Celebrities Restaurants : बॉलीवूड सेलिब्रिटी केवळ चित्रपटांतून पैसे कमावतात असे नाही तर अनेक अभिनेत्री स्वतःचे फूड रेस्टॉरंटही चालवतात. मौनी रॉयने अलीकडेच मुंबईत ‘बदमाश’ नावाने रेस्टॉरंट सुरु केले, जिथे अनेक बॉलिवूड स्टार्सनी भेट दिली. बॉलिवूडमध्ये अश्या 5 अभिनेत्री आहेत ज्या आलिशान रेस्टॉरंटच्या मालक आहेत.
अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांनी मुंबईत त्यांच्या ‘बदमाश’ या रेस्टॉरंटची भव्य लाँच पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये टीव्ही आणि चित्रपट जगतातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हे रेस्टॉरंट खूप सुंदर आहे. त्याचे आलिशान इंटीरियर खास डिझाइन केले आहे.
देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील न्यूयॉर्कमधील एका आलिशान रेस्टॉरंटची मालक आहे. पीसी न्यूयॉर्कमध्ये ‘सोना’ नावाचे भारतीय रेस्टॉरंट चालवते. हे 2021 मध्ये लॉन्च केले गेले होते, जिथे तुम्हाला भारतीय चवीचे पदार्थ मिळतील.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटची मालकही आहे. शिल्पा बास्टियन सीरीज ऑफ रेस्टॉरंटची सह-भागीदार आहे. हे भव्य आणि आलिशान रेस्टॉरंट बॉलिवूड स्टार्सच्या आवडत्या यादीत समाविष्ट आहे.
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही 2 रेस्टॉरंटची मालकीण आहे. 2017 मध्ये, जॅकलीनने कोलंबोमध्ये तिचे पहिले रेस्टॉरंट उघडले. ज्याचें नांव ‘कामसूत्र’ हे 5 स्टार हॉटेल शांग्री-ला येथे आहे. यानंतर 2018 मध्ये जॅकलिनने मुंबईत ‘पाली थाली’ रेस्टॉरंटही उघडले.
अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्याकडे ‘रु डू लिबान’ नावाचे भव्य रेस्टॉरंट आहे. या आलिशान रेस्टॉरंटचे इंटीरियर अतिशय खास आहे. जुही चावला चित्रपटांमध्ये सक्रीय नसली तरी व्यवसायात प्रचंड सक्रिय आहे.
The post Celebrities Restaurants : कुणाचं आहे कॅफे तर कुणाचं आहे रेस्टॉरंट; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री आहेत शानदार हॉटेलच्या मालकीण…. appeared first on Dainik Prabhat.