पुणे – जितक्या लवकर स्तनदा माता बालकांना स्तनपान करू लागतील तितके चांगले! स्तनपान केल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बदलते आणि त्यांची मासिक पाळी पुढे ढकलली जाते आणि याचा परिणाम म्हणून स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
आजच्या आधुनिक जागातील चिंतामुक्त होण्याची चुकीची पद्धत. आरामाच्या नावाखाली मद्याचे जितके जास्त पेले तुम्ही रिचवता किंवा सिगारेटच्या धुरात हरवून जाता त्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त बळावते. रात्री जागरण करणाऱ्या निशाचरांनी आणि नेटप्रेमींनी देखील त्यांच्या रोजच्या कामातील अनियमितपणा, जास्त उशिरापर्यंतची जागरणे आणि जास्त वेळ काम करणे, यामध्ये सुयोग्य संतुलन राखले पाहिजे. कारण अशा मंडळींना कालांतराने कर्करोग होण्याची शक्यता असते.
बदलत्या जीवनशैलीविषयक सवयी, कामाचा वाढता ताण आणि तणाव यामुळे आधुनिक काळातील व्यक्तींना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फुरसत नाही. गंभीर आणि जीवघेण्या स्वरूपाचा मधुमेह, लठ्ठपणा तसेच हृदयाशी संबंधित विकारांचे प्रमाण वाढते आहे. या आजारांचे निदान होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस बळावलेले दिसते. मग मागे उरते. कुटुंबाची हळहळ की आरोग्याला प्राधान्य दिले नाही.
स्तनाचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर असा एक विकार आहे, ज्यामुळे जगभरातील लक्षावधी महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सौंदर्यप्रसाधने, घरगुती आणि वैयक्तिक निगा उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या एवॉनची सामाजिक शाखा एवॉन फाऊंडेशन मागील 60 वर्षांपासून विशेषत: महिलांच्या आरोग्यासाठी काम करते आहे व जगभरातील स्त्रियांचे जीवन सुधारावे याकरिता कटिबद्ध आहे.
सन 2017 मध्ये 15 देशांतील 19 हजार प्रतिनिधींनी स्तनाच्या कर्करोगाची जोखीम आणि लक्षणांबद्दल जनजागृती केली. निरीक्षणात दिसले की, महिलांमध्ये या विकाराचा तपास आणि कर्करोग निर्माण होण्याला अटकाव करण्याविषयी सजगता नाही. अभ्यासातून स्पष्ट होते की, केवळ दोन ते पाच महिलांना स्तनाच्या कर्करोगाविषयीच्या प्रारंभिक लक्षणांची माहिती आहे. तसेच जीवनशैलीच्या सवयी कर्करोगाला आमंत्रण देऊ शकतात, हे फार थोड्या लोकांना ज्ञात आहे.
भारतात या क्षेत्रात सविस्तर संशोधन आणि अभ्यास करण्यात येतो आहे. 2016 मध्ये एवॉनकडून स्तनाचा कर्करोग कसा विकसित होतो, कसा वाढतो आणि त्याला प्रतिबंध कसा करावा त्यासाठी 4 दशलक्ष डॉलर संशोधनावर खर्च करण्यात आले. जगाच्या तुलनेत भारतीय महिलांमध्ये माहितीचा अभाव आढळतो. शिवाय त्या आजारपणावर चाचणी, निदान आणि सल्ला देणाऱ्या डॉक्टरांसोबत चर्चा करण्याविषयी साशंक असतात. ही पार्श्वभूमी पाहता, आजाराची जोखीम दुर्लक्षित झाल्यास बहुतांश प्रकरणात जीवावर बेतू शकते.
आरामदायी जीवनशैलीचा अभिमान बाळगू नका. वेगवान गती असणाऱ्या आजच्या प्रदूषणाने भरलेल्या जगाच्या बरोबरीने चालताना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपले शरीर धडधाकट ठेवणे आणि आपल्या सर्व अवयवांचा वापर करून विषारी पदार्थ घामाद्वारे बाहेर टाकणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही नियमितपणे चालायला जाऊ शकता, सायकल चालवू शकता किंवा जॉगिंग अथवा घरातील रोजची कामे करू शकता. या शारीरिक हालचालींमुळे तुम्हाला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
जितक्या लवकर स्तनदा माता बालकांना स्तनपान करू लागतील तितके चांगले! स्तनपान केल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बदलते आणि त्यांची मासिक पाळी पुढे ढकलली जाते आणि याचा परिणाम म्हणून स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो. आजच्या आधुनिक जागातील चिंतामुक्त होण्याची चुकीची पद्धत.
आरामाच्या नावाखाली मद्याचे जितके जास्त पेले तुम्ही रिचवता किंवा सिगारेटच्या धुरात हरवून जाता त्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त बळावते. रात्रीच्या वेळी जागरण करणाऱ्या निशाचरांनी आणि नेटप्रेमींनी देखील त्यांच्या रोजच्या कामातील अनियमितपणा, जास्त उशिरापर्यंतची जागरणे आणि जास्त वेळ काम करणे यामध्ये सुयोग्य संतुलन राखले पाहिजे. कारण अशा मंडळींना कालांतराने कर्करोग होण्याची शक्यता असते.
हार्मोन बदलण्याची थेरपी (एचआरटी) आणि गर्भनिरोधक गोळ्या आपल्या गरजेची नसणारी वैद्यकीय सुधारणा! नको असणारी गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीची लक्षणे दूर ठेवण्यासाठी सध्या अतिशय लोकप्रिय झालेल्या एचआरटी आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करू नका. हल्ली बऱ्याच महिला उशिरा आई बनण्याचा मार्ग स्वीकारतात; परंतु लवकरच्या वयातील गर्भधारणा स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करते.
पोषक आहाराची सवय लावून घ्या आणि बाहेरचे खाणे टाळा. सतत चरत राहणे आणि बर्गर्ससारखे पदार्थ खाल्ल्याने तरुण वयात (वयाच्या 18 व्या वर्षांनंतर) वजन वाढल्यास किंवा रजोनिवृत्तीनंतर स्थूलत्व आल्यास देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, काळ्या, आशियायी, चायनीज आणि मिश्र वर्णाच्या स्त्रियांच्या तुलनेत गोऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असते.
स्तनाचा कर्करोग हा काही वेळा आनुवांशिक असल्याचे देखील आढळून आले आहे. ज्या महिलांना स्तनाचा कर्करोग होतो, त्यापैकी साधारण 15 टक्के महिलांच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्याचे दिसून येते. मोठे स्तन असणे हे देखील कर्करोगाचा धोका वाढविणारे आहे. छोटे स्तन असणाऱ्या महिलांच्या तुलनेत मोठे स्तन असणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.
डीओड्रंट किंवा परफ्युम्सचा, वायर असणाऱ्या ब्रेसियर्सचा अतिवापर, स्तनाला धक्का लागणे किंवा इजा होणे, स्तन प्रत्यारोपण किंवा गर्भपात अशा सहसा महिलांकडून दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास जीवाचा धोका टाळता येतो. संशोधनामुळे आणि औषधांमुळे पूर्वीच्या तुलनेत स्तनाचा कर्करोग बरा होण्याचे प्रमाण ब-याच प्रमाणात वाढले आहे. तरीदेखील, बऱ्याच महिलांना त्यातील धोके माहीत नसतात. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती आणि काही काळजीचे कारण आढळून आल्यास काय करावे, कोणाकडे जावे याबाबत महिलांना फारशी माहिती नसते.
एका अभ्यासानुसार, वेळेवर उपचार केल्यास, स्तनाचा कर्करोग बरा होण्याचे प्रमाण हे 70 टक्के आहे. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वत:च तपासणी करणे. महिन्यातून एकदा स्वत:च्या स्तनाची तपासणी केवळ 4 सोप्या टप्प्यात केल्यास आणि यासाठी फक्त काही मिनिटेच खर्ची घातल्यास या रोगाचे लवकर निदान होऊ शकते आणि आपला अनमोल जीव देखील वाचवता येतो.
– डॉ. प्रांजली गाडगीळ