Banana Health Problem – लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केळी (Banana) आवडते. रोज केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, पण तुम्हाला माहित आहे का? केळी (Banana Health Problem) जास्त प्रमाणात खाल्ल्याने अनेक प्रकारचे नुकसान देखील होऊ शकतात. त्यामुळे केळी खाण्याची मर्यादा निश्चित करावी हवी अन्यथा त्याचा वाईट परिणाम तुमच्या शरीरावर देखील होऊ शकतो.
तुम्ही दिवसातून 1-2 केळी सहज खाऊ शकता, यामुळे तुम्हाला कोणतीही समस्या उद्भवणार नाही. तसेच, तुम्ही खूप व्यायाम करत असाल तर तुम्ही दिवसातून 3-4 केळी खाऊ शकता, परंतु यापेक्षा जास्त केळी खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. चला जाणून घेऊया जास्त केळी खाण्याचे काय तोटे काय आहेत.
जास्त केळी खाण्याचे तोटे !
1- लठ्ठपणा वाढतो- जास्त केळी खाल्ल्याने तुम्ही जाड होऊ शकता. केळीमध्ये फायबर आणि नैसर्गिक साखर असते, दुधासोबत खाल्ल्यास वजन वाढते.
2- पोटदुखी आणि अॅसिडिटी- रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने पोटदुखी आणि गॅसची समस्या देखील होऊ शकते. केळीमध्ये स्टार्च असल्याने ते पचायला वेळ लागतो. त्यामुळे पोटदुखीची तक्रार असते. त्यामुळे अनेकांना उलट्याही होतात.
3- बद्धकोष्ठतेची समस्या- पिकलेले केळे खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते, पण केळी जराही कच्ची असेल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कच्ची केळी खाऊ नका आणि पिकलेली केळीही एका मर्यादेत खा.
4- साखरेची पातळी वाढते- केळी खाल्ल्याने मधुमेह असलेल्या लोकांना खूप नुकसान होऊ शकते. केळीमध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे साखरेचे प्रमाण जास्त असणाऱ्यांनी केळी कमी खावी.
5- दातांच्या समस्या आणि मायग्रेन- केळी जास्त प्रमाणात खाल्ल्यास दात किडण्याची शक्यता असते. केळी मध्ये टायरोसिन हे अमिनो अॅसिड असते, जे शरीरात टायरामाइनमध्ये बदलते. यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. दमा असलेल्यांनीही केळी मर्यादेत खावी.
The post Banana Health Problem : जास्त केळी खाल्ल्यानं होतात ‘हे’ गंभीर दुष्परिणाम; वाचून व्हाल थक्क ! appeared first on Dainik Prabhat.