Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Benefits And Side Effects Of Eno: ॲसिडिटी झाली की लगेच ENO पिता? जास्त वापरामुळे शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम!

by
June 15, 2026
in लाईफस्टाईल
A A
Benefits And Side Effects Of Eno: ॲसिडिटी झाली की लगेच ENO पिता? जास्त वापरामुळे शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Benefits And Side Effects Of Eno: छातीत जळजळ, गॅस, अपचन किंवा पोट फुगल्याची समस्या झाली की अनेक जण लगेच ENO पितात. काही मिनिटांत आराम मिळत असल्यामुळे अनेकांच्या घरात ENO कायम ठेवले जाते. मात्र, तज्ज्ञांच्या मते वारंवार किंवा रोज ENO पिण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

ENO हे एक अँटासिड पावडर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोडियम बायकार्बोनेट, सायट्रिक अॅसिड आणि सोडियम कार्बोनेट हे घटक असतात. हे पोटातील अतिरिक्त आम्ल कमी करून ॲसिडिटीपासून तात्पुरता आराम देण्याचे काम करते.   (Benefits And Side Effects Of Eno)

मात्र, प्रत्येक वेळी ॲसिडिटी झाली की ENO पिणे योग्य नाही. कारण यामुळे मूळ समस्या लपून राहू शकते आणि दीर्घकाळात शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते ENO चा जास्त वापर केल्यास डोकेदुखी, चक्कर येणे, चिडचिड होणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा, मळमळ, उलटी, कफ वाढणे तसेच पाय आणि गुडघ्यांमध्ये सूज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.   (Benefits And Side Effects Of Eno)

रोज ENO पिण्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्याने काही लोकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते. विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा किडनीचे आजार आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ENO घेऊ नये.

 

ENO मध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयावरही अतिरिक्त ताण येऊ शकतो.  (Benefits And Side Effects Of Eno)

तसेच, रोज ENO घेत राहिल्यास पोटाची नैसर्गिक पचनक्रिया मंदावू शकते. त्यामुळे शरीर स्वतःहून आवश्यक आम्ल तयार करण्याचे प्रमाण कमी करू शकते. परिणामी काही काळानंतर ॲसिडिटीची समस्या आणखी वाढण्याची शक्यता असते.   (Benefits And Side Effects Of Eno)

किडनीच्या रुग्णांसाठीही जास्त प्रमाणात ENO घेणे धोकादायक ठरू शकते. शरीरातील सोडियमचे असंतुलन किडनीवर अतिरिक्त ताण निर्माण करू शकते.

गर्भवती महिलांनीही ENO चा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्भावस्थेत कोणतेही औषध स्वतःच्या मनाने घेणे टाळावे.

तज्ज्ञांच्या मते, वारंवार ॲसिडिटी होत असेल तर फक्त ENO वर अवलंबून राहू नये. त्याऐवजी जीवनशैली आणि आहारात बदल करणे गरजेचे आहे. तेलकट, मसालेदार आणि जंक फूड कमी खाणे, वेळेवर जेवणे, रात्री उशिरा जेवणे टाळणे, पुरेसे पाणी पिणे आणि नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते.

जर ॲसिडिटी, अपचन किंवा पोटातील जळजळ वारंवार होत असेल, तर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

लक्षात ठेवा, ENO हे कायमस्वरूपी उपाय नाही. ते फक्त तात्पुरता आराम देऊ शकते. त्यामुळे सवयीने किंवा रोजच्या रोज ENO पिणे टाळा आणि आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar