Sunday, April 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सावधान ! पालकांनो तुमच्या ‘या’ चुकांमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेह

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
सावधान ! पालकांनो तुमच्या ‘या’ चुकांमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेह
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कोणत्याही शाळेच्या सभोवती नजर फिरवली तर गुबगुबीत गालांची मुलं हमखास तुमच्या नजरेस पडतात. काही दशकांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. बालकांच्या वजनासंबंधीच्या समस्यांना अनेक घटक जबाबदार आहेत. त्यात साखर सेवन वरच्या क्रमांकावर आहे. केवळ प्रौढ म्हणून आपण आपल्या साखर सेवनाच्या प्रमाणावर लक्ष ठेवणं पुरेसं नाही तर अनेकदा विविध जटिल समस्या आपल्यामुळे मुलांमध्ये निर्माण होत असतात. हे नेमकं घडतं कसं, त्याकडे एक दृष्टिक्षेप टाकूया!

आपण पालक म्हणून प्रामुख्याने महिलावर्ग आपल्या मुलांना गरजेपेक्षा जास्त भरवतात. लठ्ठ मूल सशक्‍त असतं, असा गोड गैरसमज आपल्या समाजात रूढ आहे. बालकाची अंगकाठी सडपातळ असेल तर असं मूल अशक्‍त मानलं जातं. बऱ्याचदा अशा मुलांना कुपोषितही ठरवलं जातं. उलट गलेलठ्ठ मूल म्हणजे खात्या-पित्या घरातील लेकरू अशी भाबडी समजूत लोकांच्या मनात घर करून असते. वजन ही समस्या ठरू शकते याबाबत मुलं अनभिज्ञ असतात. त्यामुळे ती निश्‍चिंत असतात. जे पदार्थ तोंडाला पाणी आणतात, ते खाण्याकडे या मुलांचा कल असतो. साखरेचा मुद्दा येतो तेव्हाही अतिसेवन करू नये याकडे मुलांचे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच असते. मात्र ही सवय बालकांच्या वाढीत अतिशय संवेदनशील ठरते. त्यामुळे कमी वयातच आजारांना आमंत्रण मिळतं.( diabetes in children symptoms )

ओबेसिटी या जर्नलमध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात म्हटले आहे की, साखरेमुळे वजन वाढते म्हणून ती वाईट आहे असं नाही. तर तिच्या अतिरिक्‍त सेवनामुळे तुमच्यात चयापचयसंबंधी अनेक मोठे बदल घडू शकतात. संशोधकांचा अभ्यास सांगतो की, वय वर्ष 9 ते 18 वयोगटातील 43 लठ्ठ मुलांवर साखर-मर्यादा पडताळून पाहिली. त्यात किमान एका मुलाला चयापचय समस्या म्हणजे उच्च रक्‍तदाब किंवा रक्‍तातल्या चरबीचे मोठे प्रमाण असल्याचे लक्षात आले. तसेच यकृतावर चरबी साठल्याच्या खुणा दिसल्या. सुमारे नऊ दिवस या मुलांनी साखर-मर्यादा असलेला आहार घेतला, मात्र आहारातील उष्मांक स्थिर ठेवण्यात आला. त्यांना साखरेच्या बदल्यात पिष्टमय पदार्थ (स्टार्च) आणि कबरेदके देण्यात आली. नऊ दिवसांनंतर बालकांचा सरासरी रक्‍तदाब कमी झाला.

यकृतावर साठलेली चरबी 33 पॉइंटनी कमी झाली, त्यांचे एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉल दहा पॉइंटनी घसरले. इन्सुलिन एक तृतीयांशने मंदावले. रिकाम्या पोटी शर्करा प्रमाण (फास्टिग ग्लुकोज) आणि यकृताचे कार्य सुधारले. कॅलरी (उष्मांक) म्हणजे कॅलरी नाही. या कॅलरी शरीरात त्या जिथे जातात तिथूनच येतात, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला.

या निरीक्षणाला आधार देणारा लेख अमेरिकन जर्नल ऑफ क्‍लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित झाला. त्यात असं म्हटलं आहे की, ज्या आहारात साखर अधिक प्रमाणात असते, त्याचे विपरीत परिणाम दिसतात. इतर कर्बेदकांमुळे टाईप 2 प्रकारचा मधुमेह निर्माण होऊ शकतो. तुम्ही अगोदरच मधुमेहग्रस्त असाल तर मग तो मधुमेह टाईप 1, टाईप 2 किंवा जेस्टेशनल असू दे, तुमच्या आहारातील अतिरिक्‍त साखर तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण आरोग्यदायी ठेवण्यास मदत करते.

साखरेतील उष्मांक वाईट असतात. त्यामागचं कारण म्हणजे हे उष्मांक वजन आणि कमरेचा घेर वाढवतात. त्यामुळे एचडीएलची पातळी कमी होते. एलडीएल वाढतं. रक्‍तातील शर्करा वाढतो. चयापचय क्रिया आणि उच्च रक्‍तदाब वाढतो. त्यामुळे हृदयरोगासंबंधीचे आजार बळावतात. एवढेच नव्हे तर साखरेचे जास्त प्रमाण तुमच्या यकृताला हानी पोहोचवते.

याशिवाय प्रत्येक वेळी जेवणानंतर साखर खाण्याची तुम्हाला सवय असेल तर तुमच्या शरीराची प्रतिकारशक्‍ती दिवसातून निम्म्याच प्रमाणात काम करेल. यूएसए टुडेच्या मासलेवाईक अभ्यासात असं नमूद करण्यात आलं आहे की, साखरेचे अतिसेवन म्हणजे तुमच्या प्रतिकारशक्‍तीशी केलेली गंभीर तडजोड. अशी प्रतिकारशक्‍ती जी तुम्हाला विषाणू, जीवाणू आणि परजीवींशी लढण्याची ताकद देते.( diabetes in children symptoms )

आरोग्यदायी पर्याय काटेकोरपणे अंगीकारणे ही काळाची गरज आहे. तुम्ही साखरेला पूर्णपणे निषिद्ध करू शकत नसाल, तर सेवनाच्या मर्यादा निश्‍चित करा. विज्ञान फार पुढे गेलं आहे, यासाठी खरंच त्याचे आभार मानले पाहिजेत. आपल्या मदतीसाठी कृत्रिम स्वीटनर्स आहेत.

सध्या बाजारात अनेक ब्रॅन्डसची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरात शून्य उष्मांक जातात आणि वजनावर नियंत्रण राहतं. केवळ मधुमेहींना साखरेपासून चार हात लांब राहावे लागते अशातला भाग नाही. अशा पर्यायांचा नियमित वापर तोंडाच्या उत्तम आरोग्यासाठीही सुचवला जातो. कारण साखर नाही, म्हणजे दात सडत नाहीत, तुमची चवही कायम राहते. त्यामुळे शेवटी सगळ्याच परिस्थितीचा फायदा तुम्हाला होतो.

त्या व्यतिरिक्‍त तुम्ही तुमची साखरयुक्‍त पेयं, बिस्किटं आणि केक, आरोग्यदायी नाश्‍ता पर्याय म्हणून खाऊ-पिऊ शकता. उदाहरणार्थ, कायम नैसर्गिकरित्या गोड फळे म्हणजे खजूर, केळी, द्राक्षं आणि लिची किंवा बोरं हातात ठेवा. त्यामुळे तुमची साखरेची गरज नैसर्गिकरितीने पूर्ण तर होईलच. शिवाय, समृद्ध तंतुमय घटक, जीवनसत्त्वे आणि खनिजेदेखील मिळतील.

साधारणपणे दोन-तीन तासांच्या अंतराने नियमित काहीतरी खात राहावे. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा मर्यादित राहील. शक्‍यतो प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळावेत. त्यापेक्षा नैसर्गिक घटकांचे सेवन करावे. आरोग्यदायी प्रथिने असलेल्या घटकांचे सेवन करावे. उदाहरणार्थ, ओमेगा-3, संपृक्‍त किंवा काही प्रमाणात-संपृक्‍त असलेल्या प्रथिनांचे सेवन उत्तम आहे. तुमच्या आहारात आंबवलेले पदार्थ म्हणजे दही, इडली आणि ढोकळ्याचा समावेश करा. या अन्नपदार्थात असलेले चांगले जीवाणू (गुड बॅक्‍टेरिया) अन्न पचनाला मदत करेल आणि शरीरातून विषारी घटकांचा निचरा होईल. ज्यामुळे तुमच्या यकृतावर येणारा ताण कमी होईल.  तुम्ही विचार करता त्यामानाने आरोग्यदायी सवयी अंगीकारणे सोपे आहे. तुम्हाला फक्‍त आत्तापासून सुरुवात करायची आहे. आरोग्यदायी अन्न खा आणि निरोगी जीवन जगा. ( diabetes in children symptoms )

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar