरीरात इतर अनेक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. ज्यामुळे शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. आपण चहासोबत चपाती नसून, इतर पदार्थ खाऊ शकता. किंवा चपातीसोबत पौष्टीक भाज्या खाऊ शकता.

झोपेवर परिणाम :
जर दररोज आपल्याला चहा चपाती खाण्याचे सवय असेल तर, याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो. यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते. चहामध्ये भरपूर कॅफिन असते, साखरेचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रोज चहा आणि चपाती खाल्ल्याने हृदयाच्या गतीवरही परिणाम होतो.

प्रोटीन शोषून घेण्यास अडचण :
चहासोबत चपाती खाल्ल्याने शरीरातील प्रथिने शोषून घेण्यास अडथळा येतो. चहामध्ये टॅनिन नावाचे रसायन असते, जे प्रथिनांच्या संयोगाने शरीरात अँटीन्यूट्रिएंट्स म्हणून काम करते. टॅनिन प्रथिनांचे पचन सरासरी ३८% कमी करते. चहा शरीराला पोषक द्रव्ये वापरण्यापासून रोखतो. त्यामुळे चहासोबत चपाती खाणं टाळावे.

Join our WhatsApp Channel

The post Chai-Chapati : सकाळीच नाश्त्याला ‘चहा-चपाती’ खाताय? जाणून घ्या आरोग्याला चांगले की वाईट, होईल गंभीर आजार…. appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar