[[{“value”:”
Beauty tips: आपल्या दैनंदिन वापरातील सर्वात मूलभूत वस्तू म्हणजे साबण. पण अनेकजण न विचार करता कुठलाही साबण वापरतात आणि नंतर त्वचा कोरडी पडणे, खरखरीत होणे किंवा ऍलर्जी होणे अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच तुमच्या त्वचेप्रमाणे योग्य साबण निवडणे अत्यंत गरजेचे आहे.
आज बाजारात सेंसिटिव, हायड्रेटिंग, अँटी-बॅक्टेरियल, हर्बल असे अनेक प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. मात्र कोणता साबण तुमच्यासाठी योग्य आहे हे ठरवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
१. सर्वप्रथम ओळखा तुमची त्वचा
कोरडी त्वचा : त्वचा लवकर कोरडी पडते अशांसाठी हायड्रेटिंग साबण योग्य. यात मॉइस्चर टिकून राहते.
तेलकट त्वचा : तेलकटपणा जास्त असल्यास अँटी-बॅक्टेरियल साबण वापरा. हे त्वचा स्वच्छ आणि बॅक्टेरिया-रहित ठेवतात.
संवेदनशील त्वचा : अशा त्वचेसाठी फ्रॅग्नन्स-फ्री किंवा हर्बल साबण सर्वोत्तम. रसायनांची मात्रा कमी असल्याने ऍलर्जीची शक्यता कमी असते.
२. साबणातील घटक (Ingredients) तपासा
साबण खरेदी करताना त्यातील घटक पाहणे महत्त्वाचे.
सल्फेट, पॅराबेन किंवा इतर रसायने कमीत कमी असावीत.
अॅलोवेरा, मध, नारळ तेल किंवा इतर नैसर्गिक घटक असलेले साबण त्वचेसाठी अधिक सुरक्षित व पोषक असतात.
३. pH लेव्हल पाहा
त्वचेचा नैसर्गिक pH साधारण 5.5 असतो.
म्हणून साबणाचा pH हा याच्या आसपास असणे आवश्यक.
pH जास्त किंवा कमी असलेल्या साबणामुळे त्वचा कोरडी पडू शकते किंवा त्रास होऊ शकतो.
म्हणून खरेदीपूर्वी शक्य असल्यास साबणाचा pH तपासा.
४. साबण वापरण्याची योग्य पद्धत
योग्य साबण निवडण्याबरोबरच त्याचा वापरही योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे.
साबण हलकेच लावा, जोरजबरदस्तीने चोळू नका.
अंघोळीसाठी कोमट पाणी वापरा.
आंघोळ झाल्यावर मॉइस्चरायझर नक्की लावा.
हे केल्यास त्वचा मऊ, तजेलदार आणि सुरक्षित राहते.
महत्वाची सूचना
ही माहिती सामान्य जागरूकतेसाठी आहे. त्वचेवर सतत त्रास होत असल्यास किंवा ऍलर्जी दिसल्यास त्वचारोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे उत्तम.
The post Beauty tips: साबण खरेदी करताना चुका करू नका! तुमच्या त्वचेसाठी कोणता साबण योग्य? जाणून घ्या महत्त्वाची माहिती appeared first on Dainik Prabhat.
“}]]
