Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Biscuits With Tea: चहासोबत टोस्ट-बिस्किट खात असाल तर सावध व्हा; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

by
December 16, 2025
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Biscuits With Tea: चहासोबत टोस्ट किंवा बिस्किट खाण्याची सवय अनेकांना असते. सकाळी किंवा संध्याकाळी चहा आणि त्यासोबत हा हलका नाश्ता घेतला जातो. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

टोस्ट आणि बिस्किटांमध्ये मैदा, साखर आणि अपायकारक चरबी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अॅसिडिटी, वजनवाढ आणि इतर आजारांचा धोका वाढू शकतो.

शरीरावर होणारे परिणाम

टोस्ट आणि बिस्किटांमध्ये साखर व कॅलरी जास्त असल्याने ते चहासोबत खाल्ल्यास रक्तातील साखर पटकन वाढते. ही सवय दीर्घकाळ राहिल्यास डायबिटीस, लठ्ठपणा आणि हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.

वजन आणि मेटाबॉलिज्मवर परिणाम

चहासोबतटोस्ट-बिस्किट खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. हळूहळू शरीरात चरबी साचते आणि मेटाबॉलिज्म बिघडू शकतो.

काय खाल्लं तर चांगलं?

आरोग्य जपायचं असेल तर टोस्ट-बिस्किट टाळणंच योग्य. त्याऐवजी भाजलेले चणे, मखाणे, नट्स, मूग डाळीचा चिल्ला किंवा मल्टिग्रेन टोस्ट असे हेल्दी पर्याय निवडा.

गोड खाण्याची इच्छा असेल तर गुळ-ड्रायफ्रूटचे लाडू हा चांगला पर्याय आहे. यात फायबर, प्रोटीन आणि चांगली चरबी मिळते, ज्यामुळे पचन सुधारते आणि ऊर्जा मिळते.

म्हणून पुढच्यावेळी चहा बनवताना त्यासोबत काय खातोय याचा विचार करा. कारण चहापेक्षा जास्त नुकसान कधी कधी चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टी करतात. आरोग्याला हलक्यात घेऊ नका.

Join our WhatsApp Channel

The post Biscuits With Tea: चहासोबत टोस्ट-बिस्किट खात असाल तर सावध व्हा; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar