Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Beauty & Skin: चेहऱ्यावरील डाग-धब्ब्यांवर घरगुती उपाय; फक्त 15 दिवसांत त्वचा बनेल निखळ व स्वच्छ

by
August 25, 2025
in लाईफस्टाईल
A A
Beauty & Skin: चेहऱ्यावरील डाग-धब्ब्यांवर घरगुती उपाय; फक्त 15 दिवसांत त्वचा बनेल निखळ व स्वच्छ
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Beauty & Skin: चेहऱ्यावर नको असलेले डाग-धब्बे ही अनेकांसाठी मोठी चिंता असते. पिंपल दाबून फोडल्यामुळे, हार्मोनल बदलांमुळे किंवा अॅलर्जीमुळे राहिलेले काळे डाग सहज जात नाहीत. कधी कधी हे डाग इतके ठसठशीत दिसतात की आत्मविश्वासावरही परिणाम होतो. बाजारात उपलब्ध असलेली फेस क्रीम्स, सीरम्स आणि औषधं महागडी असतात, शिवाय त्यामध्ये असणारे रसायन त्वचेला हानीकारक ठरू शकतात. त्यामुळे नैसर्गिक उपायाकडे लोकांचा कल वाढू लागला आहे.

अशाच नैसर्गिक उपायांपैकी एक सोपा व घरच्या घरी करता येणारा उपाय म्हणजे कापूर आणि नारळ तेलाचा वापर. हा उपाय सोशल मीडियावर लोकप्रिय झाला असून, अनेकांनी याचा अनुभवही शेअर केला आहे.

हा उपाय कसा करावा?

सर्वप्रथम 2-3 कापूर बारीक कूटून घ्या.

त्यात एक-दोन चमचे शुद्ध नारळ तेल मिसळा.

ही पेस्ट नीट एकजीव करून घ्या.

चेहऱ्यावर किंवा शरीरावर जिथे डाग-धब्बे आहेत, तिथे हलक्या हाताने लावा.

20-25 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

हा उपाय दररोज रात्री झोपण्यापूर्वी केल्यास जास्त परिणामकारक ठरतो.

फक्त 15 दिवसांनी त्वचेवर निखार येऊ लागतो आणि नियमित वापरामुळे 16व्या दिवसापासून त्वचा अधिक उजळ, स्वच्छ आणि गुळगुळीत दिसू लागते.

कापूरचे फायदे

कापूर हा नैसर्गिक औषधी घटक मानला जातो.

यात अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

पिंपल्स व मुरुमांमुळे झालेले काळे डाग कमी होण्यास मदत होते.

त्वचेतील रक्ताभिसरण सुधारल्याने नवीन पेशी निर्माण होतात आणि त्वचा लवकर दुरुस्त होते.

चेहऱ्यावरील सूज आणि लालसरपणा कमी करण्यासही कापूर उपयुक्त आहे.

नारळ तेलाचे फायदे

नारळ तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

हे त्वचेला नैसर्गिक आर्द्रता देतात आणि कोरडेपणा कमी करतात.

यामुळे डाग हलके करण्यास आणि त्वचेचा रंग एकसारखा करण्यास मदत होतं.

त्वचेवर नैसर्गिक तेज येऊन ती मऊ आणि लवचिक दिसते.

महत्त्वाची सूचना

हा उपाय नैसर्गिक असला तरी प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. काहींना कापूरमुळे सौम्य जळजळ किंवा अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे उपाय करण्यापूर्वी हातावर थोडी पेस्ट लावून चाचणी घ्यावी. त्वचेवर जास्त त्रास जाणवल्यास लगेच धुवून टाकावा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या साध्या घरगुती उपायामुळे रसायनांचा त्रास टाळून त्वचेचं सौंदर्य वाढवता येऊ शकतं.

Join our WhatsApp Channel

The post Beauty & Skin: चेहऱ्यावरील डाग-धब्ब्यांवर घरगुती उपाय; फक्त 15 दिवसांत त्वचा बनेल निखळ व स्वच्छ appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar