Bloating | Food : अनेक लोकांना पोट फुगण्याची समस्या असते. काही लोकांची अशी तक्रार असते की, अगदी काहीही थोडंस खाल्ल तरी त्यांचं पोट भरल्यासारख जाणवतं. तर काहींच पोट सतत गच्च भरल्यासारख जावणते. मेडिकल भाषेत याला ब्लोटिंग होणे असं म्हणतात.
याचा अर्थ असा असतो की, पोटात हवा भरलेली असते. जी हवा बाहेर न आल्यामुळे अगदी पोट फुग्यासारखं टण करून फुगलेलं असतं. त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास देखील होतो. त्यासाठी तुम्ही काय खाऊ नये आणि तुमचा योग्य आहार कसा असला पाहिजे याबद्दल खालील माहिती नक्की वाचा….
– ब्लोटिंगची समस्या होऊ नये म्हणून काय कोणते पदार्थ खाणं टाळावे…
– फरसबी
ही खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या वाढू शकते. कारण त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. शिवाय त्यात ऑलिगोसॅकराइड्स असतात, ज्यामुळे अन्न लवकर पचण्यास अडचण निर्माण होते.
– कार्बोनेटेड पेय
यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण हे कोल्डड्रिंक्स पितो, तेव्हा ड्रिंक्ससह वायू देखील गिळतो. ज्यामुळे पोटात गॅस तर निर्माण होतेच, शिवाय ओटीपोटात हा गॅस जमा होऊ लागतो. आणि पोट फुगण्याची समस्या वाढते.
– केळी, ब्रोकोली आणि कोबी
ही एक क्रूसीफेरस भाजी आहे. यामध्ये रॅफिनोज असतात. रॅफिनोज एक प्रकारची साखर असते. जी गॅस निर्माण करते ज्यामुळे पोटदुखीचा त्रास होतो.
– कांदा आणि लसूण
हे खाल्ल्याने देखील पोट फुग्ण्याचा त्रास होऊ शकतो. कांद्यामध्ये फ्रुक्टोन असते, जे एक विरघळणारे फायबर आहे. ज्यामुळे पोट फुग्ण्याचा त्रास होतो.
– कच्चे भाज्या
आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण यामुळे पोटात गॅसही निर्माण होऊ शकते. कारण कच्च्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. अशावेळी ब्लोटिंगचा त्रास होतो.
असा टाळा ब्लोटिंगचा त्रास :
दरम्यान, आपल्याला जेवण केल्यानंतर ब्लोटिंगचा त्रास होत असेल तर, पाण्यात ओवा, जिरे आणि बडीशेप उकळवून प्या. यामुळे नक्कीच फायदा होईल.
The post Bloating : पोट सतत फुगतय? गच्च होतय? तर ‘हे’ पदार्थ खाणं आजपासूनच बंद करा, मिळेल झटपट आराम ! appeared first on Dainik Prabhat.