शरीराचा एक-एक भाग जखडायची सुरवात झाली की समजावे की आपली वाटचाल आमवाताकडे आणि संधीवाताकडे आहे.
आमवाताची कारणेः
जेवण झाल्यावर तीन तासांची पोटाला विश्रांती हवी म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित होते पण तसे होत नाही. त्यामुळे आमवात जडतो.
अन्न पक्वस्थितीत आंत्राशयातून व पच्चमानाशयातून पचनाचे पुरेसे संस्कार न होता पुढे ढकलले जाते
आहाररसाबरोबर शरीरात फिरणारे रक्तही आमस्वरूपी बनते.
पोट साफ नसणे हे एक महत्वाचे कारण आहे.
जडान्न, मेवामिठाई यांचा अतिरेक करणे
दीर्घकाळ बारिक ताप येत राहणे.
संचारी वेदना म्हणजे शरीराच्या निरनिराळया भागात निरनिराळया वेळी दुखणे. सुरुवातीच्या अवस्थेत सांध्याव्यतिरिक्त भाग जखडला जाणे.
सांध्यांचा आवाज येईलच असे नाही.
परसाकडे चिकट होणे, साफ न होणे.
भूक मंदावणे
जीभ चिकट होणे
आळस येणे
उत्साह नसणे.
शरीराच्या सर्व भागावर शोथ म्हणजे सूज येणे.
गरम पाण्याने शेकावेसे वाटणे.
तेल चोळल्याने काही वेळा दुखणे वाढणे
सकाळी उठताना शरीर आंबल्यासारखे वाटणे.
आमवातावर आयुर्वेदिक उपचार
सिंहनाद गुग्गुळ (कमी औषधी घटकांचा), लाक्षादी गुग्गुळ व आरोग्यवर्धिनी प्रत्येकी तीन गोळया सकाळ-सायंकाळ बारीक करून गरम पाण्याबरोबर घेणे.
वेदना खूप झाल्यास वातगजांकुश किंवा लवंगदी गुग्गुळ याचा वापर करावा.
जेवणानंतर सौभाग्य सुंठ अर्धा चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावी.
एरंडपाक एक ते दोन चमचे सकाळी घ्यावा.
गरम पाण्यात मीठ टाकून टॉवेल किंवा फडके बुडवून दुखणारा भाग शेकावा.
जेवणानंतर महारास्नादी क्वाथ चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावा.
पिण्याच्या पाण्यात सुंठचुर्ण मिसळून ते प्यावे.
पोळी करावयाच्या कणकेत एका पोळीला एक चमचा, या हिशेबाने एरंडेल तेल मोहन म्हणून घालावे.
ज्या रूग्णाला कोणताच गुग्गुळ चालत नाही, अशा रूग्णाने सुंठ, एरंडेल ही औषधे वैद्याच्या सल्ल्याने पोटात घ्यावीत. यांना लेपामुळे पुरळ वा इतर त्रास होतो, त्यांनी वडाची किंवा एरंडाची पाने दुखऱ्या भागावर बांधावीत.
एरंडामुळीचा काढा चहासारखा सकाळी व सायंकाळी करून प्यावा.
अंथरूण सदैव उबदार असावे.
जखडलेला भाग, सुजेचा भाग व दुखणारा भाग यावर रात्री गुग्गुळ, सुंठ,पुनर्नवा, हिरडा, आंबेहळद, रक्तरोडा, कोंबडनखी, वेखंड अशा औषधांचा लेप, दाट, व गरम लावावा. रात्रभर ठेवावा आणि सकाळी काढावा.
हातापायांना मुंग्या येत असल्यास वेखंड चूर्ण चोळावे. तात्पुरत्या मुंग्या थांबतात.
ज्यांना बिब्वा त्रास देणार नाही, अशांनी पोटातून दूध व पाण्याबरोबर उकळलेल्या बिब्व्याचा काढा घ्यावा.
संपूर्ण अंगाला निरगुडी, एरंड, कडूनिंब यांच्या पानांच्या काढयाचा सर्वांगी स्वेद घ्यावा.
गुडघे, कंबर जखडली आल्यास अवगाह-टबबाथ उपयोगी पडतो.
पिंडस्वेद म्हणजे भाताच्या गोळयांचा शेक, पानांना तूप लावून त्याचा शेक स्थानिक स्वेद म्हणून वेगवेगळ्या लहानमोठया अवयवांकरिता वापरावा.
सर्वांगाला अभ्यंग करावे. त्याकरिता कोणतेही तेल गरम करून, मीठ मिसळून वापरावे.
तीव्र मलावरोध व आमसंचय असल्यास हिरडा, बाहावा मगज, सोनमुखी एरंडमूळ यांचा काढा रेचक म्हणून द्यावा.
वाताचा जोर कमी होण्याकरिता एरंडामूळ, बाहवा मगज, त्रिफळ, दशामुळे यांच्या काढ्याची निरूहबस्ती (एनिमा) घ्यावी. सांधे जखडले असता दुखऱ्या भागावर नीकॅप व स्ट्रेच पट्टी बांधूनही आराम मिळतो. अशा प्रकारे आमवात लक्षणांवरुन ओळखावा आणि आयुर्वेदिय व घरगुती उपचारांनी बरा करता येतो.
आमवातावर उपचार मसाजचा :-
देहाच्या चयापचयाच्या क्रियेत बिघाड झाला की आमवाताची सुरूवात होते.आमवात हा आजार सांध्यांचा आजार नसतो. त्यावर जलोपचार करावा. एकदा गरम आणि एकदा गार पाण्याने रोज शेकावे तसेच रोग्यास योग्य आहार व आहारक्रम हे उपचार करावेत. यातना कमी करण्यासाठी आणखी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे कापडाची पट्टी गार पाण्यात बुडवून पिळून सांध्याभोवती गुंडाळावी, व त्यावर लोकरी कापडाची पट्टी गार पाण्यात बुडवून पिळून सांध्याभोवती गुंडाळावी, व त्यावर लोकरी कापडाचा पट्टा बांधावा. सांध्यामधल्या उष्णतेमुळे ओले कापड कोरडे होते म्हणून त्याची घडी वेळोवेळी बदलावी. दिवसभरात तीन ते चार वेळा हा उपचार करावा. त्यामुळे सांध्यातील सगळया क्रिया जास्त कार्यक्षम होतात. सगळया शरीराला मालीश करण्याने जास्त फ़ायदा होतो. आमवातामध्ये तेलाचे मालीश अजिबात करू नये.
सांध्यांमध्ये सूज आल्यामुळे संधिवात हा आजार होतो. गुडघ्यामध्ये, पायांमध्ये, पायांच्या बोटांमध्ये हाताच्या बोटांमध्ये, आणि हाताच्या कोपरांमध्ये त्रास होऊ लागतो. तात्काळ उपचार न केल्यास बोटे आणि हाताचे सांधे वाकडे होऊ लागतात. जेव्हा हा आजार वाढतो तेव्हा सांधे खूपच वाकडे होऊन आकडून जातात, हालचाल करणेही कठीण जाते. उपचार
रोगाचा उपचार करण्यापूर्वी संधीवात शरीराच्या वरच्या भागात का खालच्या भागात जास्त वाढला आहे हे पहावे. वरच्या भागात आजार जास्त झाला असेल तर दोन्ही हातांच्या तळव्यांवर उत्तरी दक्षिणी ध्रुवाचा स्पर्श करावा.
जर खालच्या भागात आजार वाढला असेल उजव्या पायाच्या खाली उत्तरी ध्रुव आणि डाव्या पायाच्या खाली दक्षिणी ध्रुवाच्या चुंबकाचा स्पर्श करावा. तसेच दोन्ही ध्रुवांपासून तयार केलेले पाणी दिवसातून तीन वेळा द्यावा.
संधीवातावर क्रिस्टल मसाज
संधीवात झालेल्या व्यक्तींना जरा जरी हात लावला तरी दुखते, मुंग्या येतात, चावल्यासारख्या वेदना होतात. पण अशावेळी घाबरून जाऊ नये. मसाज हा संधीवातावर उत्तम उपचार आहे. हा उपचार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्येच सध्या लोकप्रिय असलेला मसाज म्हणजे संधीवातावरील क्रिस्टल मसाज होय. क्रिस्टल द्वारा म्हणजेच विविध रंगाच्या स्फटिकांद्वारा मसाज केला जातो. हा मसाज तज्ञांकडून घ्यावा.
मसाज शक्यतो दुसऱ्याला द्यावा किंवा आपण दुसऱ्याकडून करून घ्यावा. प्रथम पोटावर छोटा क्रिस्टल ठेवावा. नंतर तळपायाला स्फटिक किंचित दाबून हळूहळू मसाज करावा. ह्याप्रमाणे दोन्ही पायांना मसाज झाल्यावर मग पाठीच्या कण्यावर हळूवारपणे क्रिस्टल ठेवून मसाज करावा. मग अनुक्रमे मसाज करून खांदे, मान, डोके, हात ह्याप्रमाणे क्रमवार मसाज करीत यावे. नंतर उताणे झोपवून पायापासून गुडघ्यांपर्यंत मसाज करत यावे. नंतर पोटावर स्फटिक ठेवून घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोलाकार हळूवार मसाज करावा. त्याहीपेक्षा हळूवार मसाज हृदयाला करावा. नंतर गाल, कपाळ, केस यांनाही मसाज करावा.