नीलकमल ही आजकाल दुर्मिळ वनौषधी होत चालली आहे. खरं तर या वनस्पतीचे ती वाळली तरी औषधी महत्व कमी होत नाही. अनेक रोगांवर तिचा उपचार आयुर्वेदीय वैद्य करतात.
हृदयरोगावर उपयुक्त : आयुर्वेदीय दुकानात वाळलेले कमळ नीलोफर या नावाने मिळते. याचा मोठा उपयोग म्हणजे हे हृद्य आहे.
म्हणजे हृदयाला अत्यंत उपयोगी आहे. हृद्रोग म् हणजेच हार्ट डिसीज यावर हे चांगले लागू पडणारे औषध आहे. हृदय धाडधाड उडते, छाती भरलेली वाटते, डोळ्यांपुढे अंधारी येते, एकदम भीती वाटून अंगास मुंग्या येतात व अतिशय घाम येतो अशा स्थितीला हद्रोग असे म्हणतात. नीलकमल आणून ते चांगले कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण करावे व हे चूर्ण प्रत्येक वेळी दोन ग्रॅम असे दिवसातून चार वेळा,त्यात भिजेल इतका मध व चूर्णाइतकीच खडीसाखर घालून खावे. दोन आठवड्यात हृदयरोग बरा होतो.
तापावरही : बारीक तापावरही कमळचूर्ण,मधात भिजवून आणि खडीसाखर टाकून चूर्ण घ्यावे. पुष्कळ दिवस येणारा बारीक ताप कमी होतो.
भुकेसाठी : कमलकाकडी भाजून बियांच्या आतील चूर्ण बारीक करून सकाळ संध्याकाळ एक ग्रॅम घेऊन 1 ग्रॅम तूप आणि साखरेत मिसळून रोज लहान मुलांना चाटवले असता चांगली भूक लागते.
अशक्तपणा व गॅसेसवर : कमळकाकडी चूर्ण, गाईचे साजूक तूप,आणि साखर असे एकत्र समप्रमाणात रोज दोन वेळा घेतले असता अशक्ततपणा कमी होतो व वायू पण दबतो ज्यामूळे
गॅसेसचा त्रास कमी होतो.
उष्णतेच्या विकारावर : थंडाईसाठी कमळकाकडी चूर्ण, गाईचे साजूक तूप,आणि साखर असे एकत्र समप्रमाणात उन्हाळ्यात हे घेतल्याने फार बरे वाटते. उष्णतेने अंगाचा अतिशय दाह होत असलेल्या जागी कमळाची फुले, चंदन, हिंग एकत्र वाटून लावावे, दाह शांत होतो.उष्णता कमी होते.
पोटातील विकारावर : कमळाची मुळे पोटातील विकारावर चांगले औषध आहे.कमळ मूळांचे चूर्ण बारीक पूड करून ती मधातून चाटवावी.
अतिसार, संग्रहणी व अग्निमांद्य यावर : अतिसार, संग्रहणी व अग्निमांद्य यावर कमळ मुळांचे चूर्ण दिवसातून तीन वेळा घ्यावे व बारीक केलेले कमळाच्या फुलांचे चूर्ण दिवसातून दोनदा मधाबरोबर घेतले असता संग्रहणी बरी होते.अशाप्रकारे नीलकमल हे अतिशय गुणकारी औषध आहे.