मेथीदाणा केवळ एक मसाला नसून प्रत्येक आजार दूर करण्याचे औषध आहे. या मेथीदाण्याचे विशेष फायदे असल्याचे आपल्या लक्षात येईल. यातही हे मेथीदाणे भिजवून त्याचा वापर केल्यास आणखी फायदा मिळू शकतो.
यासाठी आपल्याला केवळ पाण्याने भरलेल्या एका ग्लासात दोन चमचे मेथी दाणा टाकून रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत. सकाळी पाणी गाळून रिकाम्या पोटी पिऊन घ्यावे. अशाने मेथीच्या पाण्यात अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी ऑक्सीडेंट गुण वाढतात, ज्याने शरीरातील सर्व आजार दूर होऊ लागतात. याचे आणखीही अनेक फायदे आहेत.
मेथीदाण्याने वजन कमी करण्यात मदत होते. याने भुकेवर नियंत्रण राहतं. एक महिन्यापर्यंत रोज मेथीचे पाणी पिण्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. तसेच याने ब्लड प्रेशरवर नियंत्रण राखता येते. मेथीमध्ये गॅलाक्टोमेनन नामक कंपाउंड आणि पोटॅशियम असते. हे दोन्ही घटक आपले ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यात मदत करतात.
कोलेस्टेरॉल लेवल कमी करण्यासाठीही मेथी खाण्याने किंवा त्याचे पाणी पिण्याने फायदा होतो. याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे मेथी दाणे भिजवून त्याचे पाणी पिल्यास संधिवातापासून मुक्ती मिळते. यात अँटी ऑक्सीडेंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असल्यामुळे, मेथीच्या पाण्याने संधिवात आजारात फायदा होतो. कर्करोगापासून बचाव होण्यासाठीही हे फायदेशीर आहे.