मुंबई – नवीन लग्न झालेल्या तसेच लग्न ठरलेल्या सर्वच व्यक्ती लैंगिक शिक्षणाने परिपूर्ण असतात असे नाही. भारतात तर या गोष्टीवर मनमोकळ्या गप्पांचा अभावच जाणवतो. लैंगिक शिक्षण न मिळाल्यामूळे कितीतरी जोडपी संभोग क्षमता असूनही त्याचा आनंद घेऊ शकलेल्या नाहीत.
ताणाखाली कित्येकांचे घटस्फोटदेखील झाले आहेत तर कित्येक जोडपी कुढत जगताना आढळतात. काहीवेळा पुरूष या शिक्षणाअभावी पत्नीला समाधान देऊ शकत नाही तर काही वेळा पत्नीदेखील सुख देण्यास असमर्थ असते. यातच लैंगिक शिक्षणाच्या अभावी कित्येक जोडपी सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे शीघ्रपतन. तर जाणून घेऊया याबाबत … ( premature ejaculation treatment)
शीघ्रपतन होण्यावर डॉक्टर सांगतात, व्यक्तीच्या स्वभावात खोलवर भिनलेली अधिरता, उतावळेपणा व घाई याच्याशी असतो. अनेक पुरुष लैंगिक संबंध ठेवताना खूप अधीर होतात. स्वत:चा लैंगिक आवेग आवरणं त्यांना शक्य होत नाही. त्यांच्या स्वभावातला हा उतावळेपणाच लैंगिक संबंध ठेवताना नकळत त्यांच्या शरीरातून शीघ्रपतनाच्या रूपाने व्यक्त होऊ लागतो. यावर उपाय म्हणून अनेकजण शारीरिक उपचार घेतात. पण मुळात हा व्यक्तीच्या स्वभावाचा दोष असल्याने शारीरिक उपचार घेऊन फायदा होत नाही. अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेऊन आणि सेक्स थेरपी करून तुम्ही उपचार घेऊ शकता.
डॉक्टरांच्या मते, शीघ्रपतन होण्याची वेगवेगळी कारणे असतात. त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरसंबंधांमधील दिवसांचं अंतर. म्हणजे जर एकदा शारीरिक संबंध ठेवले असतील आणि त्यानंतर बरेच दिवस जोडीदार जवळ आले नाहीत, तर शीघ्रपतनाची समस्या होऊ शकते.
( premature ejaculation treatment)