आपले केस निरोगी आणि चमकदार असावेत असे प्रत्येक स्त्री ला वाटत असते. त्यासाठी अनेक जणी नानाविध प्रकारांचा अवलंब करत असतात. यामध्ये विविध शाम्पू, चमकदार तेल, थेरपीज अशा काही उपायांचा अवलंब केला जातो. इतके सगळे करूनही केस निरोगी व म्हणावे तितके लांब होत नाहीत. याची अनेक कारणे देता येतील.
यामध्ये योग्य पद्धतीचा आहार न घेण्यापासून ते हानिकारक केमिकल्सचा हेअर डाय वापरणे, कलरिंग करणे, स्ट्रेटनिंग, कर्लिंग अशा अनेक कारणांमुळे केस गळू लागतात. केस नियमित कापा जेणेकरून वेड्यावाकड्या वाढलेल्या केसांना कात्री लागेल आणि केस सरळ वाढतील. केस विंचरताना मोठ्या दातांचा कंगवा वापरावा त्यामुळे केस तूटत नाहीत.
झोपताना डोक्याखाली मऊ उशी घेऊन झोपा. अंगाखाली केस येऊन तुटणार नाहीत याची काळजी घ्या. आठवड्यातून किमान दोनदा केसांना तेलाने मालीश करा. तेल लावायचे नसल्यास केवळ हातांनी स्काल्पला हलक्या हाताने मालीश करा यानेही स्काल्पला आराम मिळतो. केस धुतल्यानंतर ते लगेच विंचरू नका. व्यवस्थित वाळल्यानंतर ते विंचरा. पदुषणापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी बाहेर जाताना डोक्याला स्कार्फ बांधावा. हे सर्व करण्याबरोबरच आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत केसांना अंतर्गत पोषण मिळणार नाही तोपर्यंत बाह्य पोषणाचा काहीही फायदा होऊ शकत नाही.