पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिन्यांपासून आपण सर्वजण कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क व हॅंड सॅनिटायझर सातत्याने वापरात आहे. आता ही आपली सवयच बनली आहे.
दरम्यान, कोणीही हाताला सॅनिटायझर लावून काडेपेटीतील काडी पेटवू नका, नाहीतर हात भाजण्याची शक्यता आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते.
सॅनिटायझरमध्ये ज्वलनाला मदत करणारे अल्कोहोलचे मोठे प्रमाण असल्याने फटाके वाजवण्यापूर्वी हाताला हॅंड सॅनिटायझर लावणे जीवावर बेतू शकते.
अल्कोहोल आगीच्या संपर्कात आल्यास ते लगेचच पेट घेते. त्यामुळे सॅनिटायझर लावून ही मेणबत्ती किंवा, दिवा पेटवल्यास हात भाजण्याचा संभव आहे. त्यामुळे ही कृती करताना सावधतेने करा.
तेंव्हा या दिवाळीत पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, करोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे तोंडावर मास्क हवाच हे लक्षात घेण्याची गरज आहे.