सर्व मानवी लोकसंख्येमध्ये अपस्माराचे झटके हे मज्जासंस्थेच्या विकारांचे लक्षण आहे. अपस्मारात झटका येऊन व्यक्ती जमिनीवर कोसळते आणि अनावर आचके देऊ लागते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, हे अपस्माराचे केवळ एक लक्षण आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
झटका येण्याचा धोका वाढवणारे हे काही घटक:
वैद्यकीय घटक : वाढलेला ताप, प्रादुर्भाव, रक्तातील साखरेची पातळी घसरणे, मेंदूतील गाठी इत्यादी.
पर्यावरणातील घटक : मोठा आवाज, प्रखर प्रकाश, प्रदूषण इत्यादी.
पोषणाचा अभाव आणि मद्य, तंबाखूसारख्या विषजन्य घटकांचे सेवन
हार्मोन्समधील असंतुलन : वैद्यकीय किंवा मानसशास्त्रीय कारणे, तणाव इत्यादी.
झटक्याच्या सुरुवातीला होणा-या विकासावरून तसेच कारणांवरून त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.
केंद्रस्थ झटके : जागृतावस्था किंवा जाणीव कायम राहून किंवा न राहता येणारे झटके, बायलॅटरल सीझर (मेंदूच्या दोन्ही बाजूंवर परिणाम करणारी झटके).
सामान्यीकृत झटके : यामध्ये टॉनिक-क्लॉनिक सीझर्स. (संपूर्ण मेंदूवर परिणाम करणारा झटका).
अबसेन्स सीझर्स : यामध्ये लघुकाळासाठी व्यक्तीला अंधारी येते किंवा ती एका ठिकाणी टक लावून बसते. ऍबसेन्स सीझरमध्ये एरव्ही प्रामुख्याने दिसणारे आचक्यांचे लक्षण दिसून येत नाही. यामध्ये रुग्णाचे भान अचानक जाते आणि काही काळाने परत येते. काही वेळा हा झटका येऊन गेल्याचे आजूबाजूच्या लोकांना कळतही नाही.
मायोक्लोनिक सीझर : सकयूंना धक्के देणारा झटका.
ऍटॉनिक सीझर : यामध्ये विकलांगता येण्याची शक्यता असते.
अज्ञात प्रकारचे झटके :
मेंदूच्या नेमक्या कोणत्या भागावर परिणाम होतो आणि कितपत परिणाम होतो यावर अशा प्रकारच्या झटक्याचे वैद्यकीय स्वरूप अवलंबून असते. काही वेळा यामुळे गतीविषयक (मोटर) कार्यावर, संवेदनेवर, सावधतेवर, आकलनावर, स्वयंचलित कार्यावर किंवा या सर्वावर परिणाम होऊ शकतो.
अपस्मारावर केल्या जाणारे पारंपरिक उपचार प्रामुख्याने लक्षणात्मक (सिम्प्टोमॅटिक) प्रकारचे आहेत. यात झटके दाबणारी अपस्मार प्रतिबंधक औषधे दिली जातात. विकाराचे स्वरूप खूपच टोकाचे असेल, तर शस्त्रक्रियात्मक उपचार करून या झटक्यांसाठी कारणीभूत ठरणारी चेतासंस्थांची उत्तेजना दूर केली जाते.
पेशीआधारित उपचारपद्धतीचे फायदे
पेशीआधारित उपचारपद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात शस्त्रक्रिया खूप कमी आहे. यामध्ये रुग्णाच्या स्वत:च्याच पेशी वापरल्या जातात. मेसिन्चिमल पेशी हानी झालेले ठिकाण (अपस्मारजन्य घटकांचा भाग) शोधून तिथे स्थलांतर करू शकतात आणि तेथील पेशी व ऊतींचे पुनरुज्जीवन करतात.
चेतापेशींवर आधारित उपचारपद्धतींनी झालेले लाभ दीर्घकाळ टिकणारे ठरतात. कारण, ते केवळ लक्षणे नाहीशी करून थांबत नाहीत, तर परिणाम झालेल्या संपूर्ण संरचनेचे पुनरुज्जीवन करतात.
– मृणाल घोळे मापुस्कर