सौंदर्यशास्त्रानुसार शुद्धीकरणासाठी बॉडी थेरपी स्पा वेस्टर्न मसाज थेरपीमध्ये बांबू मसाज थेरपी हा एक अनोखा मसाज आहे. नथाली सीसीलिया या फ्रान्स महिलेने प्रथमतः बांबू मसाज थेरपी 2004 मध्ये विकसित केली. तेव्हा त्यांनी या थेरपीचे नाव बांबू फ्युजन मसाज असे ठेवले होते. त्यांनी त्यांच्या अमेरिकन ग्राहकांसाठी या मसाज पद्धतीचा अवलंब केला होता. मसाज थेरपीमध्ये काही ठिकाणी स्त्रियासुद्धा पुरुषांना मसाज देतात. तसेच पुरुषसुद्धा स्त्रियांना मसाज देतात. यावेळी सरळसरळ स्पर्श न होता मसाज देता यावा, या हेतूने नथाली यांनी या अनोखा मसाज थेरपीचा शोध लावला. या मसाजचे फायदे बघता हळूहळू हा मसाज बराच प्रचलित झाला.
या बांबू मसाजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या मोठ्या आकाराचे भरीव तसेच पोकळ बांबू वापरण्यात येतात. बांबू हा एक प्रकारची गवत वनस्पती आहे. काही गवतजातीय बांबू औषधी असून यांचा उपयोग आयुर्वेद तसेच मसाज थेरपीमध्ये केला जातो. बांबू मुख्यत्वेकरून आशिया खंडात अथवा चीनमध्ये उगवला जातो. काही अंशी भारतामध्ये पण बांबू उत्तम रीतीने वाढतो. शरीर मसाज शास्त्रात बांबू मसाज थेरपी एक अनोखा बॉडी मसाजचा प्रकार आहे. बांबू मसाजमधील काही बांबू पोकळ वापरले जातात तर छोट्या आकारातले काही ठराविक शारीरिक अवयवांसाठीचे बांबू भरीव असतात. बांबू मसाज थेरपीचे बांबू रतन अथवा वेत जातीच्या बांबूपासून बनवले जातात. या थेरपीमध्ये पाठ, हात, पायाचा मागील भाग तसेच मांडी या भागांवर बांबूच्या साह्याने मसाज केला जातो. मसाज सुरू करण्यापूर्वी हे बांबू ठराविक तापमानाला गरम करून घेतले जातात. यासाठी बांबू स्टीमर उपलब्ध असतात. मसाज थेरपीचे बांबू प्रथमतः तेल लावून घेतले जातात. नंतर ते गरम करून मगच शरीरावर बांबूच्या साह्याने मसाज केला जातो.
बांबू मसाज करताना शक्यतो त्याची विशिष्ट अशी ऑइल्स वापरण्यात येतात. बांबू मसाज थेरपीला मुख्यत्वे करून सनफ्लॉवर ऑइल अथवा स्वीट अल्मंड ऑइल वापरण्यात येते. सनफ्लॉवर ऑइल शरीरावरील त्वचेला तसेच शरीरातील आतील हाडे व मांस पेशींना मॉइश्चराईज करण्यासाठी व आरामदायीपणा देण्यासाठी उपयुक्त ठरते. स्वीट अल्मंड ऑइल मॉइश्चराईज करून आरामदायी-पणासोबत हाडांची, स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी उपयोगी ठरते. रोज हीप ऑइल हे अँन्टीबॅक्टेरियल व अँटीइंफ्लेमेटरी असल्यामुळे ज्यांना त्वचेला खूप खाज येते अथवा त्वचा लाल पडते अशा लोकांना बॉडी मसाजमध्ये खूप उपयोगी ठरते.
बांबू मसाज करत असताना ऑइल लावून बांबू गरम करून घेतल्यानंतर अवयवावर ऑइल लावून घ्यावे लागते. नंतर त्या शरीराच्या भागावर ठराविक पद्धतीने बांबूने मसाज करण्यात येतो. ठराविक तापमानाचा बांबू व हे विशिष्ट पद्धतीचं तेल या दोघांचा ताळमेळ गाठत थेरपिस्ट मसाजला सुरुवात करतात. बांबूची उष्णता वापरलेली तेल आणि दिलेला ठराविक दबाव यामुळे शरीरामध्ये आंतरबाह्य बदल घडतात. खूपच तालबद्ध असा हा बांबू मसाज बॉडी मसाजमधला एक वेगळाच अनुभव देणारा मसाज आहे.
ज्यांना ब्लड प्रेशर, हेवी डायबेटीस, ऑस्टिओफोरॅसिस अशा लोकांनी करू नये. थ्रोबोसिस, म्हणजेच शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे हा आजार आहे त्यांनी करू नये. तसेच एपिलिप्सी असणारे म्हणजेच फेफरे भरते अशांनी बांबू मसाज थेरपी टाळावी. कोणताही सल्ला अथवा कोणतीही थेरपी तज्ज्ञांच्या सहाय्याने जाणून घेऊन मगच करावी. थेरपिस्ट जाणकार आहेत का आणि तज्ज्ञ आहेत का हे लक्षात घेऊन मगच या थेरपी करून घ्याव्यात. या थेरपीजमध्ये अभ्यासक लोक कमी असल्यामुळे अशा थेरपीज आपल्याला फार कमी ठिकाणी आपल्याला योग्य शास्त्रीय पद्धतीने करून घेता येतात. या सगळ्याची माहिती घेऊनच अशा थेरपींचा अनुभव घ्यावा.
बांबू मसाज थेरपीचे फायदे…
शरीरामध्ये साठलेले लॅक्टिक ऍसिड बाहेर काढून टाकण्यास तसेच शरीरातील दुःख वेदना कमी करण्यास मदत करतो. सांध्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी मदतनीस ठरतो. बांबू मसाज आपली रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच श्वासोश्वास नियमित करण्यास तसेच निद्रानाश थांबवण्यास उपयुक्त असतो. शरीरातील सेल लाईट ऍक्टिव्हिटी शरीरातील ऑडी पोस्टमध्ये साठवून राहिलेल्या चरबी वितळवून दूषिते नाहीसे करतो. मायग्रेनचा त्रास आहे त्यांना बांबू मसाज सुखकर ठरतो. मान व खांदेदुखी असणाऱ्यांना बांबू मसाज उत्तम थेरपी आहे. शरीरातील रक्तप्रवाह वाढवून अंतर्गत शारीरिक क्रिया नियमित होतात. अंतर्गत शारीरिक क्रियांमध्ये चयापचय होणे, शरीरातील नको असलेल्या घटकांचे विघटन होणे, ज्यामुळे मांस पेशींना उत्तेजना मिळते. आपणास प्रसन्न वाटत राहते. शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करण्यासाठी तसेच वेट लॉससाठी बांबू मसाज उपयुक्त ठरतो.
कमीत कमी पंधरा दिवसांतून एकदा असे चार वेळा बांबू मसाज थेरपी घेतल्याने वजन घटवण्यासाठी ही मदत होते. खेळाडू व्यक्तींनी मात्र योग्य तो सल्ला घेऊनच बांबू मसाज करावा. रात्री झोप न येणाऱ्या तसेच झोपेच्या तक्रारी असणाऱ्या लोकांनी विशेषतः पाठीचा बांबू मसाज घेणे खूप योग्य ठरते. बांबू मसाज थेरपीमध्ये मानवी शरीराची मज्जासंस्था तसेच श्वसन संस्था या दोन्ही संस्थांची कामे नियमित होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचे बांबू मसाज थेरपीमध्ये आंतरिक शारीरिक क्रियांमध्ये चयापचय क्रिया वाढवणे, व्यवस्थित भूक लागणे व बद्धकोष्ठता कमी होणे हे फायदे होतात. काही ठिकाणी बांबू मसाज थेरपीमध्ये शरीरावर बांबू अर्क वापरण्यात येतो, बांबू अर्कमधील सिलिका आपल्या शरीरात स्नायूंमध्ये कनेक्टिव्ह टिश्यूला पुष्टी देते, ज्यामुळे आपली हाडे व सांधे यांची वाढ योग्य व सुरक्षित राहते.
The post bamboo massage : बांबू मसाज कोणी करू नये? appeared first on Dainik Prabhat.