Blood pressure check : बऱ्याच जणांना रक्तदाबाचा त्रास असतो. काही जणांना उच्च रक्तदाब अर्थात हाय ब्लडप्रेशर असते तर काहींना कमी अर्थात लो ब्लड प्रेशर असते. सामान्यत: जेंव्हा डॉक्टर रूग्णांचा रक्तदाब चेक करतात तेंव्हा तो त्याला झोपवून चेक केला जातो. मात्र बऱ्याचदा बसलेल्या स्थितीत किंवा अन्य मुद्रेतही काही जण रक्तदाब तपासतात. तथापि, जर तुम्ही झोपलेल्या स्थितीत रक्तदाब तपासला असेल तर अधिक बिनचूक असतो अशी माहिती एका नव्या अभ्यासाद्वारे समोर आली आहे.
अमेरिकेच्या हार्ट असोसिएशनने या संदर्भातील अभ्यास केला आहे. रूग्णाचे जर तो झोपलेल्या अवस्थेत रिडिंग घेतले तर ते अधिक योग्य असते असे त्यांनी म्हटले आहे. अर्थात त्यांचा पुढचा अभ्यास सुरू असून अत्यंत प्राथमिक स्वरूपाची ही माहिती असल्याचे त्यांनी नमूद केले असले तरी या विषयावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. अशा प्रकारच्या स्थितीत जर तुम्ही रूग्णाचा रक्तदाब तपासला तर त्याला येणारा स्ट्रोक अथवा अन्य हृदयविषयक गंभीर आजारांचे योग्य अनुमान करणे लवकर शक्य होते अशीही माहिती या अभ्यासाअंती देण्यात आली आहे.
25 ते 55 वयोगटातील रूग्णांचे रक्तदाब या अभ्यासासाठी तपासण्यात आले होते. त्यांचा रक्तदाब अगोदर बसलेल्या अवस्थेत आणि नंतर झोपलेल्या अवस्थेतही तपासण्यात आला होता. जवळपास 12 हजार जणांची ही तपासणी करण्यात आल्याची माहिती असोसिएशनकडून देण्यात आली.
The post Blood pressure check: झोपून चेक केलेले ‘ब्लड प्रेशर’ अधिक बिनचूक; नव्या अभ्यासातून समोर आले निष्कर्ष appeared first on Dainik Prabhat.