– डॉ. मानसी पाटील-गुप्ता
एक आठवडा मागे माझ्या क्लिनिक मध्ये एक 15वर्षांचा मुलगा आला होता. त्याची तक्रार होती की दोन महिने त्याचे सतत डोके दुखत आहे.कोणत्याही औषधांचा गुण येत नव्हता. आम्ही सर्व तपासण्या केल्या. त्याला पित्ताचा त्रास नव्हता डोळांच्या तपासण्या देखिल केल्या. पण सर्व चाचण्या सामान्य होत्या. अचानक माझ्या लक्षात आले की, मी त्याचे ब्लड प्रेशर कधीच तपासले नाही. का? कारण तो या आजारासाठी अजुन लहान आहे.
होय! वयाच्या 15व्या वर्षी त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. दुसरी काहीच लक्षणे नव्हती आणि सर्व तपासण्यांचे निकाल सामान्य मर्यादेत होते. हा बदलत्या भारताचा चेहरा आहे. वृध्दापकाळचा आजार आता तरूणपणाला आजार झाला आहे. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिनीवर व हृदयावर रक्ताचा दाब वाढतो. यामुळे रक्त वाहिन्या नाजुक होतात.
उच्च रक्तदाबाचा आजार एवढया झपाटयाने का वाढत आहे?
उच्च रक्तदाब याची बदलता व नबदलता येण्याजोग कारणे आहेत. वय लिंग, वंश हे पैलू बदलता येत नाहीत. पण आपली जीवनशैली ही आपली निवड आहे. जीवनशैली आपली निवड आहे. जीवनशैली ही फक्त योग्य खाणे व झोपणे नसुन आपले रोजचे वेळापत्रक आपला रोजचा तणाव या तणावाचा अपल्यावर होणारा परिणामप्रदुषण ई.
जीवनशैली अत्यंत वेगाने बदलत आहे मोठयांची नाही तर लहान मुलांची देखील. तीस वर्षांपूर्वी 3 वर्षांची मुलं प्रक्रिया केलेले लोणी पिझ्झा व बर्गर खात नव्हते. ते दिवसातले 5 तास व्हिडियो गेम व टि.व्ही पाहण्यात घालवत नसतं. त्यांच्या शाळेच दप्तर अत्तासारखे जड नव्हते. ही मुलं 20 वर्षांच्या वयापर्यंत पोहचतात तोपर्यंत तणाव निष्क्रियता व अपायकारक खाणे त्यांच्या जीवनात मुख्य आधार बनला आहे.
प्रत्येक 3 व्यक्तींमधुन 1 व्यक्तीला आज उच्च रक्तदाब आहे. यातिल 50 लोकांना डोळयांतील पडद्याचा विकार व मुत्रपिंडाचे आजार होतात. उच्च रक्तदाब सायलेंट किलर आहे जो कोणतीही विशिष्ट लक्षणे दर्शवत नाही आणि अशा प्रकरे बहुतेकदा दुर्लक्ष केले जाते. बहुतेक लोकंमध्ये जेव्हा उच्च रक्तदाबाचे निदान होते तेव्हा त्यांची लक्षणे न दिसल्यामुळे त्याची औषधे घेणे बंद करतात. हे त्याच्या आरोग्यासठी मोठा धोका आहे कारण दीर्घकालीन उच्च रक्तदाबामुळे रक्त वाहिन्या नाजुक होतात.
उच्च रक्तदाबाचे धोके काय ?
रक्त वाहिन्या या फुग्या सारख्या असतात जेवढी यात हवा भराल तेवढा तो फुगणार आणि दिर्घकाळानंतर त्यातील हवा काढली तरी तो मुल् आकारात परत येत नाही.आपल्या रक्तवाहिनांशी आणि शिरांशी असंच होतं. दीर्घकाळ उच्च रक्तदाबामुळे त्यांची लवचिकता गमावतात आणि नाजूक बनतात. मुत्रपिंडाचे रोग, लकवा (मेंदुतील शिरा फुटणे) हृदय विकार, डोळयाचे विकार इत्यादि सर्व सामान्य धोके आहेत.
तरुणांमध्ये हायपरटेंशनचे काय कारण आहे? उच्च रक्तदाबाच्या विविध कारणांमधे आजच्या बहुतांश पिढीमध्ये दिसणारे खरे कारण त्यांचे जीवनशैली आहे. वाढते तणाव 2 प्रकारचे असतात मानसिक व शरिरीक.शरिरीक तणावामध्ये रसायने, प्रदुषण, जास्त वेळ एकाच ठिकाणी बसणे, संगणकासमोर वाढलेली तासांची संख्या, झोप न येणे, या सगळयामुळे क्रोनिक फटिग सिंड्रोम होतो.
मानसिक तणावाची कारणे
कौटुंबिक वेळेचा अभाव व्यावसायिकतेने प्रगती करण्याची आवश्यकता अर्थिक अनिश्चितता यामुळे अँझायटी डिसऑर्डर निर्माण होतात. हे सर्व तणाव आजकाल खुप सामान्य झाले आहेत. या सर्व तणावांना आपल्याला खुप कमी वयात तोंड दयावे लागते आपले शरीर यासाठी तयार नसते. मागच्या 20 वर्षात तणावाचे प्रमाण झपाटयाने वाढले आहे. 18 ते 30 वर्षांच्या वयोगटातील युवकांमध्ये मुलं-मुली अत्यंत तणावात असतात. आत्महत्या करणाऱ्यांपैकी 24 ते 30 या वयोगटातले आहेत. तरूणांमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे.
तणाव कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो?
ताण हा जीवनाचा एक तथ्य आहेपण त्याचा तणाव घेणे गरजेचे नाही.आपण आयुष्यात सर्वकाही नियंत्रणात ठेऊ नाही शकत. टेव्हा अशा गोष्टींचे तणाव घेणे कमी करणे गरजेचे आहे.ताण कमी करण्यासठी सर्वात महत्त्वाचे आहे हे ओळखाणे की आपण तणावात आहोत आणि आपण याकडे नेहमी दुर्लक्ष करतो. रिलॅक्सेशनच्या पदधती सर्वांसाठी वेगवेगळया असु शकतात चिंतन आपल्या समस्यांबददल बोलणे खेळात सहभाग घेणे किंवा छंद निवडने रिलॅक्सेशनसाठी खुप चांगले आहे. रोज किमान 15 मि. श्वासाचे व्यायाम केले तरी तणाव कमी होतो. पोषण व आहार हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आपले पारंपारिक पदार्थ पुरणपोळी, भाकरी, श्रीखंड हे न खाता आजाकाळ मुलं पास्ता ब्रेड ऩूडल्स खातात. अशा बदलामुळे आहारात मैदा कॅलरीज प्रिझर्व्हेटिव्हजचे प्रमाण वाढले आहे व प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी झाले आहे.् नियमित तपासणी आणि योग्य जीवनशैली हा निरोगी जीवनाचा पाया आहे.
– डॉ. मानसी पाटील-गुप्ता