Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Calcium Deficiency: हाडांमधील कॅल्शियमची कमतरता: कारणे, लक्षणे आणि उपाय

by
February 10, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Calcium Deficiency: आजकाल टीव्हीवर एक जाहिरात वारंवार दिसते. दोन मैत्रिणी गप्पा मारत असतात. एक मैत्रीण म्हणते, “मी माझ्या मुलांना रोज दोन ग्लास दूध देते.”
दुसरी विचारते, “बरं आहे… पण कॅल्शियम मिळतंय का?”

या साध्या संवादातून एक महत्त्वाचं सत्य समोर येतं फक्त दूध पिणं पुरेसं नसतं, शरीरात कॅल्शियम शोषलं जाण्यासाठी ‘ड’ जीवनसत्व आवश्यक असतं.

कॅल्शियम कोणाला जास्त लागते?

कॅल्शियमची गरज फक्त लहान मुलांनाच नसते. तान्ह्या बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक, वाढीच्या वयातील मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या माता या सगळ्यांमध्ये कॅल्शियमची गरज जास्त असते.

कॅल्शियम कमी होण्याची प्रमुख कारणे

शरीरात Vitamin D ची कमतरता
असंतुलित आणि अपुरा आहार
सूर्यप्रकाशाचा अभाव
वाढते वय
वारंवार गरोदरपण आणि स्तनपान
पाळी गेल्यानंतर होणारे हार्मोन्सचे बदल
दारू, तंबाखू, सिगारेट, कॉफीचे अतिसेवन
काही औषधांचा दीर्घकाळ वापर
किडनी किंवा आतड्यांचे आजार
 गव्हाची अॅलर्जी (सीलिअक आजार)

कॅल्शियम कमी झाल्यास होणारे आजार

लहान मुलांमध्ये: रिकेट्स (मुडदूस)
प्रौढांमध्ये: ऑस्टिओमलेशिया
हाडे ठिसूळ झाल्यास: ऑस्टिओपोरोसिस
कॅल्शियम कमतरतेची लक्षणे
थोड्याशा कामानेही थकवा
स्नायू आणि हाडे दुखणे
कंबरदुखी, पाठदुखी
चालताना त्रास, जिने चढताना अडचण
जमिनीवरून उठताना आधार घ्यावा लागणे
दात कमकुवत होणे, दातांमध्ये फटी पडणे
हात-पायांमध्ये अचानक आकडी (क्रॅम्प्स)

लहान बाळांमध्ये दिसणारी लक्षणे

डोक्याची हाडे मऊ होणे
कपाळ पुढे येणे
छाती फुगीर दिसणे
वारंवार सर्दी, खोकला, न्यूमोनिया
पोट थुलथुलीत दिसणे
बाळ अस्वस्थ राहणे

कॅल्शियम कमी झाल्यास काय करावे?

रोज सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे
दूध, दही, ताक, लोणी, तूप, पनीर, मासे यांचा आहारात समावेश
हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळे, अंडी, प्रथिने युक्त संतुलित आहार
पचनसंस्था निरोगी ठेवणे
गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे
आयुर्वेदिक औषधे व मालिश उपयुक्त ठरू शकतात

निरोगी हाडांसाठी कॅल्शियमसोबत ‘ड’ जीवनसत्व आणि योग्य जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar