पुणे – दाढी (beard) वाढवण्याचा आणि दाढीला (beard) वेगवेगळे लूक देण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच वाढला आहे. त्यासाठी अनके मोठ्या प्रमाणात तुम्ही चेहऱ्यावर दाढी (beard) वाढवतात. मात्र, या दाढी (beard) आणि मिशांमुळे तुम्ही ‘कोरोना (corona) व्हायरस’च्या संपर्कात येण्याची दाट शक्यता असल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे.
दाढी (beard) आणि मिशांमुळे व्हायरसच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. भलेही दाढी (beard) नसल्याने तुम्ही चांगले दिसत नसाल, मात्र घनदाट दाढीपेक्षा तुम्ही सुरक्षित असणे महत्वाचे आहे.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने जारी केलेल्या इंफोग्राफिक्समध्ये सांगितले आहे की, मोठ्या प्रमाणातील दाढी (beard) ‘फेस मास्क’चा प्रभाव कसा कमी करते.
या साठी एक चार्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे. हा चार्ट 2017 चा असून, कोरोना (corona) व्हायरसच्या प्रसारानंतर पुन्हा एकदा हा चार्ज प्रसारित करण्यात आला आहे.
तुमच्या चेहऱ्यावर जेवढे अधिक केस असतील, तेवढा मास्क व्यस्थित बसणार नाही. फुल बिअर्ड, स्टब्बल, मट्टन चॉप्स अर्थात घनदाट केस असलेली दाढी (beard) ठेऊ नये. कारण तुमच्या चेहऱ्यावरील केस फिल्टरचे काम करत नाहीत.
सीडीसीने या संदर्भात 12 स्टाइल सुचवल्या आहेत. यात क्लिन शेव, सोल पॅट्च, साइड व्हिस्कर्स, पेन्सिल अशा स्टाईलचा समावेश आहे.
दाढीचे (beard) केस दाट नसतात व बारीक कणांना रोखू शकत नाहीत. चेहऱ्यावर केस असल्याने मास्क लीकेजचे प्रमाण 20 वरून 1000 पट अधिक वाढते. त्यामुळे आपण अशा परिस्थिती घनदाट दाढी (beard) ठेवणे टाळावे.