डॉ. जयश्री द्रविड
50 टक्के रुग्णांमध्ये कमी झालेल्या वजनाच्या 5 टक्के वजन 2 ते 3 वर्षांत हळूहळू वाढू शकते. म्हणजे 100 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन 60 किलोपर्यंत कमी झाल्यास 2 ते 3 वर्षानंतर जास्तीत जास्त 63 ते 64 किलो इतके वाढू शकते.
ही शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक आहे ( bariatric surgery information for patients )
लठ्ठपणामुळे मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा या शस्त्रक्रियेमुळे मृत्यू येण्याची शक्यता वाढते. हा अत्यंत हास्यास्पद आरोप विविध प्रकारचे औषध विकणाऱ्या आहार तज्ज्ञांकडून केला जातो. वस्तुतः हा आरोप धादांत चुकीचा आहे. ही शस्त्रक्रिया करताना रुग्ण काही गंभीर स्थितीत नसतो. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक, नियोजनबद्धरीत्या, सुरक्षितपणे केली जाते. पित्ताशयातील खड्याची शस्त्रक्रिया व सांध्याच्या शस्त्रक्रियेपेक्षाही ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांविषयी माहिती याआधीच दिली आहे. या आजारांमुळे मृत्यू किंवा शारीरिक व्यंग उदा. लकवा, सांधे खराब होणे, याचे प्रमाण किती वाढते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तसेच मधुमेह व इतर व्याधींमुळे येणारी शारीरिक
दुर्बलता त्या व्यक्तीच्या आयुष्याची गुणवत्ता (क्वॉलिटी) बऱ्याच प्रमाणात कमी होते. या शस्त्रक्रियेकरिता येणाऱ्या रुग्णाची शारीरिक परिस्थिती शस्त्रक्रियेच्या वेळी नाजूक असते, पण शस्त्रक्रिया झाल्यावर लगेचच प्रकृती सुधारायला लागते आणि खरोखरच या शस्त्रक्रियेमुळे 89 टक्के मृत्युदरात घट दिसून आली. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्युदरात 60 टक्के, मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्युदरात 90 टक्के, हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूदरात 50 टक्के घट आढळून आली. ( bariatric surgery information for patients )
शस्त्रक्रियेनंतर व्यायाम व आहार यांना नियंत्रणामध्ये ठेवले नाही तर वजन कायमस्वरूपी नियंत्रणात राहात नाही
निरनिराळे डायट लिहून देणाऱ्यांकडून या समजाला खतपाणी घातले जाते. वस्तुतः या शस्त्रक्रियेमुळे जठर व आतडे यांची संरचना बदलली जाते. त्यामुळे मुळातच भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. तसेच जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांच्यातील बॅक्टेरियांचे प्रमाण व गुणवत्ता यात फरक होतो. त्यामुळे व्यायाम व आहार यावर अत्यंत नियंत्रण ठेवण्याची गरज रहात नाही. वजन कमी झाल्यामुळे नैसर्गिकरित्या रुग्णाच्या हालचालींत वाढ होते, ही बाब वेगळी.
या शस्त्रक्रियेमुळे आवश्यक जीवनसत्वे ( bariatric surgery information for patients )
व खनिज यांची शारीरिक कमतरता निर्माण होते
स्लीव गॅस्ट्रोक्टोमी या शस्त्रक्रियेमध्ये लहान आतड्यांमध्ये काहीच फरक केला जात नाही. त्यामुळे या शस्त्रक्रियेमध्ये ही शक्यता निर्माण होत नाही. गॅस्ट्रिक बायपास या शस्त्रक्रियेमध्ये लहान आतड्याचा अंतर्भाव पचलेले अन्नपदार्थ जादा शोषले जाऊ नये म्हणून केला जातो. त्यामुळे ही शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांमध्ये खनिज व जीवनसत्वे यांच्या कमतरतेची शक्यता राहते. परंतु, शोषण कमी व्हावे म्हणून या दृष्टिनेच ही शस्त्रक्रिया केली जात असल्याने रुग्ण व सर्जन या दोघांनाही ही बाब आधीच माहीत असते. अशा रुग्णांना जीवनसत्वे, खनिज यांचे अतिरिक्त डोस शस्त्रक्रियेनंतर कायमस्वरूपी दिले जातात. यामुळे जीवनसत्वे व खनिजे यांच्या कमतरतेची शक्यता टाळली जाते. ( bariatric surgery information for patients )
शस्त्रक्रियेनंतर अशक्तपणामुळे रुग्ण पहिल्यासारखे काम करू शकत नाही
वस्तुतः या शस्त्रक्रियेनंतर 1 किंवा 2 आठवड्यात रुग्ण पुन्हा आपल्या कामावर जाऊ शकतो व पूर्वीपेक्षा जास्त कार्यक्षमतेने काम करू शकतो.
स्लीव्ह गॅस्ट्रोक्टॉमी
या शस्त्रक्रियेचा प्रकार सर्वात सुरक्षित आहे. कारण या शस्त्रक्रियेमध्ये फक्त जठराचा आकार कमी केला जातो व आतड्यांच्या संरचनेमध्ये कोणताही फरक केला जात नाही. रुग्णांमध्ये 90 टक्के रुग्ण या प्रकारचे असतात. अतिशय लठ्ठ असणाऱ्या रुग्णांमध्ये गॅस्ट्रिक बायपास ही शस्त्रक्रिया केली जाते. त्याचे काही प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात. उदा. चक्कर येणे, रक्तातील साखर कमी होणे, शौचास जास्त वेळा जायला लागणे, पित्ताशयात खडे होणे.
ज्या रुग्णांना गॅस्ट्रिक बायपासचा सल्ला दिला जातो, त्यांना हे दुष्परिणाम होण्याची पूर्ण कल्पना अगोदरच दिली जाते. अतिशय लठ्ठपणामुळे आयुष्यमान मुळातच कमी होते. हे दुष्परिणाम होण्याची शक्यता गृहित धरल्याने रुग्ण व सर्जन याबाबत जागरुक असतात. त्यामुळे असे दुष्परिणाम आढळल्यास ताबडतोब उपायही केले जातात. पुन्हा एकदा मुद्दाम येथे नमूद केले पाहिजे, की 90 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये सुरक्षित अशी स्लीव्ह गॅस्ट्रोक्टॉमी हीच शस्त्रक्रिया केली जाते.
( bariatric surgery information for patients )