[[{“value”:”
Bike Service at Home : तुमच्या बाईकची घरीच सर्व्हिसिंग करून तुम्ही फक्त पैसे वाचवू शकत नाही तर तुमच्या बाईकची कार्यक्षमता आणि मायलेज देखील सुधारू शकता. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरीच तुमची बाईक चांगलीची ठेवू शकता. कोणत्याही खर्चाशिवाय घरबसल्या तुमच्या बाईकला अगदी नव्या सारखी ठेवीची असेल तर, खाली दिलेले टिप्स एकदा पाहा…
1. इंजिन ऑइल बदला:
बाइकच्या इंजिन ऑइलची गुणवत्ता नियमितपणे तपासा. जर ऑइल घट्ट आणि घाण झाले असेल तर ते बदला. ऑइल बदलण्याची प्रक्रिया: काही वेळ बाइक सुरू करा जेणेकरून ऑइल गरम होईल.
नंतर ऑइल ड्रेन नट उघडा, जुने तेल काढून टाका आणि नवीन तेल घाला. साधारणपणे दर 2,000-3,000 किलोमीटरवर ऑइल बदला. यामुळे इंजिनची कार्यक्षमता आणि मायलेज दोन्ही सुधारेल.
2. एअर फिल्टर साफ करा:
बाईकचा एअर फिल्टर धूळ आणि घाणीने अडकू शकतो, ज्यामुळे इंजिनला पुरेशी हवा मिळत नाही. दर 2,000-3,000 किलोमीटर अंतरावर ते स्वच्छ करा किंवा आवश्यक असल्यास ते बदला. एअर फिल्टर काढा आणि हवेने स्वच्छ करा किंवा पाण्याने हलके धुवून चांगले कोरडे होऊ द्या. आणि पुन्हा बाईक मध्ये फिट करा.
3. स्पार्क प्लग तपासा:
स्पार्क प्लग योग्यरित्या काम करत आहे की नाही हे तपासा. जर ते खराब झाले असेल तर ते बदला. स्पार्क प्लग काढा आणि तो स्वच्छ करा, जेणेकरून ते योग्यरित्या स्पार्क होईल. नवीन स्पार्क प्लग स्थापित केल्याने बाईकची सुरुवात सुधारते आणि इंधन कार्यक्षमता सुधारते.
4. टायरची हवा तपासा:
टायरची हवा नियमितपणे तपासा आणि योग्य पातळीवर ठेवा. उच्च किंवा कमी दाब टायरच्या पकड आणि मायलेजवर परिणाम करू शकतात. रोटेशन आणि अलाइनमेंट: टायर्सची स्थिती देखील तपासा, लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी टायरची स्थिती एकदा तपासून घ्या.
5. ब्रेक आणि क्लच:
ब्रेक्स नीट काम करत आहेत की नाही ते नियमितपणे तपासा. ब्रेक पॅड किंवा ब्रेक शूज खराब असल्यास, ते बदला. जर क्लच खूप घट्ट किंवा सैल वाटत असेल तर ते योग्यरित्या नीट करा. यामुळे गीअर्स बदलणे सोपे होईल आणि बाइकचा स्मूथनेस चांगला राखला जाईल.
6. बाईक चेन साफ करणे आणि स्नेहन:
बाईकच्या चेनला धूळ आणि ग्रीस काढण्यासाठी ब्रश आणि डिटर्जंट वापरा. साफसफाई केल्यानंतर, साखळीवर ‘चेन ल्यूब किंवा ग्रीस’ लावा, जेणेकरून ते सुरळीत चालेल आणि घर्षण कमी होईल.
7. बॅटरी तपासा:
बॅटरी टर्मिनल्सवर साचलेली घाण साफ करा. बॅटरी कमी होत असल्यास, ती चार्ज करा किंवा आवश्यक असल्यास ती बदला.
लाईटआणि इंडिकेटर व्यवस्थित काम करत आहेत का ते तपासा. खराब बल्ब काढून नवीन लावा.
8. इंधन प्रणाली तपासा:
इंधन फिल्टरमध्ये घाण जमा होऊ शकते, ज्यामुळे इंधनाचा प्रवाह अवरोधित होतो. ते स्वच्छ करा किंवा बदला. टाकीच्या आत घाण किंवा पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. टाकी साफ केल्याने इंधनाची गुणवत्ता कायम राहते आणि मायलेज सुधारते.
The post Bike Service : एकही रुपया खर्च न करता घरीच करा ‘Bike’ची कडक सर्व्हिसिंग; शेवटची टिप्स नक्की वाचा, मायलेज मिळेल दमदार ! appeared first on Dainik Prabhat.
“}]]