Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगापासून कसा कराल बचाव?

by
February 9, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Breast Cancer: भारतामध्ये महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वाधिक आढळतो. महिलांमधील एकूण कर्करोगांपैकी सुमारे ३२ टक्के रुग्ण स्तनकर्करोगाचे असतात. साधारणपणे २५ ते ३० महिलांपैकी एका महिलेला आयुष्यात कधीतरी हा आजार होण्याची शक्यता असते.

पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय महिलांमध्ये या आजाराचे निदान उशिरा होते, ही मोठी चिंतेची बाब आहे. वेळेवर तपासणी न झाल्यामुळे अनेक वेळा आजार गंभीर अवस्थेत पोहोचतो. त्यामुळे या आजाराबाबत योग्य माहिती असणे फार महत्त्वाचे आहे.

कोणाला होऊ शकतो स्तनाचा कर्करोग?

सहसा ४० ते ५० वयोगटात रुग्णसंख्या जास्त दिसते
मात्र विशी-तिशीतही हा आजार होऊ शकतो
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनाही धोका असतो
७०-८० वर्षांच्या महिलांमध्येही हा आजार आढळतो
एवढंच नाही तर पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो

अनेक रुग्णांना कुटुंबात कधीच कर्करोगाचा इतिहास नसतो. त्यामुळे “आमच्या घरात कुणालाच नाही, म्हणजे मला होणार नाही” असा गैरसमज करून घेऊ नये. मात्र आई, बहीण, आजी, मावशी, आत्या यांना हा आजार झाला असेल, तर धोका वाढतो.

लवकर वयात मासिक पाळी सुरू होणे, उशिरा रजोनिवृत्ती होणे, उशिरा किंवा अजिबात मातृत्व न येणे, स्तनपान न करणे या सगळ्या गोष्टी धोका वाढवू शकतात.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे

स्तनात गाठ किंवा कडकपणा
निप्पलमधून असामान्य स्त्राव
स्तनाच्या त्वचेवर लालसरपणा किंवा खडबडीतपणा
स्तनाच्या आकारात बदल
निप्पल आत ओढले जाणे
काखेत गाठ लागणे
महत्त्वाचं म्हणजे, कर्करोगाच्या गाठी सहसा दुखत नाहीत. त्यामुळे वेदना नाहीत म्हणून दुर्लक्ष केल्यास वेळेवर निदानाची संधी निघून जाते.

कोणत्या तपासण्या आवश्यक?

२० वर्षांनंतर : महिन्यातून एकदा स्वतःचे स्तनपरीक्षण
३० वर्षांनंतर : डॉक्टरांकडून स्तन तपासणी
४० वर्षांनंतर : दरवर्षी मॅमोग्राफी तपासणी

मॅमोग्राफी ही स्तनाची खास एक्स-रे तपासणी असून, अगदी लहान गाठीही यातून सापडू शकतात. काही वेळा गरज असल्यास सोनोग्राफी किंवा बायोप्सी केली जाते. योग्य निदानासाठी डॉक्टरांची तपासणी, रेडिओलॉजी चाचण्या आणि बायोप्सी या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात.

स्तनाच्या कर्करोगाचा धोका कसा कमी कराल?

दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
वजन नियंत्रणात ठेवा
फळं, भाज्या, कडधान्यांचा आहार वाढवा
तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न कमी करा
रजोनिवृत्तीनंतर हार्मोन्सची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका

सध्या स्तनाच्या कर्करोगासाठी कोणतीही प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. मात्र लवकर निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच महिलांनी आपल्या शरीरातील बदलांकडे लक्ष द्यावे, नियमित तपासण्या कराव्यात आणि कुठलेही लक्षण जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar