Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

विषाणू नष्ट करणाऱ्या भिमसेनी कापूराचे ‘हे’ चमत्कारी फायदे आपल्याला माहिती आहेत काय ?

by प्रभात वृत्तसेवा
December 16, 2020
in आयुर्वेद, आरोग्य वार्ता
A A
विषाणू नष्ट करणाऱ्या भिमसेनी कापूराचे ‘हे’ चमत्कारी फायदे आपल्याला माहिती आहेत काय ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – करोना व्हायरसमुळे बाजारपेठेत मागणी असल्याने भाव वाढले आहेत. कापराच्या सुगंधाने जीवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात, असे वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे. याशिवाय कापराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते.

सर्दी-पडसे व्हायची लक्षणे असताना रुमालात 3-4 कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दी-पडसे होत नाही, असे आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार करोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून लोकांनी कापराचा उपयोग करणे सुरू केले आहे. तसेच कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.

आयुर्वेदिक भिमसेनी कापूराचे फायदे  

  • भिमसेनी कापूर कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही. स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते.
  • सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये भिमसेनी कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत. नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
  • रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.
  • पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात किंवा उंचावर चढताना श्वास लागत असल्यास भिमसेनी कापूर हुंगावा.
  • तीळाच्या तेलातून भिमसेनी कापूर सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी.

 

  • केसातील कोंड्याकरीता : सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. नाहीतर खोबरेल तेलात भिमसेनी कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. शक्यतो शनीवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी न्हाऊन तुम्ही कामावर जायला मोकळे
  • नेहमीच्या कापरात मेण असते, पण भिमसेनी कापूरात मेण नसते. त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा. आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना कापूरमिश्रीत वीडा देतात तो हाच कापूर, दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात.
  • दाढदुखी करीता भिमसेनी कापूराचा छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही.
  • खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात. शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध वेगवेगळे असते.
  • संध्याकाळी भिमसेनी कापराचे दोन लहान लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही,
  • प्रवासी बॅग / कपडे साठवण्याची बॅग मध्ये भिमसेनी कापूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास न येता एक छान सुगंध येतो कपड्यांना कसर, झुरळ लागत नाही. पावसाळ्यात विशेषतः कपडे चांगले सुकत नाहीत ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरले की त्यांना कुबट वास येतो तो कापूर ठेवल्या जातो.
  • डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती भिमसेनी कापूर ठेवा, डास फिरकत नाहीतच शिवाय इतर कीटक, उंदीर वगैरे लांब राहतात.
  • कधी शेकोटी किंवा चूल पेटविणे जर त्रासदायक असेल तर काही या कापराच्या वड्या ते काम सोपे करतात.
  • रुमालात काही भिमसेनी कापुराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर हुंगायला पण सोपे पडते. आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही,  डाग  पडत नाहीत आणि साबणाने तो विरघळत पण नाही.
  • गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात गुडनाईट वडी किंवा लीक्वीड ऐवजी त्यावर भीमसेनी  कापूर ठेऊन चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच, डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित.
  • भीमसेनी कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्या मुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल.
  • सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही.
  • भीमसेनी कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.
  • भीमसेनी कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.
  • भीमसेनी कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.
    घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो.
  • मुठभर भीमसेनी कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
  • मुठभर भीमसेनी कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाहीत.
  • पण कापूर हा उगाच अति जाळू नये. कारण अति धूराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परीणामा बुबुळाच्या पाठील टिशूस् वर होतो.
  • गरम पाण्यात मीठ व भीमसेनी कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने पाय दुखणे कमी होते व फुगलेल्या शीरा खाली बसतात. (५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी)
  • भीमसेनी कापूराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते.
Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthhelth tips
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar