लहान मुलांच्या सर्वांगिन विकासासाठी त्यांची देखरेख व्यवस्थित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांचा आहार, औषधी, पोषक वातावरण या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. या गोष्टींबरोबरच आणखी एक गोष्ट लहान मुलांच्या बाबतीत महत्वाची ठरते ती मालीश. पुर्वी बाळाच्या जन्मानंतर लगेचच बाळ आणि बाळांतिनीची मालीश करून त्यांना आंघोळ घातली जात असे. ( baby massage benefits in marathi )
आजकाल डॉक्टर हे सर्व करण्यास मनाई करतात. परंतु बाळीची मालीश करणे म्हणजेच बेबी मसाज हा बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचा असल्याचे एका सर्वेक्षणात लक्षात आले आहे.
आयुर्वेदातही बेबी मसाजसंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. बेबी मसाजचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत. बेबी मसाजने बाळाची हाडे मजबूत होतात तसेच बाळाच्या मेंदूचाही विकास चांगला होण्यास मदत होते. दिवसभरातून किमान एक वेळा मसाज केल्याने बाळाचे स्नायू बळकट होतात.
मुलांमधील एकाग्रता वाढते, तसेच वजन वाढण्यासही मदत होते. आईने मसाज केल्यास आई व बाळ यांच्यातील घनिष्टता वाढते. मुलांना शांत झोप लागते, पचनक्रियेसंबंधीच्या तक्रारी दूर होतात. मसाजमुळे मुलांचा शारीरिक तसेच मानसिक विकास होण्यासही मदत होते.( baby massage benefits in marathi )