Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मेंदूचे आरोग्य : ब्रेन टयूमर आणि आरोग्य

by प्रभात वृत्तसेवा
March 5, 2021
in आरोग्य वार्ता
A A
मेंदूचे आरोग्य : ब्रेन टयूमर आणि आरोग्य
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

र्ींदूत टयुमर (गाठ) कसे होते आणि त्याचे वेळेवर निदान करण्याची आणि तातडीने बहुआयामी उपचार करण्याची गरज याविषयी.. दू हा प्रमुख अवयव आहे, जो स्मरणशक्ती, वाचा, जाणीव, विचार, हालचाली आणि जिवंत राहण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो.

टयुमर ही संज्ञा सामान्यपणे मेंदूसारख्या जिवंत पेशीचा पाया असलेलुुुुुुया पेशींच्या अनियंत्रित गुणाकारातून झालेल्या असंबद्ध वाढीसाठी वापरली जाते. कर्करोगामध्ये या असंबद्ध पेशींची वाढ इतकी अनियमित असते की, त्या जवळपासच्या सामान्य संरचनेला धोका पोहोचवतात व कित्येकदा आजाराच्या उगमापासून दूर असलेल्या ठिकाणापर्यंत पसरतात.

पसरणारी कर्करोगक्षम गाठ घातक समजली जाते. तर न पसरणारा टयुमर हा सौम्य समजला जातो. ब्रेन टयूमर जीवाला घातक असतो. पण, सुदैवाने ते दुर्मीळ असतात व प्रत्येक टयुमर हा कर्करोगक्षम नसतो. मेंदू आणि पाठीच्या कण्यातून तयार होणारे हे टयूमर प्रायमरी म्हणून ओळखले जातात. फुप्फुसासारख्या दूरवरच्या अवयवापासून मेंदूपर्यंत आलेला टयुमर सेकंडरी किंवा मेटास्टॅटिक समजला जातो.

अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की, ब्रेन टयमर हा 35 वर्षापासून पुढे 60 आणि वर्षाच्या खाली दिसून येतो. या सर्वात उत्पादनक्षम असलेल्या कालावधीत मेंदूत टयुमर आढळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी नोंदवण्यात आलेल्या केसेसच्या मदतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार 45 टक्के जण 35 ते 40 वर्ष वयोगटातील होते. तर 55 टक्के जण 60 वर्षाखालील होते.

या वयोगटांत ब्रेन टयुमर होण्याची कारणे अद्याप स्पष्ट नाहीत. मात्र, काही कौटुंबिक आणि आनुवंशिक घटकांमुळे एखाद्या व्यक्तीस ब्रेन टयूमर होण्याची शक्‍यता जास्त असते. रेडिएशन थेरपी ही मेंदूचा कर्करोग होण्यामागचे प्रमुख कारण समजले जाते. अमेरिका आणि युरोपमध्ये मोबाईल फोनचा वापर आणि मेंदूचा कर्करोग यावर मोठया प्रमाणावर संशोधन करण्यात आले आहे. मात्र, त्यात अद्याप काही निष्पन्न झालेले नाही.

ब्रेन टयूमर आहे का?
ब्रेन टयूमर असल्यास डोकेदुखी, उलटया, दृष्टी धूसर होणे, वागण्यात बदल होणे, फिट्‌स येणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, हात/पाय कमकुवत होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. सामान्यपणे अशी लक्षणे डोक्‍यातील वाढत्या दाबामुळे किंवा मेंदूच्या एका भागात त्रास असण्याने किंवा टयुमरमुळे त्याचे कार्य बिघडण्यामुळे दिसून येतात. मात्र, काही केसेसमध्ये कोणतीही लक्षणे मोठया प्रमाणात दिसून येत नाहीत. मेंदूचा एमआरआय किंवा सीटी स्कॅनच्या मदतीने त्याचे निदान करता येते. दुर्दैवाने ब्रेन टयूमर होऊ शकत असल्याचा अंदाज लावता येत नाही. मात्र, त्याचे वेळेवर निदान झाल्यास दीर्घकाळाकरिता टयुमरला प्रतिबंध करता येऊ शकतो.

ब्रेन टयुमर उपचाराअंती परिणाम?
ब्रेन टयुमरचे उपचार विविध घटकांवर अवलंबून असतात. त्यामध्ये वय, टयूमरचे स्वरूप (सौम्य / घातक), त्याचे ठिकाण यांचा समावेश असतो. उपचारांच्या पर्यायांमध्ये
सतत बारकाईने निरीक्षण
एका पाठोपाठ एक एमआरआय करणे
बायोप्सी करणे
शस्त्रक्रियेने टयूमर काढणे,
रेडिओ सर्जरी,
रेडिओपॅथी,
किमोथेरपी
इत्यादींचा समावेश होतो. या सर्व पर्यायांसाठी…
न्युरोसर्जरी,
रेडिएशन आँकोलॉजी,
मेडिकल आँकोलॉजी,
नेचरोपॅथी,
न्यूरिहॅबिलिएशन,
मानसोपचार
इत्यादींची गरज असते. रेडिओथेरपी अतिशय नेमकी, शस्त्रक्रियेची गरज नसलेली आणि दर्जेदार आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी आहे.

शरीरातील प्रतिकार शक्ती अधिक सक्षम करून कर्करोगाच्या विरोधात त्याचा वापर करण्याची नवी उपचार पद्धती शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.

कर्करोगाचे प्रमाण जगभरात वाढत आहे. या दुर्धर आजारावर जगभरात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. हा आजार शरीराच्या कोणत्याही अवयवाला होतो. यातील सर्वात घातक प्रकार म्हणजे मेंदूचा कर्करोग. मेंदू हा संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा अवयव आहे. त्यामुळे मेंदूला कर्करोग झाल्यास संपूर्ण शरीरातील विविध अवयवांवर परिणाम होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी मेंदूच्या कर्करोगाविरोधात लढणारी नवीन उपचार पद्धती विकसित केली आहे. शरीरातील प्रतिकार शक्ती अधिक सक्षम करून कर्करोगाच्या विरोधात त्याचा वापर करण्याची नवी उपचार पद्धती शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.

मेंदूच्या कर्करोगावर नवे उपचार
ग्लिओब्लास्टोमा हा सर्वाधिक घातक ब्रेन ट्यूमरच्या(मेंदूतील गाठ) प्रकारांपैकी एक आजार आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपीचा वापर केल्यानंतरही रुग्णाचा जीव वाचत नाही. मात्र, कर्करोग पहिल्या टप्प्यात असल्यास त्याच्यावर यशस्वी उपचार करता येतात, हे प्राण्यांवर केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले. मात्र, कर्करोग अधिक वाढल्यास त्याच्यावर उपचार करणे कठीण बनते.

मेंदूच्या कर्करोगावर उपचार करताना सर्वात मोठे आव्हान असते टी पेशींचे. कारण या पेशी मेंदूत पसरलेल्या असतात. या पेशी व्यक्तीची प्रतिकार शक्ती नाहीशी करतात.

झुरिक विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ एक्‍सपेरिमेंटल इम्युनॉलॉजीतील बुरखर्द बेकर्स यांनी नवीन औषध आणि उपचार पद्धती तयार केली आहे. या उपचार पद्धतीमध्ये शरीराची स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढवली जाते व त्यानंतर रोगप्रतिकारक्षम प्रणाली ब्रेन ट्युमरच्या पेशी ओळखते व त्या मारून टाकू लागते. महत्त्वाचे म्हणजे या कर्करोगाच्या विकसित झालेल्या स्थितीतही हे औषध प्रभावी ठरू शकते.

या औषधातील इंटरल्युकिन-12 हा घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. ज्या वेळी टयूमरमध्ये इंटरल्युकिन-12 सोडले जाते त्या वेळी मेंदूतील रोगप्रतिकार करणा-या पेशींची ताकद वाढते आणि त्या टयूमरवर हल्ला करतात आणि त्याला निष्प्रभ करतात. आजाराच्या पहिल्या टप्प्यात या प्रक्रियेचे चांगले परिणाम दिसून आल्यावर शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेचा वापर दुस-या म्हणजे अधिक मोठ्या झालेल्या ट्युमरवर केला. या टप्प्यातील टयूमर असलेल्या प्राण्यांचे आयुष्य तीन आठवड्यांपेक्षाही कमी होते. या स्थितीमधील उपचार म्हणजे खूपच उशिरा केलेले आणि त्यातून यशाची हमी नसलेले उपचार समजले जातात.

या स्थितीत आम्ही त्या प्राण्याच्या मेंदूत अतिशय मोठ्या झालेल्या ट्युमरमध्ये इंटरल्युकिन-12 टोचले. त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढली. परंतु केवळ एक तृतीयांश भागातील ट्युमरवरच त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्वचेच्या कर्करोगात वापरल्या जाणाऱ्या एका नव्या उपचारपद्धतीचा इंटरल्युकिन-12 सोबत वापर करण्यास शास्त्रज्ञांनी सुरुवात केली.

धमन्यांमधून दिल्या जाणीाया रोगप्रतिकारक्षमता वाढवणीाया औषधाचा वापर करण्यास सुरुवात केल्यावर त्या औषधाने “टी पेशीं’चा नायनाट केला आणि चांगले परिणाम दाखवले. सुमारे 80 टक्के प्राण्यांवरील उपचारात ट्यूमर बरा झाल्याचे दिसून आले. हे संशोधन जर्नल ऑफ एक्‍सपिरिमेंटल मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाले.

– डॉ. ऋषीकेश सरकार

Tags: aarogya jagar 2019aarogya jagar 2020aarogya jagar newsaarogya jagaraarogya jagaraarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife styleaarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar