बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्या-पिण्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. इतकंच नव्हे तर चिंता, राग, भीती यासारखे मानसिक विकार वाढले आहेत. परिणामी शहरी भागात उच्च रक्तदाबा चा ( blood pressure ) आजार बळावतो आहे. या आजाराची लक्षणं काय आहेत. हा विकार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती
उच्च रक्तदाब ( blood pressure ) म्हणजे वय आणि इतर वर्गीकरण केलेल्या रक्तदाबा पेक्षा ( blood pressure ) जास्त दाब होय. याचा अर्थ रक्त धमन्यांमध्ये तणाव निर्माण होणे होय. सामान्यत: रक्तदाब 120/80 पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. 120/80 किंवा 139/89 च्या दरम्यानचा दाब हा पूर्व उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो. तसंच 140/90 पेक्षा अधिक असलेला रक्तदाब हा उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो.
काही वर्षापासून भारतामध्ये उच्च रक्तदाबा चं ( blood pressure ) प्रमाण वाढलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर 1960 मध्ये पाच टक्के आणि 1990 मध्ये 12 ते 15 टक्के व्यक्तींमध्ये हा आजार आढळायचा. मात्र 2000 या वर्षी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार भारताच्या शहरी भागांमध्ये हे प्रमाण 25 टक्के आणि ग्रामीण भागांमध्ये 10 टक्के इतक्या प्रमाणात हा आजार पसरल्याचे दिसून आलं होतं. तर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या अहवालानुसार शहरी भागांतील मध्यमवर्गीयांमध्ये 32 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिलांमध्ये उच्च रक्तदाब च्या ( blood pressure ) विकाराचा प्रसार झाल्याचं आढळलं आहे.
तसेच उच्च रक्तदाब- ( blood pressure ) पूर्व ही स्थिती शहरी भागांतील मध्यमवर्गीयांत 40 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिलांमध्ये असल्याचीही नोंद या अहवालात आहे. या आकडेवारीतून असे दिसून येते की, प्रौढ वयातील लोकसंख्येपैकी केवळ 30 ते 40 टक्के प्रौढ व्यक्तींचा रक्तदाब ( blood pressure ) सामान्य स्थितीत म्हणजे 120 एमएम एचजी किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणातील आकुंचित रक्तदाब ( blood pressure ) (सिस्टॉलिक ब्लडप्रेशर) व 80 ते 89 एमएम एचजी किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणातील प्रसारित रक्तदाब ( blood pressure ) (डियस्टॉलिक ब्लड प्रेशर) या स्थितीमध्ये आहे.
उच्च रक्तदाब ( blood pressure ) या आजारामुळे शरीरातील विविध अवयवांचे नुकसान होऊ शकते. प्रामुख्याने मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि डोळे या अवयवांवर या विकाराचा अधिक परिणाम होताना दिसून येतो. रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-या विविध प्रकारच्या शारीरिक आघातांपैकी (स्ट्रोक) 57 टक्के आघात हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे मृत्यू ओढवू शकतो, त्यापैकी 24 टक्के आजार हे उच्च रक्तदाब मुळे ( blood pressure ) होतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा प्रतिबंध आणि नियंत्रण या दोन गोष्टी अत्यंत महवाच्या ठरतात.
रक्तदाब : काय काळजी घ्यावी? ( blood pressure )
धूम्रपान टाळणे
अतिप्रमाणात अल्कोहोलचं सेवन करणं टाळावं
रोज नियमितपणे व्यायाम करावा. शारीरिक व्यायाम करतानाही वेगाने चालणं, मंदगतीने धावणं यासारखे शरीराकडून मेहनत करून घेणारे व्यायाम करायला हवेत. विशेष म्हणजे, आठवड्यातील अधिकाधिक दिवस, रोज किमान 45 मिनिटं किंवा एक तासापर्यंत अशा प्रकारचे व्यायाम करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बीएमआयचे (बॉडी मास इंडेक्स-उंची व वजन यांचे गुणोत्तर) प्रमाण 20 ते 25 पर्यंत राहावं यासाठी वजन नियंत्रित ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. रोजच्या आहारातील मिठाचं एकूण प्रमाण सहा ग्रॅम इतकंच असावं. तसंच रोजच्या आहारामध्ये चरबीयुक्त घटक कमी आणि तंतूमय घटक अधिक असणंही जरुरीचं आहे.
रक्तदाब : कारणं ( blood pressure )
चिंता, राग, भीती, इत्यादी मानसिक विकार
आनुवंशिकता
आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणं
वजन जास्त असणं
रक्तदाब : दुष्परिणाम
वाढलेला रक्तदाब ( blood pressure ) हा मेंदूतील वाहिन्या फुटण्याचं कारण असू शकतो. मेंदूमधील वाहिनी फुटल्यास मेंदूत रक्तस्त्राव होतो. हे रक्त काही काळाने गोठतं. रक्ताची ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते. मेंदूचा जो भाग दाबला जातो तो भाग शरीरातील ज्या भागाचं नियंत्रण करत असतो तो शरीराचा अवयव लुळा पडतो आणि यालाच लकवा असं म्हणतात. थोडक्यात वाढलेला रक्तदाब ( blood pressure ) लकवा निर्माण करू शकतो. लकवा होण्यामागे कित्येक वेळा अनियंत्रित रक्तदाब ( blood pressure ) हेच कारण असतं.
डॉ. संतोषकुमार डोरा