कोथिंबीर
कोथिंबीर ही तर आपल्या रोजच्या आहारातील भाजी. ती पदार्थाच्या सजावटीसाठी तर वापरतातच शिवाय ती औषधीही आहे. कोथिंबिरीमध्ये जीवनसत्त्व ए व लोह भरपूर असते.
गुणधर्म :
रुचकर, पाचक, शीतल, चक्षुष्य, पित्तनाशक, सुगंधी, आणि हृद्य.
घटक :
जीवनसत्त्व ए100 ग्रॅम
जीवनसत्त्व सी100 ग्रॅम
पाणी87.9 टक्के
प्रोटीन3.3 टक्के
चरबी0.6 टक्के
कार्बोदित पदार्थ6.5 टक्के
कॅल्शियम0.14 टक्के
फॉस्फरस0.06 टक्के
लोह10 मि. ग्रॅम
मॅग्नेशियम100 ग्रॅम
हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून पोहे, सांजा, अनेक भाज्यांमध्येही आणि वरुन सजावटीसाठीही वापरली जाते. कोथिंबिरीच्या वड्या, परोठेही केले जातात. चटणीत तर कोथिंबिरीला मानाचे स्थान आहे. कोथिंबीरीमुळे पदार्थ रुचकर लागतात व छानही दिसतात. तसेच इतर खाद्य पदार्थात टाकली असता पदार्थ खमंग व लज्जतदार बनतात. कोथिंबिरीच्या चटणीचा उपयोग आपण नेहमी करतोच. परंतु कोथिंबिरीचा रस अधिक गुणकारी असतो.
औषधी उपयोग :
कोथिंबिरीमध्ये ए जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने डोळ्यांसाठी ती गुणकारी असते. डोळ्यांत कोथिंबिरीच्या रसाचे थेंब टाकले असता चांगला फायदा होतो. पांडुरोगात कोथिंबिरीचा रस अत्यंत गुणकारी आहे.
The post Benefits Of Coriander Leaves : कोथिंबीरीच्या पानांमध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म , याचे नियमित सेवन केल्यास मिळतील असंख्य फायदे appeared first on Dainik Prabhat.