Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘हे’ पित्तासाठीचे घरगुती उपाय एकदा करून बघा

by प्रभात वृत्तसेवा
January 17, 2021
in लाईफस्टाईल
A A
‘हे’ पित्तासाठीचे घरगुती उपाय एकदा करून बघा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलटया होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ऍन्टासिड्‌स (आम्लता नष्ट करणारा अल्कलाईन पदार्थ) ही निष्फळ ठरतात, तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पाहा.
आरामदायी केळं
केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो. त्यामुळे पोटात आम्ल (acid) निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते. पित्त झाल्यास पिकलेले केळे खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.
फायदेशीर तुळस
तुळशीमधील ऍन्टी अल्सर घटक पोटातील/जठरातील आम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तुळशीची 4-5 पाने चावून खावीत आराम मिळतो.
अमृतरूपी दूध
दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्लनिर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. दूध हे पित्तशामक असून ते थंड तसंच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र त्यात चमचाभर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.
बहुगुणी बडीशेप
बडीशेपमधील ऍन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास, बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
पाचक जिरं
जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते, ज्यामुळे पचन सुधारते, मेटाबॉलीझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात. जि-याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो किंवा तुम्ही जि-याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या.
स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग
लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते, पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते. लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात. तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा, त्यातून येणारा रस काही काळ तोंडात राहू द्या. या रसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घशातील खवखवही कमी होते.
औषधी वेलची
आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट/सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा, हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल.
वातहारक पुदिना
पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो. पुदिन्यातील वायुहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्यावं. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास पुदिन्यातील मेन्थॉल नावाचा पदार्थ मदत करतो.
आल्हाददायक आलं
आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचन सुधारते. तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो. आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा. तुम्हाला आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्यावं किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गूळ टाकून चोखत राहा.
पित्तशामक आवळा
तुरट, आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील व्हिटामिन सी अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. रोज चमचाभर आवळ्याची पावडर/चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsAcidityadvantagesAntacidArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietDomestic Treatmentfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar