पाठ दुखण्याची तक्रार पुष्कळांची असते. पाठीच्या स्नायूंचा थकवा हे सर्वात जास्त वेळा पाठदुखीचे कारण असते. पाठीच्या कण्याची योग्य वक्रता ठेवण्याचे काम हे स्नायू करत असतात. त्यामुळे बसताना (खुर्चीवर, बाकावर, स्टुलावर, जमिनीवर) पाठ सरळ ठेवून बसण्याची सवय लावून घेणे अत्यंत आवश्यक असते. पुढे वाकून बसणे, चालताना पाठ सरळ न ठेवणे या सवयी पाठीच्या आरोग्याच्या दृष्टीने अहितकारक असतात. एकदा अशी सवय जडली की पाठीच्या स्नायूंवर अकारण ताण येतो. पाठ दुखू लागते. याला पॉश्चरल बॅकएक म्हणतात. दीर्घकाळ बसून राहणाऱ्या व्यक्तींमध्ये (बैठे काम करणारे बुद्धिजीवी, विद्यार्थी, परीक्षार्थी, टीव्हीचे प्रेक्षक, प्रवासी, इ) हा पाठदुखीचा प्रकार प्रामुख्याने आढळतो.
हे करून पाहा( back pain exercise )
नियमाने पाठीचे व्यायाम करणे आणि बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या सदोष पद्धती सोडून पाठ सरळ, ताठ ठेवणे हा या पाठदुखीवरील उपाय आहे.
पोटावर आणि पाठीवर पडून हे व्यायाम करावेत. सूर्यनमस्कार घालावेत, योगासने करावीत. विशेषकरून शलभासन, भुजंगासन, नौकासन, धनुरासन अशी पोटावर झोपून करण्याची आसने उपयोगी पडतात. ( back pain exercise )
ऍनिमिया हे पाठदुखीचे कारण?
होय रक्तक्षय म्हणजेत ऍनिमिया झालेल्या व्यक्तीच्या पाठीचे स्नायू इतर शरीरातील स्नायूंप्रमाणे लवकर थकतात. त्यामुळे पाठ व मांड्या, पिंडऱ्या दुखतात. आहारात लोहाची कमतरता असणे हे भारतीय स्त्रियांमध्ये असा ऍनिमिया होण्याचे एक
प्रमुख कारण असते. त्या दृष्टीने पालेभाज्या, लॅट्युसची पाने (सॅलड), टोमॅटो, गाजर, बीटरूट, पपई, चिक्कू, कलिंगड, शेवगा, काळी मनुका, खजूर यांचे सेवन करावे. शाकाहारातून येणारे लोह या स्वरूपातून फेरस या स्वरूपात लिंबू पिळून घ्यावे. म्हणजे जीवनसत्त्व क (व्हिटॅमिन सी) उपलब्ध होते.
जीवनसत्त्व क मुळे फेरिक लोहाच्या अणूचे फेरस अणूत रूपांतर होते व लोह शोषले जाते. ताज्या फळांत जीवनसत्त्व क असते. ताजी फळे खावीत. पेरू हा जीवनसत्त्व क मिळवण्याचा चांगला मार्ग आहे. संत्री, मोसंबी, लिंबू आणि आवळा या फळातून ते मिळतेच. ( back pain exercise )