पुणे – एक कश ले ले यार असे म्हणणारे मित्र मला आयुष्यात सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या आहेत अशी मनोवृत्तीतून लागलेली ही तंबाखू (Tobacco) आणि धूम्रपानाची (Smoking) सवय अतिशय धोकादायक आहे. धूम्रपान, (Smoking) मद्यपान इतर अंमलीपदार्थांचे सेवन करणे, मौज मजा करणे म्हणजेच चांगले आयुष्य जगणे असा तरुणाईचा गैरसमज आहे. धूम्रपानादी (Smoking) गोष्टींचा शरीरावर होणारा वाईट परिणाम होतो.
असे असतानाही त्याची सवय असणाऱ्यांची संख्या कमी नाही. आज शासनाकडून धूम्रपानाच्या (Smoking) सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या जाहिराती सर्वत्र दाखवल्या जातात. सिगारेट, तंबाखूच्या (Tobacco) पाकिटावर सावधानतेचा वैधानिक इशारा दिलेला असतो. हे सगळे पाहून किंवा माहिती असतानाही लोक याकडे दुर्लक्ष करून धूम्रपानाच्या (Smoking) आहारी जातात.
तंबाखू (Tobacco) सेवनाचे दुष्परिणाम :
तंबाखूमधील (Tobacco) निकोटीन हे नि:संदिग्धपणे तुमची चव, स्पर्श आणि गंध या तीन सर्वात महत्त्वाच्या आनंद अनुभवयाच्या संवेदना क्षीण करते.
तंबाखूच्या (Tobacco) सेवनामुळे सर्व प्रकारचे कॅन्सर, हृदयरोग, धूम्रपानामुळे (Smoking) फुफ्फुसाचे रोग होण्याचा मोठा धोका असतो.
त्वचा निस्तेज पडते व लवकर सुरकुत्या येतात, त्वचेतील आर्द्रता झपाट्याने कमी होऊन त्वचा शुष्क होते.
धूम्रपान (Smoking) करणाऱ्याने सोडलेला धूर जवळच्या व्यक्तीसाठीही हानीकारक असल्याने त्यालाही धूम्रपान (Smoking) करणाऱ्या व्यक्तीएवढाच धोका निर्माण होऊ शकतो.
धूम्रपानामुळे (Smoking) दरवर्षी 8 हजार लोकांना अस्थमाची लागण होते.
तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थांच्या सेवनाने तोंड, घसा, फुफ्फुस, जठर, मूत्रपिंड व मूत्राशयाचा कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धूम्रपानामुळे (Smoking) हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे विकार, छातीत दुखणे, मेंदूचे विकार होऊ शकतात. भारतात तंबाखू (Tobacco) सेवनामुळे मरणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे.
निकोटीन व्यसनी व्यक्तींमध्ये अल्झायमर्स, स्किझोफ्रेनिया यासारख्या मेंदूच्या संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे.
धूम्रपान (Smoking) / तंबाखू (Tobacco) सेवन सोडण्यासाठी उपाय :
तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थांचे व्यसन सोडण्याचा दृढनिश्चय करावा.
व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन त्यांचा योग्य सल्ला घ्यावा.
तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थ नजरेसमोर राहतील असे ठेवू नका.
तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थ अडगळीच्या ठिकाणी ठेवा म्हणजे ते सहजासहजी उपलब्ध होणार नाहीत.
तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याची इच्छा झाल्यास स्वत:ला दुसऱ्या कामात व्यस्त ठेवा.
किंवा इतर घातक नसलेले उदा.बडीशेप, वेलची, लवंग आदी पदार्थांचे सेवन करा.
तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थांचे सेवन करणाऱ्या सहकारी/ मित्र यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवा.
निर्व्यसनी लोकांची/ मित्रांची संगत वाढवा.
तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थांच्या सेवनाची इच्छा झाल्यास त्यापासून होणाऱ्या आजारांचा, आर्थिक नुकसानीचा व मुलाबाळांचा विचार करा.
कर्करोगाचा रुग्णाच्या भयावह अवस्थेचा विचार करा.
आपल्या जवळच्या व्यक्तीची मदत घ्या.
तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थांचे सेवन सोडण्याचे फायदे :
कोणतेही वाईट व्यसन शरीरास घातकच असते आणि ते सोडल्याने आपल्याला शारीरिक, मानसिक अर्थिक व सामाजिक लाभ होतात.
कोणतेही व्यसन हे आपण स्वत:च्या दृढ निश्चयावरून प्रियजनांच्या सांगण्यावरून किंवा दुष्परिणामांना घाबरून सोडतो.
शारीरिक फायदे :
स्वत:चे स्वास्थ्य सुधारते.
कर्करोग व हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो.
श्वसन संस्थेच्या आजाराचे प्रमाण कमी होते.
अन्न चवीला व वासाला चांगले लागते.
पुरुषांचे लैंगिक सामर्थ्य वाढते.
जर अगोदरच हृदयविकार असेल तर धूम्रपान (Smoking) सोडल्याने हृदयशुलाची तीव्रता आणि वारंवारता कमी होते.
मौखिक स्वास्थ्य सुधारते.
दात स्वच्छ राहण्यास मदत होते.
आयुष्यमान वाढते.
आर्थिक फायदे :
तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थांवर खर्च होणारे पैसे वाचतील व त्या पैशात इतर आवश्यक गोष्टी घेता येतील.
आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांवरील खर्च टळल्याने खूप मोठी आर्थिक बचत होईल.
दीर्घकालीन लाभ :
धूम्रपान (Smoking) सोडल्यानंतर 5 वर्षांनी पूर्वीपेक्षा फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या मृत्यूचा धोका 60 % कमी असतो.
धूम्रपान (Smoking) सोडल्यानंतर 15 वर्षांनी फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका धूम्रपान करणाऱ्यांपेक्षा कमी होतो.
धूम्रपान (Smoking) सोडल्यानंतर 1 वर्षात हृदयविकाराचा धोका 50% ने कमी होतो.
– डॉ. गोपाळ उजवनकर