Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Baby Screen Time: छोट्या मुलांना कार्टून नव्हे, तर दाखवा ‘हे’ व्हिडीओ; मानसशास्त्रज्ञांचा सल्ला… यामुळे वाढते खऱ्या अर्थाने ‘सोशल लर्निंग’

by
November 3, 2025
in लाईफस्टाईल
A A
Baby Screen Time: छोट्या मुलांना कार्टून नव्हे, तर दाखवा ‘हे’ व्हिडीओ; मानसशास्त्रज्ञांचा सल्ला… यामुळे वाढते खऱ्या अर्थाने ‘सोशल लर्निंग’
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Baby Screen Time: आजच्या डिजिटल युगात मुलांच्या हातात फोन देणं अगदी सामान्य झालं आहे. जेवण करणं असो वा झोपणं, मुलं मोबाईल किंवा टीव्हीसमोर बसल्याशिवाय हलत नाहीत. पालकांना वाटतं, कार्टून दाखवल्याने मुलांचं मनोरंजन होईल आणि सामाजिक शिकण्याची (Social Learning) प्रक्रिया वाढेल.

पण मानसशास्त्रज्ञ आणि चाइल्ड बिहेवियर थेरपिस्ट यांचं मत मात्र वेगळं आहे. ते सांगतात,“मुलांच्या विकासासाठी कार्टून नव्हे, तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवांशी जोडणाऱ्या गोष्टी दाखवणं सर्वात महत्त्वाचं आहे.”

लहान मुलांना स्क्रीन टाइममध्ये काय दाखवावं?

डॉक्टरांच्या मते एक ते दीड वर्षांच्या मुलांचा स्क्रीन टाइम शक्यतो शून्य ठेवावा. पण जर पालकांना कधी थोड्या वेळासाठी मुलांना काही दाखवावंच लागलं, तर कार्टून दाखवण्याऐवजी त्यांचे स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ दाखवा.
उदाहरणार्थ,

पार्कमध्ये खेळतानाचे व्हिडिओ,
शाळेतील फोटो,
मित्रांसोबत खेळतानाचे क्षण,
थेरपी सेंटरमधील मजेशीर व्हिडिओ इत्यादी.
असं केल्याने मुलं त्यांना परिचित असलेल्या गोष्टी पुन्हा अनुभवतात आणि त्यांच्या मेंदूमध्ये इमोशनल कनेक्शन निर्माण होतं. जे कार्टूनपेक्षा अधिक शिकवण देतं.

कार्टून दाखवण्यापेक्षा स्वतःचे व्हिडिओ का महत्त्वाचे?

डॉक्टर सांगतात की,
“मुलांना जे काही दाखवतोय, ते त्यांनी स्वतः अनुभवलेलं असेल तर त्यातून त्यांना खऱ्या अर्थाने शिकता येतं. कार्टूनमधल्या गोष्टी ते ना अनुभवू शकतात, ना त्यांच्याशी जोडू शकतात.”
त्यामुळे मुलांना त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्याशी निगडित दृश्यं दाखवणं त्यांच्या भावनिक आणि सामाजिक विकासासाठी जास्त फायदेशीर ठरतं.

स्क्रीन टाइमचे दुष्परिणाम

अत्याधिक स्क्रीन टाइममुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात :
डोळ्यांचे विकार : सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि निकटदृष्टी दोष (Myopia) वाढतो.
लठ्ठपणा : टीव्ही किंवा मोबाईलसमोर निष्क्रिय बसल्याने शारीरिक हालचाल कमी होते.
अटेंशन स्पॅन कमी होतो : लहान वयात सतत स्क्रोल केल्याने एकाग्रता कमी होते.
शिकण्याची क्षमता घटते : जास्त स्क्रीन टाइम असलेल्या मुलांना वर्गात लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येते.
चिडचिडेपणा वाढतो : स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने मुलं भावनिकदृष्ट्या अस्थिर होतात आणि मूड स्विंग्स वाढतात.

मुलांना स्क्रीन दाखवणं टाळता आलं तर उत्तमच. पण जर दाखवावंच लागलं, तर कार्टून किंवा काल्पनिक शोजऐवजी त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील आनंददायी क्षण दाखवा. असं केल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, भावनिक जडणघडण मजबूत होते आणि सोशल लर्निंग नैसर्गिकरीत्या विकसित होते.

Join our WhatsApp Channel

The post Baby Screen Time: छोट्या मुलांना कार्टून नव्हे, तर दाखवा ‘हे’ व्हिडीओ; मानसशास्त्रज्ञांचा सल्ला… यामुळे वाढते खऱ्या अर्थाने ‘सोशल लर्निंग’ appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar