Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Blood donation : ‘रक्तदान’ करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

by
April 14, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Blood donation : ‘रक्तदान‘ हे सर्वात महत्वाचे दान मानले जाते कारण ते एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकते. दुखापत, ऑपरेशन किंवा कोणत्याही गंभीर आजाराच्या उपचारादरम्यान रुग्णाला बाहेरून रक्ताची गरज भासू शकते, अशा वेळी रक्तदानातून गोळा केलेले रक्त वापरले जाते.

रक्तदान हे केवळ प्राप्तकर्त्यासाठीच नव्हे तर रक्तदात्यासाठीही फायदेशीर मानले जाते. अभ्यास दर्शविते की जे लोक नियमितपणे रक्तदान करतात त्यांना हेमोक्रोमॅटोसिसचा धोका कमी होतो. शरीरात जास्त प्रमाणात आयर्न झाल्यामुळे ही समस्या उद्भवते.

याशिवाय जे लोक रक्तदान करत राहतात त्यांच्या शरीरात नवीन रक्तपेशींच्या निर्मितीतही वाढ होते. रक्तदान केल्याने कर्करोग, हृदय आणि यकृताशी संबंधित आरोग्य धोके देखील कमी होतात.

मात्र रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर अन्न आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चला, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

कोण रक्तदान करू शकतो?

१८ वर्षे किंवा त्याहून अधिक आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या निरोगी व्यक्ती स्वेच्छेने रक्तदान करू शकतात. रक्तदात्याचे वजन किमान ५० किलो असावे आणि तो मधुमेह किंवा रक्तदाब यांसारख्या समस्यांचा रुग्ण नसावा.

एकदा दान केल्यानंतर ५६ दिवसांनी दुसरे दान करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तदान केल्याने ना अशक्तपणा येत नाही आणि आरोग्यालाही हानी पोहोचत नाही. होय, रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर आहार घेण्याबाबत काळजी घेणे योग्य आहे.

रक्तदान करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी :

– रक्तदान करण्यापूर्वी हलका पण सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. हे तुमच्या शारीरिक कार्यांवर नियंत्रण ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल.

– रिकाम्या पोटी कधीही रक्तदान करू नका. रक्तदान केल्याने तुमच्या शरीरातील लोहाची पातळी थोडी कमी होऊ शकते, त्यामुळे आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यानंतरच रक्तदान करा. मात्र, रक्तदान केल्यानंतर शरीरातील लोहाची कमतरताही आपोआप भरून निघते.

– रक्तदान करण्यापूर्वी जास्त चरबीयुक्त पदार्थ, धूम्रपान किंवा मद्यपान टाळा.
– रक्तदान केल्यानंतर ज्यूस-पेयांचे सेवन करा.

रक्तदान केल्यानंतर काय करावे?

– रक्तदान केल्यानंतर काही काळ तुम्हाला थोडासा अशक्तपणा जाणवू शकतो, मात्र ते लवकरच साधारण होते.

– रक्तदान केल्यानंतर पाणी पिणे आणि आरोग्यदायी व पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक मानले जाते.

– आरोग्य तज्ज्ञ लोह आणि व्हिटॅमिन-सी असलेले पदार्थ खाण्याची शिफारस करतात.

– रक्तदान केल्यानंतर काही वेळातच शरीर आपोआप नवीन रक्तपेशी तयार करू लागते, त्यामुळे रक्तदान केल्यानंतर कोणतीही अडचण येत नाही.

‘रक्तदान पूर्णपणे सुरक्षित’

आरोग्य तज्ज्ञ सांगतात, रक्तदान पूर्णपणे सुरक्षित आहे, अजिबात घाबरू नये. रक्तदान केल्यानंतर, तुम्हाला समाधान वाटते जे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

रक्तदान केल्याने शरीरात रक्ताची कमतरता भासणार नाही, अशा पद्धतीने शरीरात रक्त निर्मितीची प्रक्रिया सतत चालू राहते. त्यामुळंच तज्ज्ञ रक्तदान ही पूर्णपणे आरोग्यदायी प्रक्रिया मानतात.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar